Skip to main content

नाट्य

अतृप्त आत्मा 13

लेखक प्रमोद पानसे यांनी सोमवार, 17/12/2018 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
एरवी आमच्याशी प्रेमाचे धड चार शब्दही न बोलणारी आमची बायडी आज आमच्या विरहाने एवढी व्याकुळ झालेली बघुन आम्हालाही गलबलुन आलं. थोड्या वेळात सावरलेली बायडी अचानक सावध होत तिथुन उठली.आणी आलेच असं म्हणत स्वयंपाकघरात गेली.तीच्या एकंदर हलचाली संशयास्पद वाटल्याने आम्हीही तरंगत तीच्या मागे गेलो.आत सर्व सन्नाटाच होता .भराभरा तांदुळाचं पिंप उघडत तीने आतुन रुमालाचं एक छोटंस गठुडं बाहेर काढलं. अॉ !

अतृप्त आत्मा 12

लेखक प्रमोद पानसे यांनी रविवार, 16/12/2018 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
नान्याला छळण्यात आम्हाला आता काहीही स्वारस्य उरलं नव्हतं.अपेक्षित दहशत त्याच्या मनात बसलेली असल्याने तो आता आमचं सर्व ऐकायला बांधील होता. नाना नानीची वरात पुन्हा प्रेसजवळ पोहचल्यावर नाना थंडीने आणी भितीने थरथर कापत जीन्यावरुन घरात गेला.आता त्याला आरामाची गरज होती.एकंदर सर्व घटनाक्रमाचा त्याच्या मनावर ताण निर्माण झाला होता .आता पुन्हा जर काही घडते तर तो देखील नानीला विधवा करुन आमच्याबरोबर वावरायला मोकळा झाला असता.आणी आम्हाला ते नको होते. त्याला तात्पुर्त सोडुन आम्ही त्याच्या अॉफीसमधे आता पुढे काय करायचं याचा विचार करीत त्याच्याच खुर्चीत रेलुन बसलो. एव्हाना सकाळ झाली होती.आणी आमचे अस्थि साव

अतृप्त आत्मा 11

लेखक प्रमोद पानसे यांनी रविवार, 09/12/2018 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
खुप कंटाळुन आम्ही टेबलवरुन उडी मारली .आणी खुर्ची शेजारी उभं राहुन एक हात नान्याच्या खांद्यावर ठेवत दुसऱ्या सहाताने टेबलवरचं रजिस्टर उचललं. "नान्या हरामखोर ! मुडद्याच्या टाळुवरचं पण चाटतोस ? साल्या लाज वाटली पाहिजे तुला ." त्याचं मानगुट पकडत आम्ही ओरडलो. दचकलेला नाना एकदम भयभीत नजरेने बघु लागला. डायरी ,कॕलेंडर सगळं बंद करुन त्याने ड्रॉवर उघडुन 100/- च्या नोटांच बंडलच काढुन टेबलवर ठेवलं. "हे घे बाबा ! आणी सोड मला .तुझा तीन महिन्याचा पगार घे आणी जा एकदाचा इथुन " नान्या गयावाया करु लागला. " हे मी घेउन काय करु ?

आणि... डॉ काशीनाथ घाणेकर

लेखक मकरंद घोडके यांनी बुधवार, 28/11/2018 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी नाट्यसृष्टीतला पहिला नाही तर अखेरचा सुपरस्टार! घाणेकरांच्या पत्नी कांचन घाणेकर यांच्या "नाथ हा माझा" वर आधारित हा biopic सिनेमा अक्षरशः लोकांना ओढू ओढू नेतोय सिनेमाघरात! काय चुम्मा कामं केलीत सर्वांनी!!! सुबोध बद्दल काय बोलावं? आपली पात्रताच नाही ती! त्याने फक्त अशी सुंदर कामं करत राहावीत आणि आपण मंत्रमुग्ध होऊन ती पाहत राहावीत इतुकीच आपली पात्रता!! मला दोन लोकांबद्दल विशेष बोलायचं आहे सुमित राघवन ने त्याच्या अंदाजात डॉ लागू असे काही बेमालूम मिसळले आहेत की सुमित आणि डॉ लागू वेगळे असूनही कुठेही तुलना करावीशी वाटत नाही!

अतृप्त आत्मा -10

लेखक प्रमोद पानसे यांनी रविवार, 18/11/2018 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्याकडे बघताना नानाची नजर आजीबात स्थिर नव्हती.भयचकीत नजरेने आणी विदीर्ण चेहऱ्याने बघत नाना किंचाळला. "बाप्या भडव्या ! हा काय चावटपणा लावलायस " " हॕ हँ !! मालक माझा बोनस आणी मागच्या महिन्याचा पगार राहिलाय तो घ्यायला आलोय. देताय ना ?" आम्ही विचारलं "पण तु इथं कसा आला परत ? तु तर मेलायस ?? आत्ताचा तर तुला पेटवुन आलो आम्ही " नाना गोंधळल्या घाबरल्या आवाजात बोलला. " नाना ! तु आणी तो म्हातारा गोखल्या जो पर्यंत जिवंत आहात ना तो पर्यंत या बापु जोश्याला मुक्ती नाही. तुझं आणी आप्प्याचं सगळं बोलणं ऐकलय मी " आम्ही जरा जरबेतच बोललो. "म्ह..म्हणजे तु भु..भुत " नाना तातरायला लागला होय !

