Skip to main content

प्रेमकाव्य

जमात : उच्चभ्रु आणि गुंठामंत्री !!

लेखक सुहास.. यांनी सोमवार, 03/01/2011 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी आपण माझ्या बरोबर काही आयटी वाल्यांच्या सवयीचा आस्वाद घेतलात. आता अजुन काही जमातीं कडे आपण पहाणार आहोत. सर्वात पहिले : उच्चभ्रू !! (आंतरजालीय भाषेत या जमातीच्या लोकांना हुच्चभ्रू असे ही म्हटल्या जाते.) आमचे कट्टर शत्रुत्व असलेली ही जमात, आपल्याला गल्ली-बोळात सहजासहजी सापडणार नाही, मात्र शनिवारी-रविवारी एखाद्या मॉल मध्ये आरामशीर सापडेल. अंगात , आंग्लभाषेत, आय एम अश्या ऍटिट्यूड धारी अक्षराने सुरु होणारं , अथवा एखादं प्रवचनीय वाक्य असलेले राऊंड नेक चे टी-शर्ट असेल.

..गंधमुग्ध

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी शनिवार, 01/01/2011 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यामध्येच रमले होते.. तुझ्या मूळेच फुलले होते... उमलले तुझ्यामुळे गंधले तुझ्यामुळे... कोवळ्या अन मुग्ध या रेशीम स्पर्शी पाकळ्या खुलल्या तुझ्यात अन् उमलल्या तुझ्यामुळे.. गंध भरल्या पाकळ्यांची ही नजाकत मखमली टवटवी अन् हा तजेला.. लाभला तुझ्यामुळे .. बहर सरला... गंध विरला.... झाले मुक्त फुलुनी उतरली धुंदी नजाकत वेळ झाली मिटायची परत बंद....परत मुग्ध.... मिटेन मी तुझ्यामध्ये गंधमुग्ध, स्पर्शमुक्त मिटेन मी तुझ्यामध्ये मिटेन मी तुझ्यामध्ये ......
काव्यरस

मिपाकरांच्या त्रासदायक सवयी

लेखक गोगोल यांनी शनिवार, 25/12/2010 06:34 या दिवशी प्रकाशित केले.
वा रे वा फक्त नवरा बायकोंच्याच सवयी त्रासदायक नसतात. मिपा करांच्या देखील काही त्रासदायक सवयी असतात. त्यापैकी टॉप १० (तुम्हाला मराठी काळात नसल तर इंग्लीश मधून मुख्य १०). १. चांगले चांगले लेख क्रमश: मध्येच दाबून ठेवणे. ज्यामुळे मिपा आलतु फालतू लेखांच्या भडिमारामुळे वाचनास निरुपयोगी होऊन बसते. २. आपले लेख किंवा प्रतिसाद अंगाशी यायला लागल्यावर (त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभ न राहता) उडवून लावणे. या भयंकर अ‍ॅनॉयींग सवयीबद्दल जितकं बोलाल तितकं कमीच आहे. पण आवरतं घेतो. ३. एकोळी धागे - निदान तुमच्या मताची तरी गरज असते. फक्त लिंक देऊन चालत नाही. ४.

लेवू दे निळाई..

लेखक स्वानंद मारुलकर यांनी रविवार, 19/12/2010 04:47 या दिवशी प्रकाशित केले.
झेपावत्या धरेला गगना कवेत घेई अंगांग तृप्त कर तू मज लेवू दे निळाई आधार मीच होते दुबळ्या जगास सार्य़ा माझ्या मनातूनी का पण शोधते निवारा जेव्हा तुला पहाते हरपून भान जाई देतोस रंग ओले माझ्या सुन्या मनाला क्षितिजास रेखिसी अन सौभाग्यरूप माला घे जिंकूनी मला तू अपुल्या गृहास नेई - स्वानंद
काव्यरस

गच्च मिठी शहारलेली

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 14/12/2010 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
हळुवार कातरवेळी गच्च मिठी शहारलेली चंदेरी किणार ल्यालेली आकाशी ओढणी रंगबिरंगी तव गालावर रेशमी किरणांची केशरी लाली जांभुळनयनात हरवली गच्च मिठी शहारलेली सोहळा रजनीगंधाचा स्पर्श रेशमी आनंदी .. लाजुनी दडला सूर्य ओठांची निशब्द बोली.. ---- शब्दमेघ (१४ डिसेंबर २०१०) * अवांतर : १. जांभुळनयन हा शब्दप्रयोग मी पहिल्यांदाच केला आहे, कदाचीत आश्चर्य वाटु शकते, पण माझ्या एका मैत्रीणेचे मोठे काळे पाणीदार डोळे पाहुन मला नेहमी जांभळाचीच आठवण यायची .. ही कविता त्या जांभुळनयनांना अर्पण ....
काव्यरस

