Skip to main content

प्रेमकाव्य

अवचीत यावं कुनी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 04/09/2010 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
रंगमहाली बसले असता अवचीत यावं कुनी रंगमहाली बसले असता अवचीत यावं कुनी हातामदी हात धरावा तुम्ही ||धृ|| आठवनीचे पाखरू उडती कंटाळ्यामधी रातदिस जाती सोबतीला कुणी असावं "कसं चाललं तुझं" पुसावं असं वाटत मनी ||१|| कालपासनं लवतो डावा डोळा नजर जायी दारी कितीक वेळा कुनीतरी भेटाया का येईल का रात अशीच एकटी जाईल वेडी शंका येई मनी ||२|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०४/०९/२०१०
काव्यरस

नि:शब्द ……! ! !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी शुक्रवार, 03/09/2010 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
नि:शब्द ……! ! ! प्रीतीची आब अपुल्या, तू कधी ना राखली, अर्पिले सर्वस्व तुजला, परी प्रीत तू ना जाणली. होता कधी अधिकार तुजवर, तोहि अता ना राहिला, आसवाचा हक्क माझा, तोहि तू ना ठेवला. विरहाचे दुखः माझे, सांगू कुणा, आणिक कसे ? अंतरीचे शब्द शब्द, नयनांत मी आणू कसे ? निरंजन वहाळेकर
काव्यरस

भेटेन पुन्हा एकदा... नव्याने पुन्हा...

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी गुरुवार, 02/09/2010 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
भेटेन नव्याने पुन्हा माहित नाही कसे अन केव्हा कधी बनेन एक मुग्ध कल्पना अन उतरेन चित्रात तुझिया चित्रामधील बनून रेषा साठवीत राहीन नजरेत तुजला भेटेन पुन्हा ...नव्याने पुन्हा बनून कोवळ्या किरणाचा कवडसा विरघलेन तुझिया हर एक रंगा रंगेन मी चित्रात तुझिया भेटेन पुन्हा एकदा पुन्हा एकदा माहीत नाही कशी अन केव्हा परी भेटेन पुन्हा एकदा नव्याने एकदा किवा बनून थेंबांचा शीतल शिडकावा उसळून उधळेन तुझ्यावरी स्वत:ला मिटवेन धग अन दाह मनाचा थंड शिरशिरी अन धुंद गारवा बनून भेटेन पुन्हा एकदा ..पुन्हा एकदा इतकं नक्की ठाउक आहे मला या जन्मी तू राहशील माझा..

प्रणयाचा पाऊस!

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 28/08/2010 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस बरसला, सुगंध पसरला! श्वास मोहरला, सहवास बहरला! मंद तारा, धुंद वारा! प्रेमात ओला, आसमंत सारा! मन फुलले, तन उमलले! प्रणय पाहूनी, क्षण थांबले!
काव्यरस

कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 28/08/2010 07:56 या दिवशी प्रकाशित केले.
कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड
या धाग्यातील प्रतिसादांमध्ये मंदार व प्रसाद जोशींनी म्हटले होते: ">कोथरुड थोडं सं रुड वाटटं नाई ?!! खत्रूड शी यमक जुळतं नै, कोथरूडचं >>>> ह्यावर एक मस्त कविता लिहिता येईल !!१ चला यमकं जमवुया" मंग काय? आसली भारी सिच्यूएशन दिल्यावर लगेच लिहून काढली कविता. वाचा तर मग:
कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड म्या जवा भेटाया जातो काशीला.... तवा... तवा...
काव्यरस

प्रेमाची बँक

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 27/08/2010 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमाची बँक
तुझ्या दिलाच्या बँकेमध्ये माझे अकाउंट उघडतेस का? माझे अकाउंट उघडतेस का? माझ्या प्रेमाच्या सेव्हिंग्जवर काही रिटर्न देशील का? ||धृ|| खाते ओपनकरण्यासाठी प्रेमपत्राचा अर्ज लिहीला प्रेमजाणत्या मित्राला ओळखीसाठी तयार केला इनवर्डला पडला अर्ज, आता सहिशिक्का मारशील का? तुझ्या दिलाच्या बँकेमध्ये माझे अकाउंट उघडतेस का?
काव्यरस

लावणी: जाल हो राया उद्या

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 26/08/2010 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
लावणी: जाल हो राया उद्या
जाल हो राया उद्या,रात आजची खास शृंगाराच्या राती थांबा आज विनवीते तुम्हास ||धृ|| हात नका धरू हाती, सोडा मज थोडी लांब नाही जायची नको ओढा ओढी तुमच्या अशा वागण्यानं वेगळं वाटं खास शृंगाराच्या राती थांबा आज विनवीते तुम्हास ||१|| तुम्ही शेवंती गजरा आणला मला माळला शुर रसीक पाहूनी तोरा जिव भाळला कसं जगावं तुम्हावीण लागली तुमची आस शृंगाराच्या राती थांबा आज विनवीते तुम्हास ||२|| कालच्या
काव्यरस

महा विडंबन स्पर्धा

लेखक आमोद शिंदे यांनी शनिवार, 21/08/2010 04:24 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच एका चर्चेत एक महावाक्य वाचलं आणि लक्षात आलं की हा तर समस्त विडंबकांसाठी अफलातून कच्चा माल आहे. तेव्हा म्हंटलं आपणंच एक मिपावर छोटीशी स्पर्धा आयोजित करु. युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् || ह्या धाग्यावर जो ह्या महावाक्याचे सर्वात दर्जेदार बिडंबन करुन दाखवले त्याला ह्या आठवड्याचा बिडंबक पुरस्कार देण्यासाठी मी स्वतः सरपंचाकडे शिफारस करेन. तर लोकहो येउद्यात एक से एक विडंबने.

कविता माझी होशील का ?

लेखक निरन्जन वहालेकर यांनी बुधवार, 18/08/2010 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
कविता माझी होशील का ? भेटलीस तू अवचित मजला, प्रीतिचा नव वसंत फुलला, प्राजक्त होऊनी वसंतातले, कवनी माझिया बरसशिल का ? कविता माझी होशील का ? रिमझिम रिमझिम पावसातल्या, च्रोरून अपुल्या भेटीगाठी, आठवणीत त्या चिब होऊनी, कवनी ओलेती प्रगटशिल का ? कविता माझी होशील का ? काय जाहले गमे न मजला, आभासे तू ठायी ठायी, आभासांचे गंध होऊनी, कवना गंधित करशिल का ? कविता माझी होशील का ? सांगायचे मज बरेच काही, मनांत तुझिया तसेच विरले, उकलूनीया ती गुपिते सगळी , कवन सांगता करशील का ? निरंजन वहाळेकर
काव्यरस

जनजागृतीसाठी हा मेल देत आहे!

लेखक शानबा५१२ यांनी शनिवार, 14/08/2010 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार्,नमस्कार.......... प्रथम महत्वाच्या व लक्षात ठेवण्याच्या गोष्टी : १)हा लेख १००% सत्यघटनेवर आधारलेला आहे,कुणास कोणतीही शंका असल्यास ती स्वःतकडेच ठेवावी,आम्ही खुलासा करणार नाही.