Skip to main content

नाट्य

श्यामरंग.. त्या, त्यांचे प्रश्न आणि कृष्ण!- निमंत्रण

लेखक प्राची अश्विनी यांनी सोमवार, 20/05/2019 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, नमस्कार! श्यामरंगच्या ठाण्यातील दोन यशस्वी प्रयोगानंतर आता मुंबईत येत आहोत. सर्व मिपाकरांना आग्रहाचं निमंत्रण! "मटा कल्चर क्लब" सोबत, सादर करीत आहोत.... श्यामरंग...त्या, त्यांचे प्रश्न आणि कृष्ण! तो सावळा, श्रीरंग..! त्या श्यामरंगात रंगलेल्या.. काय वाटलं असेल त्यांना कृष्णाबद्द्ल? काय प्रश्न विचारतील त्या कृष्णाला? प्रत्येकीचा कृष्ण निराळा.. प्रत्येकीचा प्रश्न निराळा.. त्या प्रश्नांचा रंग... श्यामरंग... त्या, त्यांचे प्रश्न आणि कृष्ण! एक आगळावेगळा नाट्य संगीत नृत्याविष्कार! अंतर्नाद निर्मित, अपूर्वा प्राॅडक्शन्स प्रस्तुत सारस्वत को.ऑ. बँक प्रायोजित "श्यामरंग...

(दाराआडचा यजमान)

लेखक नाखु यांनी शुक्रवार, 26/04/2019 या दिवशी प्रकाशित केले.
एक यजमान दाराआडून (नेत्रछिद्रातून)बाहेर बघतो किती बाहेर? दाराच्या बाहेर, जिन्याच्या पार जिथे एक अनाहुत आला असेल बहुदा .... असेल का तो अनोळखी, का बघून ओळख न दाखवणारा ? येत असेल का तो ही आप्तांच्या घरी , बिनकामाचा कुणाकडे? यजमान दाराआडून बाहेर येऊ शकत नाही... (पेपरातील बातम्या आणि माणसूकीची फसवणूक मानेवर जख्ख बसलेली असते) मग तो कल्पनेचे पंख पसरतो, त्या पंखावरुन अलगद फिरुन लेकरांना, मित्रांना भेटून येतो डोळे मिटून घेऊन यजमान शांतपणे खुष राहतो.... दूरदेशी लेकरे आपल्याच जगात पाक्षिक आठवणीत ठेवून जमेल तसं (तर) चिमुकल्यांच्या हट्टाने दृकश्राव्य माध्यमातून (च) भेटत राहतात...

(तू मतदार माझा)

लेखक नाखु यांनी रविवार, 21/04/2019 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना - विळखा पाहू तू मतदार माझा भोट, भोंगळ अजीजी तुझे मत मागण्या तुलाच नादी लावणारा मस्तवाल नेता मी .... घेऊन जमेस तुला निव्वळ उगी तुंबडी भरावी बोभाटा करावा मी एव्हढा की लाभावी मज(समोरची) वाटणी सर्व अडेल,पडेल,चढेल, संधिसाधू,भूछत्री उमेदवारांना समर्पित. वाचकांचीच पत्रेवाला नाखु बिनसुपारीवाला

क्रिमिनल जस्टीस

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 19/04/2019 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या कोणत्याही सिरीज मध्ये ड्रग्स, सेक्स पंकज त्रिपाठी यांची फोडणी मारली कि ती हमखास यशस्वी होते असा सिरीज बनवणाऱ्यांचा समज आहे. मग कथा कितीही कच्ची असो पंकज त्रिपाठी आहे ना तो हमखास अभिनयाच्या जोरावर सिरीज तारून नेतो. The Night Of चं भारतीय रूपांतर असलेल्या 'क्रिमिनल जस्टीस' या 'क्राईम-कोर्टरूम ड्रामा' मध्ये सशक्त कथा सोडून वरच्या तिन्ही गोष्टी आहेत. पण शेवटी जो धक्का दिलाय फक्त त्यासाठी हि सिरीज पहावी. कॅब चालावणारा एक मुलगा त्याच्या कॅब मध्ये प्रवासी म्हणून बसलेल्या मुलीचा फोन गाडीत राहतो म्हणून परत करायला जातो.

तिच्या पोस्ट्स त्याला खूप भावायच्या

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 14/04/2019 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या पोस्ट्स त्याला खूप भावायच्या कविता मुक्तक ती पोस्टायची कविता आशयघन असायच्या चपखल शब्द रचना भाव गर्भ भाव कवितेत असायचे तिच्या पोस्ट्स ना तो कायम लाईक मारायचा तशी तिची मित्र यादी तुरळक होती पन्नास साठ मित्र मैत्रिणी ची यादी आठवड्यातील ती साधारण तीन ते चार पोस्ट्स पोस्टायची दोषांचे छान जमले होते तो तिच्या सांगे च्याटिंग करायचा त्यातून त्याला समजले कुंदा जोशी तिचे नाव नगरपालिकेत कामाला होती त्या ने तिचा फोन नंबर घेतला होता नियमाने बोलायचा तो व ती बोलता बोलता संकोच गाळून पडला व मन मोकळ्या गप्पा कधी सुरु झाल्या त्या त्यांनाही कळाले नाही मग त्याने तिला प्रपोज केले डायरेक्त्त ती

