मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लेवू दे निळाई..

स्वानंद मारुलकर · · जे न देखे रवी...
काव्यरस
झेपावत्या धरेला गगना कवेत घेई अंगांग तृप्त कर तू मज लेवू दे निळाई आधार मीच होते दुबळ्या जगास सार्य़ा माझ्या मनातूनी का पण शोधते निवारा जेव्हा तुला पहाते हरपून भान जाई देतोस रंग ओले माझ्या सुन्या मनाला क्षितिजास रेखिसी अन सौभाग्यरूप माला घे जिंकूनी मला तू अपुल्या गृहास नेई - स्वानंद

वाचने 1261 वाचनखूण प्रतिक्रिया 3