लेखकराघवयांनी सोमवार, 01/09/2008 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
आषाढी एकादशीला ही कविता लिहिलेली. लिहिल्या गेल्यावर माझा मलाच खूप आनंद झाला होता. :)
मेघ आषाढाचा गर्जे, गाज गूंजे चराचरी,
प्रेमे नादली पंढरी उभा बघून श्रीहरी!
मी बालक अजाण मन सोडीना पदर!
माझी बालकाची मती त्यास कोठला आधार?
दिंडी चालली माहेरा, वाट ओली अंतरीची!
उभी लेकराच्यासाठी माय सावळी कधीची!!
अश्रू वाहती सहज, भाव कोवळा सांभाळा!
मायभेट उराउरी आज आनंद सोहळा!!
मुमुक्षू
[टीपः अगोदरही याच नावने जालावर प्रसिद्ध केलेली आहे. किंचित बदल करून येथे प्रकाशित करतो आहे. येथेही आवडेल अशी आशा करतो.]
लेखकपद्मश्री चित्रेयांनी रविवार, 31/08/2008 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
वृषाली ची आमची मुंबई कविता वाचुन माझी एक बरीच अगोदर लिहिलेली कविता आठवली. खुप दिवसानीं.
काही अपरिहार्य इंग्रजी शब्द आहेत्-त्यासाठी क्षमस्व.
धावता धावता एक नजर घड्याळाच्या काट्यावरती
पळणार्या पावलांना , आमच्या मुम्बई ची खास गती
आठ-तीन,आठ-सात कुठली लोकल मिळेल आज
विंडो जर मिळाली तर पोचलेच मग स्वर्गात हात.
नाही तर आहेच लटकत जाणं, तो ही प्रवास एन्जॉय करणं
घामाच्या वा पावसाच्या धारांमध्ये भिजुन जाणं
पाउस ,खड्डे ,मेगा-ब्लॉक..
लेखकवृषालीयांनी रविवार, 31/08/2008 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
आमची मुंबई
असे शहर जेथे सारे काही शक्य आहे खासकरुन अशक्य.
येथे carbon-dioxide हा oxygen पेक्क्षा जास्त आहे.
येथे रस्त्यां नाच कचरापेटी म्हणुन गनले जात आहे.
येथे मनुष्य गोळी घेतल्या खेरीज रात्री झोपु शकत नाही.
येथे दुरध्वनीचे बिल माणसाला जगू देत नाही.
येथे प्रत्येकजण स्वत:ला star समजत आहे.
येथे सायकल सूद्धा कार पे क्षा जलद गतीने धावत आहे.
येथे sky-scrapers मान उंचावून slum कडे पाहत आहेत.
येथे पावसाळ्याचे आगमन होताच घरे कोसळत आहेत.
येथे मनुष्य पहिल्यांदा कॄती करत आहे आणि मग विचार क
लेखकसौरभ वैशंपायनयांनी शनिवार, 30/08/2008 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
सरनौबत प्रतापराव गुजरांनी शरण आलेल्या बहलोलखान पठाणाला धर्मवाट दिली. महाराजांना ही बातमी समजताच. त्यांनी टाकोटाक सरनौबतांना पत्र लिहीले - "स्वत:ला सरनौबत म्हणवता? तुम्ही तो केवळ शिपाईगिरीच केली! बहलोल इतुका बहुत वळवळ करीत आहे, त्यांस मारुनी फ़त्ते करणे अन्यथा आम्हांस तोंड न दाखविणे!". तीच चिड मस्तकात घेउन सरनौबत प्रतापराव गुजरांनी नेसरी येथे अवघ्या सहा अंगरक्षकांसहीत बहलोलखान पठाणाच्या फ़ौजेवर हल्ला चढवला आणि अजुन एक खिंड पावन झाली
---------------------------------------------------
काय घडविले? कसे म्हणावे सेनापती सुजाण?
कुणा विचरुनी दिला सोडुनि, खासा बहलोल पठाण?
लेखकअनिरुद्ध अभ्यंकरयांनी शुक्रवार, 29/08/2008 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
होऊन कान्हा
येईन पुन्हा
करण्यास गुन्हा
का बोल तुझे
स्मरतात मला
तोडून बंध
होऊन धुंद
आवेग अंध
का ओठ तुझे
डसतात मला
तू दूर तिथे
हे सूर इथे
आकाश रिते
का श्वास तुझे
कळतात मला
विरहात असे
जळणार कसे
ही रात्र हसे
का भास तुझे
छळतात मला
अनिरुद्ध अभ्यंकर