ॲडमिशन Engineeringची : एक नाट्यछटा

लेखक चिगो यांनी शनिवार, 17/11/2018 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
लेखक : कोणी का असेना. स्थळ : इशान्य भारतातील एक राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे कार्यालय पात्र : सरकारी बाबू ( श्री. ना.पा. सघोडे) पिता ( श्री. फा.र. चतापलेले) पुत्र ( संदर्भास) इतर सोयीनुसार पार्श्वभुमी : अभियांत्रिकी शिक्षणासाठीच्या जागांचे सुयोग्य आणि यथार्थ वाटप व्हावे, म्हणून केंद्र सरकारने CSAB - NEUT ( Central Seat Allotment Board - North East & Union Territories) ची निर्मिती केली आहे. सदर प्रक्रियेनुसार जागांचे वाटप व भरती होऊन आता जवळपास दोन महीने लोटले आहेत. ( पडदा वर जातो. सरकारी बाबू कार्यसिद्धी करताहेतसे दाखवून समयप्रलाप करीत आहेत.

अतृप्त आत्मा -९

लेखक प्रमोद पानसे यांनी शनिवार, 17/11/2018 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
आप्पाला चाळीपाशी सोडुन नानाच्या गाडीने यु टर्न घेतला आणी ती प्रेसकडे पळु लागली.उद्या दोन तीन डिलीव्हरीज द्यायच्या असल्याने आणी आमदारपुत्राच्या लग्नपत्रीका प्रिंट करायच्या असल्याने नानाने रात्रपाळी चालु ठेवलेली.दिवाळीच्या काळात ही धावपळ नेहमीचीच होती. मागच्या सिटवरुन आम्ही नानुच्या शेजारी स्थानपन्न झालो.आणी आमचं अस्तित्व जाणवुन देण्यासाठी आम्ही एकच क्षण नानाच्या खांद्यावर हात टाकला. दचकलेल्या नानाने एकदम डावीकडे बघीतले .आमच्या अर्धाच सेकंदाच्या दर्शनाने नाना नखशिखांत हादरला होता.आणी ब्रेक सोडुन त्याने एक्सेलवर पाय दाबला .कंट्रोल सुटुन गाडी बाजुच्या गटारात आदळुन कलती झाली.लघुशंकेला उभ्या असलेल

अतृप्त आत्मा -८

लेखक प्रमोद पानसे यांनी शनिवार, 17/11/2018 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
" बापु ! म्या काय घोडं मारलय वं तुमचं ? कशापै माग धरुन बसलावं ?? " बाबल्या अर्ध सुगडं तोंडात ओतुन रडायला लागला. " भाड्या ! माझ्या उधारीची बोंब मारत होतास ना मगाशी ? म्हणुनच आलोय परत .तुझी उधारी चुकवयला " आम्ही " ओ बापू ! उधारीचं सोडा ,तुमच्या आख्या खानदानाची ,पुढच्या धा पिढ्यांची हजामत फुकटात करुन द्देतो इथुन पुढं .पन सोडा मला .दया करा " बाबल्या कासाविस झाला . "अन कुठं बोलनार बि नाय ,आयच्यान गप बसुन भादरीन तुमची पोरं " बाबल्या काकुळतीला आला. नान्या पाडेगावकर आणी आप्प्या अजुनही नान्याच्या गाडीपाशी कायतरी बोलत होते.बहुतेक आमचीच निंदानालस्ती चाललेली. " बाबल्या !

अतृप्त आत्मा -७

लेखक प्रमोद पानसे यांनी शुक्रवार, 16/11/2018 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
तिकडे आकाशाची लाली पुर्ण ओसरली होती.हळुहळु सुर्य समुद्रात विरघळला .एक बारीक लाल रंगाची रेघ लाटांवर डचमळत विलीन झाली .आणी इकडे फट् आवाज करत कवटी फुटली.चला !चला !!

अतृप्त आत्मा -६

लेखक प्रमोद पानसे यांनी शुक्रवार, 16/11/2018 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
एव्हाना सुर्य मावळतीला आला होता.सर्व बांधाबांध होउन आमची पालखी स्मशानाकडे मार्गस्थ झाली होती.आमची काही ठराविक लोकप्रियता आक्रंदत आणी बाकी बघे आणी टगे फॉर्मलिटी म्हणुन पालखीत सामिल झालेले.मजल दरमजल करत पोहचलो एकदाचे मुक्कामी.आमच्या जाण्याने घरातही तसा काही फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला नव्हताच.सर्व वातावरण साधारण स्थिर होतं .आमच्या एकंदरीत वर्तणुकीचा परिणाम . त्यामुळे झाल्या गोष्टीचं दुःख न बाळगता आम्हीही सुर्यास्ता कडे डोळे लावुन बर्याच वेळानंतर पुन्हा एकदा मानवी रुपात परत येण्याची आणी राहिलेल्या इच्छापुर्ती करण्यासाठी आमच्याच अंत्यविधीची वाट बघत बसलो होतो. शंभ्याने ठरवुन ओली लाकडे आणुन नेहम