तुझ्यामध्येच रमले होते..
तुझ्या मूळेच फुलले होते...
उमलले तुझ्यामुळे
गंधले तुझ्यामुळे...
कोवळ्या अन मुग्ध या
रेशीम स्पर्शी पाकळ्या
खुलल्या तुझ्यात अन्
उमलल्या तुझ्यामुळे..
गंध भरल्या पाकळ्यांची
ही नजाकत मखमली
टवटवी अन् हा तजेला..
लाभला तुझ्यामुळे ..
बहर सरला... गंध विरला....
झाले मुक्त फुलुनी
उतरली धुंदी नजाकत
वेळ झाली मिटायची
परत बंद....परत मुग्ध....
मिटेन मी तुझ्यामध्ये
गंधमुग्ध, स्पर्शमुक्त
मिटेन मी तुझ्यामध्ये
मिटेन मी तुझ्यामध्ये ......
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1869
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा व्वा,मस्तच !
"परत बंद....परत
अगदी असेच म्हणतो. सुंदर
In reply to "परत बंद....परत by पाषाणभेद
कोवळ्या अन मुग्ध या रेशीम
मस्त...
गंध भरल्या पाकळ्यांची ही
मस्तं !
छान आहे
माझा चष्म्याचा नंबर