Skip to main content

दो डोळ्यांचे....

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 04/10/2019 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
दो डोळ्यांचे झरते पाणी इथून मजला स्पष्ट दिसे त्या पाण्याच्या आवेगावर ओठावरले गीत फिरे डोळ्यांमधल्या रेषा तांबूस पूरी सांगते व्यथा खरी सांगायाला शब्द कशाला झुळूक हळवी एक उरी गदगद्णारे हृदय राजसा तुझा पोचतो इथे हुंदका पाण्यालाही जागर असतो दिव्यात नसते केवळ ज्वाला सहवासाचे अत्तर नाही तरी मिठीचा भास कोवळा इथे तिथेही कुठेच नाही तरी बहराचा शुद्ध सोहळा -शिवकन्या

वाचने 3754
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

सांगायाला शब्द कशाला झुळूक हळवी एक उरी पाण्यालाही जागर असतो दिव्यात नसते केवळ ज्वाला इथे तिथेही कुठेच नाही तरी बहराचा शुद्ध सोहळा
ह्या ओळी खुप म्हणजे खुप आर्त वाटल्या.. निव्वळ अप्रतिम पुन्हा पुन्हा वाचली कविता.. लिहित रहा... वाचत आहे..