प्रेम

लेखक संजयशिवाजीरावगडगे यांनी मंगळवार, 14/12/2010 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
मागितलेल्या सगळ्या गोष्ठी मिळतातच असं थोडी असतं, माणसावर जेवढं प्रेम करावं तेवढी ती दूर जातात. फुलांना जास्त कवटाळल्यावर पाकळ्याही गळून पडतात, ज्याला मनापासून आपलं मानलं तिच आपल्याला विसरुन जातात, फुले वाळू लागली की फुलपाखरं देखील सोडून जातात..
काव्यरस

युगलगीत : आलीया थंडी, साधूया संधी, चल पेटवू शेकोटी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 11/12/2010 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
युगलगीत : आलीया थंडी, साधूया संधी, चल पेटवू शेकोटी
तो: आलीया थंडी, साधूया संधी, चल पेटवू शेकोटी ||धॄ|| ती: नको नको आता नको, माझा बा आनल काठी तो: नको तू अशी दुर पळू नको नको तू अशी दुर राहू नको दोन प्रेमाच्या फुलामधी तिसरा भुंगा तू आनू नको ती: असं नको करू, जवळ नको येवू माझा भाऊ लागलं आपल्या पाठी तो: अर्रर्रर्रर्रर्रर्र, ह्या असल्या थंडीत चल पेटवू आपण शेकोटी ||१|| तो: ते बघ तुला दिसतंय काय ती: काय? तो: अगं, ते बघ तुला दिसतंय काय एक राघू, त्याची मैना, चोच चोचीत जाय ते बघ...
काव्यरस

मन पखरु

लेखक अनिल आपटे यांनी शनिवार, 27/11/2010 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
मी तिला पाहिलं तिने मला पाहिलं दोघांनी एकमेकांना स्मितहास्य दिलं कळलं नाही केव्हा एकमेकात गुंतत गेलो जणू फुलावर फुलपाखरू बसलं आणि पाकळी होऊन गेलं
काव्यरस

अधुरी प्रेम कहाणी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 25/11/2010 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
अधुरी प्रेम कहाणी का पुन्हा पुन्हा मी शोधते त्या भुत काळातल्या वाटा. का दु:ख्ख करुन घेते. जेंव्हा पायी रुततो काटा बसता अशा कातर वेळी कानी कोण गुणगुणे गाणी? झोंबताना ह्या कोवळ्या तनुस कोण करते भलतीच मागणी? ज्याने ह्रुदयास पीडा दिली तोच कसा ह्रदयी बसला? कोवळ्या मम तनुस छेडुन यौवन कसे जागवून गेला. कसा मी विसरु त्याला तो रोम रोमात भिनला सारखा तो आठवतो का? जो जखमा देवुन गेला तुझी लागलेली हि आस हा भास कि आभास आहे तु आता माझा नाहि हे मज का उमगत नाहि? केंव्हा सरेल ति माझी काळरात्र घनघोर अंधारी? कधि उजाडणार मम जिवनी ति पहाट सोनेरी? काय सांगु काय बोलु मन माझे था~यावर नाहि दाटुन येते निर नयनि लिहित
काव्यरस

जीव गुंतला ( चाल : खेळ मांडला )

लेखक गणेशा यांनी बुधवार, 24/11/2010 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय पाचोळ्या तुझ्या आठवांची मनी पानं उभी र्‍हाई साद सुन्या आभाळाची तुझे गीत गाई तरी मेघ दाटला हा पाचोळ्याच्या ठायी हरवल देह भान मावळल्या नभी झाकोळुनी हरवतो श्वास वेडापिसा वनवा ह्यो उरी पेटला... जीव गुंतला जीव गुंतला ....जीव गुंतला ...जीव गुंतला...जीव गुंतला सोडली रे फ़ुलपान घेतला वसा तुझा तूच प्रीत दाखीव गा जीव गुंतला ओली दवा थंडगार, झोंबती रे ही हवा ह्यो तुझ्याच काळजात जीव गुंतला ओघळली प्राणज्योत दुर, डोंगर , दु:खाची खायी झडलेल्या झाडापरी जीनं, अंगार, जीवाला जाळी आस घेयी भिडायाला पीरतीची ओढ दे बोलवीती प्रीतगान वादळात झेप घे उसवला श्वास राजा संपला प्रवास तरी न्हाई प्राण सोडला ...
काव्यरस