मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भामी

पगला गजोधर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
भामाक्का बाजाराच्या टेम्पोमधून खाली उतरली तेव्हा उन्हं उतरायला होती. घराजवळ पोहोचल्यावर ओट्यावर बसलेल्या धाकट्या लेकी उराशी बिलगल्या, तसं लेकींना कवटाळू धरताना, भामीचं लेकुरवाळं आभाळ आणखीनच भरून आलं. "गोमू कुटं दिसंनांग पोरींनो ? ". " मगाचंधरनं ती शोध्तीय्या पाडीला अन तिच्या पाडसाला". …… "पाडी लई द्वाड, हायवेच्याकडच्या फाट्याकड बघायला जात्येगं पोरींनो ". असं बोलून भामी तिथून निघालीसुद्धा. दाटलेलं मळभ आकाशाचा निळा रंग पुन्हा करड्यात कालवायला लागलेल्या वेळी कोडगेपणे निर्विकार पाडी रस्त्याच्याकडंला पडलेली… पायाशी तिचं वासरू आचळाला लुचायला खटपट करत होतं… भामेनं जवळ जाउन पाहिलं तर काळजातून काहीतरी तुटतंय वाटून अंधारी आली…. रस्त्याकडंच्या जीपच्या टायरचा ठसठशीत चिखलाचा पट्टा उमटला होता…… पाडीच्या मानेवर…अन पलीकडच्या बाभळीतल्या गोमूच्या ओढणीवरसुद्धा ………

वाचने 3078 वाचनखूण प्रतिक्रिया 12

टवाळ कार्टा 31/07/2015 - 15:48
:(

ब़जरबट्टू 31/07/2015 - 16:25
अरारा

स्रुजा 31/07/2015 - 18:04
:(