मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

झोप

वडापाव ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
दुपारी माझा सूर्य उगवे मावळतीची नसे निश्चित वेळ जाग आल्यास झोपी जाण्याचा असाच आहे माझा हा खेळ सकाळी उठवून म्हणते आई शाळेला जायचंय कर घाई दोन मिनिटांत उठतो म्हणुनी माझी स्वारी झोपून जाई कविता पाठ होत नाही कडवे किती बडे बडे झोपेत बनवे मी कित्येक गाणी आनंदी आन

व्हेलेंटाईन्स डे...२

प्राजु ·
पहिल्या भागात पान उलटावे लागत असल्यामुळे इथे सुरू करत आहे. आपण सगळ्यांनी पुन्हा भरभरून लिहावे हीच विनंती.. तुझ्या डोळ्यांतल्या नभी माझे स्वच्छंदी विहरणे निळ्या मेघात दाटूनी सरीतूनी बरसणे.. - प्राजु

दिशा, वाट अन् `वाट'

आपला अभिजित ·
लेखनविषय:
बिनचेहर्‍याच्या अफाट शहरात होता मला एक जीवलग मित्र जणू हरवलेल्या माणसांमधलं माझं रंगभरलं हिरवं चित्र तो मला आवडायचा अन मीही, त्याला आवडायचो फार चर्चा, मस्करी, थट्टेला पूर यायचा अपार... पण हळूहळू दिवस सरले... पाहता पाहता वर्षही सरलं... माझ्या मित्राचं मी तोंडही नाही पाहिलं हे तेव्हा कुठे मला आठवलं! आम्ही आता नव्हतो नवथर पोरं कालची कसल्याशा ओझ्यांनी होती पाठ आमची वाकली नाव, पैसा आणि प्रतिष्ठा यांचा होता खेळ खेळता खेळता नुरला मित्रासाठी वेळ...

परीचे पशुधन

धनंजय ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
परीचे पशुधन ***************** परीच्या गोठ्यात गोगलगाय तिच्या दुधाची चंदेरी साय शिंगे मऊमऊ म्हणून काय धोक्याचे तिच्या पोटातले पाय *** परीच्या छतातलं चिमणीचं घरटं लखलख काचेचं चकचक करतं चिमणीच्या चालतो आराम मस्त गरजेच्या वेळी तेलच नसतं *** परीच्या पागांत बंदुकीचा घोडा बाबड्याला लागतो खुराक थोडा लगाम न लागे, कधी न ओढा उधळे तेव्हा, कधी न झोडा *** परीच्या झाडावर पराचा कावळा नका रे समजू कावळ्याला बावळा कोकलतो कोहळा असल्यास आवळा मागून माजतो गोंधळ सावळा *****************

कुठली खिडकी? कितवा मजला?

ॐकार ·
कुठली खिडकी? कितवा मजला? निळ्या पांढर्‍या भिंती दिसल्या बावरलेल्या नजरा वळल्या शब्दांनीही खाटा धरल्या प्रश्न तेवढा एक राहिला कुठली खिडकी? कितवा मजला? मित्र,सोयरे सगळे जमले नव्या घरी येताना दिसले बंद लिफ्ट पाहून म्हणाले किती पायर्‍या चढावयाला? कुठली खिडकी? कितवा मजला? मध्यरात्रीचा प्रहर नेमका हेरून गेलो तसा बेरका व्यवहारी मी मदन नेटका पैसे मोजत खांद्यावरती हात टाकला कुठली खिडकी? कितवा मजला? रिक्तहस्त मी अलिप्त आणि एकभुक्त मी विषय, वंचना, व्यसनांपासून पूर्ण मुक्त मी मीच देव, मी दानव अन माझाच भक्त मी झोपायाला जमीन, अंबर पांघरायला कसली खिडकी! कसला मजला! -ॐकार

फासले ऐसेभी होंगे - भावानुवाद - असेल अंतर असेही...

ॐकार ·
मूळ गझल फासले ऐसे भी होंगे.......ये कभी सोचा ना था ..... सामने बैठा था मेरे.....और वो मेरा ना था!!!!!! वो की खुश्बू की तरह.....फैला था मेरे चार सू...... मैं उसे महसूस कर सकता था......छू सकता ना था..... रात भर उस ही की आहट कान में आती रही...... ....झाँक कर देखा गली में....कोई भी आया ना था...... अक्स तो मौजूद थे पर .....

तुझ्या भावनांची शपथ आहे (कविता) - सागर

सागर ·
लेखनविषय:
तुझ्या भावनांची शपथ आहे नाहीतर शब्दांचे हे बंध कधीच मी मानीत नाही आज तू मला रोखले आहे नाही तर तुझा दुरावा मनाला पटत नाही आज तुझा आधार आहे नाहीतर कोसळल्यावर मी कधीच सावरत नाही म्हणूनच सखे, आपला संग आहे तुझ्या असण्याची मला किंमत आहे नाहीतर तसा मी कोणासाठी सैरभैर होत नाही ... - सागर ०७-०२-२००८ दुपारी ४.०० वा.

वाद्यं

नन्दु ·
लेखनविषय:
वाद्य आता जेव्हा कधि तो वाद्यांच्या दुकानासमोरुन जातो नेहमि खालमानेने जातो हि सगळी वाद्यां त्याच्या घरात आहेत कधिकाळी.................. तो विचारित आसे वीणेचि किंमत अलवार पणे फिरायचा त्याचा हात ताराना झंकारत नि त्याला वाटायच वाद्यं नसतात त्याचि जो केवल खरिदतो त्याना ती असतात त्याचि जो निर्माण करतो अनाहत सुरवटि आणी मग एका संध्याकाळी त्याच्या घरी वीणा आलि कितीक सांजवेळा,कितीक रात्री कित्येक दिवस उलटले थकून ...वैतागुन.....

कोल्हे वाण्याला कोकणी सल्ला

धनंजय ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कोल्हापूरचा कोल्हे वाणी पोलादपूरला सोले आणी! सल्ला सच्चा सोळा आणे सोलापूरला पोलाद नेणे

तिचे अभंग, तिची गाथा

नंदन ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
सकाळी उठावे | सुसाट सुटावे | ऑफिस गाठावे | कैसेतरी || इच्छा गं छाटाव्या | पोळ्या अन् लाटाव्या | वेळाही गाठाव्या | सगळ्यांच्या || चढावे बशीत | गर्दीत घुशीत | रोज या मुशीत | कुटताना || धक्के ते मुद्दाम | नजरा उद्दाम | गाठण्या मुक्काम | सोस बये! || उशीर अटल | चुकता लोकल | जीवही विकल | संभ्रमित || लागते टोचणी | भिजते पापणी | जावे का याक्षणी | तान्ह्याकडे?