काल दुपारची गोष्ट.... साधारण साडेतीन चार.....
आळशीपणाची दुलई अंगावर पांघरून मस्तपैकी पुस्तक वाचत लोळत पडलो होतो....
आज आंघोळ होणार आहे की नाही?....कमरेवर दोन्ही हात ठेऊन मान तिरकी करत तिने विचारलं
खरं म्हणजे तो प्रष्ण नव्हता....
ती धमकी होती.....
काळ आंघोळ केली होती ना!...आज नाही केली तर नाही चालणार का?
काल जेवण केलं होतं ना,मग आज केलं नाहीतर चालणार नाही का?...हातात टॉवेल कोंबत तिने विचारलं
मी आता पुढच्या जन्मी एस्कीमोच होणार आहे....मी हसत म्हणालो
काहो बाबा?...एक्सिमो कशाला?...छोटे नवाब का एंट्री के साथ सवाल....
आबे येडे....वहां पे ईत्ती ठंडी मे कोयी एक्सिमो नहाता होगा क्या ?...
वा,बाबा मी पण तुमच्या बरोबर एक्सिमो होणार....त्याने लगेच आपली पण ऍडव्हान्स बुकींग करून टाकली....
एक्सिमो होऊन कायमस्वरूपी आंघोळीला कट मारायची आयडीया त्याला भयंकर आवडली असावी....
कपाळावर हात मारत ती हतबलपणे हसली....आणी ओठातल्या ओठात काहीतरी पुटपुटली....
तो शब्द मी लगेच ओळखला....
बेशरम....
आता, इतक्या वर्षात एव्हडा गेस तर येतो ना राव....
तिने दिलेलं अवॉर्ड मी लगेच त्याच्या बरोबर शेअर करून टाकलं....
फिफ्टी फिफ्टी...एक पर्सेंट भी कम नही...
मनावरचं ओझं लगेच पन्नास टक्क्यांनी हलकं झालं....
आपण नेहमी ईतके सुखी आणी आनंदी का असतो ह्या रहस्याचा शोध लागला
निर्लज्जम सदासुखी....
गालातल्या गालात हसत मी बाथरूम चं दार ढकललं.....
वाचने
3793
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
.
नसीहत के लिये शुक्रिया
In reply to . by संजय क्षीरसागर
संजयजी,
In reply to . by संजय क्षीरसागर
३.०१ ला जनातलं मनातलं ला
In reply to संजयजी, by अभ्या..
३.०१ ला जनातलं मनातलं ला तुमचा लेख तयार करत होतात, अजून आला नाही होत्याचाच तर स्क्रीन शॉट आहे हा.. बाकी सर अजून विंडोज एक्स्पी वापरतात हे एक निरीक्षण नोंदवतो आणि खाली बसतो.त्यात काय पाटील, एक्सपी भारीय
In reply to ३.०१ ला जनातलं मनातलं ला by संजय पाटिल
सरांचा याहूमेल आयडीसुद्धा
In reply to ३.०१ ला जनातलं मनातलं ला by संजय पाटिल
+१
In reply to सरांचा याहूमेल आयडीसुद्धा by सतिश गावडे
हुंडाईची सँट्रो तुफान चालली तरीही त्यांनी "i xx" आणली.
In reply to सरांचा याहूमेल आयडीसुद्धा by सतिश गावडे
गालातल्या गालात हसत मी बाथरूम
बाथरूम चं दार ढकललं....
In reply to गालातल्या गालात हसत मी बाथरूम by उगा काहितरीच
हे असं खुसखुशीत, हलकंफुलकं
फुल्टू,वासूनाका
In reply to हे असं खुसखुशीत, हलकंफुलकं by सतिश गावडे
ओहो....
आंघोळीचा उत्सव?...ई का है भैय्या ?
In reply to ओहो.... by अभिदेश
काहि नाही हो..
खरोखंर!
In reply to काहि नाही हो.. by संजय पाटिल