परात

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 14/04/2019 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या उन्हाळ्याची गोष्ट आहे..कडक उन्हाळा चालू .. फेसबुकावर एक पोस्ट वाचली .. यावर उपाय म्हणून परात घ्यायची त्यात गार पाणी ठेवायचे.. पंखा चालू असतो खोली छान पैकी गार रहाते ... आयडियाची कल्पना बरी वाटली ,,व परात पाणी भरून पलंगाजवळ ठेवली मध्यरात्री लघुशंकेस उठलो ..अंधार होता पाय नेमका परातीच्या कडेला पडला परात कलंडली मोठा आवाज झाला अन पाणी खोलीत पसरले ... मोठा आवाज झाला हि उठली लाईट लावला घर भर पाणी होते .... ती चिडली झोप मोड झाल्याने तिला सांगत होतो.. म्हणाली त्या फेसबुकावर काही तरी वाचता अन प्रयोग करता .. रात्र लादी पुसण्यात गेली वर हिचा ओरडा खाल्ल्ला तो निराळाच

यात्रा

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी बुधवार, 03/04/2019 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा शशक स्पर्धेने प्रेरित होऊन मी देखील काही खरडलय. " पप्पा आज नक्की यात्रेला जायचं ना? आज शेवटचा दिवस." "हो बेटा. आज नक्की" "ताई, बाबा आज हो म्हणाले, तू काय घेणार? मी ढोल घेईन बाजूच्या बाळ्याने घेतलाय ना तसा" "बाळ्या, आज आम्ही यात्रेला जाणार" "आजी तू पण येशील ना?" "नाही रे, मला चालवत नाही" "बरं, तुझ्यासाठी पण काहीतरी आणीन" घडाळ्यात रात्रीचे दहा वाजलेले. "घे आज पण आला तुझा बाप ढोसून, झोप नाहीतर आज बी दिल तो फटके." - आई. आजीची सहानुभूतीची नजर चोरून त्याने चादर तोंडावर ओढली.

गेम ऑफ थ्रोन्स पार्श्वभूमी

लेखक nishapari यांनी बुधवार, 13/02/2019 या दिवशी प्रकाशित केले.
गेम ऑफ थ्रोन्सच्या कथानकाची पार्श्वभूमी थोडक्यात - वेस्टेरोज या प्रचंड प्रदेशात सात प्रमुख घराणी व त्यांची 7 राज्यं आहेत . ती घराणी म्हणजे बरॅथिऑन , स्टार्क , लॅनिस्टर , टार्गेरियन्स , ग्रेजॉय आणि टली , टायरेल आणि सातवं मार्टेल . मालिकेची सुरुवात होते तेव्हा किंग रॉबर्टस राजा आहे आणि बाकीची सगळी राज्यं मांडलिक .. किंग रॉबर्ट्स हा वंशपरंपरागत राजा नाही .. त्याच्याआधी टार्गेरियन्स या घराण्याची सत्ता होती , पहिल्या एपिसोड मध्ये जे चंदेरी केसांचे भाऊ बहीण व्हिसेरिस व डॅनेरिस भेटतात त्यांच्या घराण्याची .

गोदाक्का

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 27/01/2019 या दिवशी प्रकाशित केले.
मे महिन्यात सारे जमले होते राम मामा -वैशाली मामी त्यांची २ मुले -मधुकाका -वासंती काकू राधा मावशी आमरसाचा तुडुंब जेवण झालं होत राधाक्कां सार आवरा आवर केली मंडळी जमेल तशी मिळेल त्या जागेवर पडून घोरत होती गोदाक्का ने मोकळी जाग शोधली व जमिनीला पाठ टेकवली व घोरु लागली बाहेरून राम मामा आला त्यानं गोदाक्काला घोरताना पाहिलंत तिच्या भोवती डास घोंघावत होते त्याने बाजूला पडलेली नवी कोरे पांढरी चादर तिच्या अंगावर टाकली राधा मावशी बाजारात गेली होती तिने पूजेसाठी फुले हार बुक्का हळद कुंकू आणले होते आप्पा च वय ७७ आजारी असायचे गोद ला अंगावर चादर असलेली व्यक्ती बघता निराळाच संशय आला घरात मृत व्यक्

सकाळी सकाळी

लेखक प्रमोद पानसे यांनी बुधवार, 02/01/2019 या दिवशी प्रकाशित केले.
ग्लोबल इंटरनॕशनल स्कुलच्या प्री प्रायमरी सेक्शनच्या गेटवर आज एक नाट्य बघायला मिळालं.मी नेहमी सकाळी कामाला जाताना धवल मधे चहा प्यायला थांबतो .आजही चहा घेत असताना.समोर एक गाडी थांबली.आतुन एक पारोसा झोपाळलेला ,केस विस्कटलेला बाबा त्याचं गोंडस पिल्लु घेउन बाहेर पडला.गुबगुबीत जर्कीनच्या आतलं तेवढंच गोंडस गोरंगोरं बाहुलं बापाच्या गळ्याला मिठी मारुन बसलं होतं.एका खांद्यावर त्या बाहुल्याचं शिक्षण बांधलेली धोपटी आणी दुसर्या खांद्यावर बाहुली असा लवाजमा घेत कसंबसं गाडीचं दार लावुन आणी बाहुल्याची पप्पी घेत गप्पागोष्टी करत बाप शाळेच्या गेटकडे पोहचला.गेटवरच्या वॉचमन कडे सॕक देत बापाने लेकराला खाली उतरवले.चि