मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्टारशिप इंटरप्राईज्_नॅनो (शतशब्दकथा)

पगला गजोधर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
स्टारवर्ष: '२११५', उर्सुला तारेसमुच्चय अंतराळ … अंतिम अथांग मिती……… आणि ती अथांग आहेत, हे माहीत असूनही, स्वयंचलित 'स्टारशिप इंटरप्राईज् नॅनो' धैर्याने निघाली होती, तिच्या अविरत ध्येयाच्या पाठ्लागावर….नवजीवन आणि नवसंस्कृतींच्यां शोधात….अमर्यादित असणा-या मितीचा शोध घेणाच्या, एकदलीय साहसी मोहिमेवर. अथांगाचा अंत समजून येण्यासाठीच्या गणिताचा उलगडा करण्याच्या निर्धार केलेल्या, कॅप्टनच्या पथदर्शक नेतृत्वाखाली… … … … … "चेतावणी … " "सिरी यानाला हादरे का बसत आहेत ?" साखरझोपेतून चाळवत कॅप्टन 'मिस्टर बिन्स’ ने विचारले "कॅप्टन आपण ५७zx२६ या कृष्णविवराजवळून चाललेलो आहोत, त्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या मगरमिठीतून सुटण्यासाठी, फुलथ्रोटलंने हार्डपोर्टसाईड स्टीयर केलं पाहिजे. " "सिरी तसं कर" " बॅटरी क्षमता न्यूनतम " "सिरी मागच्या स्पेसस्टेशनवर आपण सर्व बॅटऱ्या रिचार्ज केल्या होत्या नं ????? …………… सिरी ………. सिरी ……. सी…री…… ! "

वाचन 6433 प्रतिक्रिया 0