कविता
प्रवाह
किनाऱ्यावर कोरडे बसण्यापेक्षा
मी जेव्हा आठवणींच्या डोहात बुडी मारली...
तेव्हा मलाच माहीत नव्हते मी काय शोधायचा प्रयत्न करतोय?
कधी निस्तब्ध ओंडक्यासारखा लाटेवरती पहुडलो
तर कधी वाळके पान होऊन भोवऱ्यामध्ये गुरफटलो
कधी मोती वेचले तर कधी शिंपले शोधले
कधी निसटणारी वाळू हातात घेतली
तर कधी चिखलाने बोटे बरबटली
पण तरीही मला कळले नाही की मी काय शोधतोय?
दमून भागून शेवटी जेव्हा किनाऱ्याला लागलो
आणि तट्स्थ नजरेने पुन्हा डोहाकडे पाहीले ....
तेव्हा दिसले की खोल, गूढ अश्या त्या डोहामधूनच उगम पावलाय एक सोनेरी प्रवाह...
जो जातोय दूर, दूर...
मीही एक मृगजळ
मीही एक मृगजळ..
मृगजळाच्या प्रदेशातून परत येतांना
अंगभर हसू मिरवत आणतो मी तुझं…
आणि आश्चर्य वाटत राहतं
माझ्या कल्पनांना चैतन्य देणाऱ्या
या मृगजळाचं...
माझ्या हाकेला तुझी उत्तरं
मीच दिली आहेत तिथे...
आणि तुला आश्चर्य वाटेल
इतकी ती तुझीच आहेत...
लखकन चमकलेली वीज
कुठे संपते आणि कुठे पाण्यात शिरते
नाहीच कळत..
तशीच तू आणि तुझे भास,
आणि मग मीही एक मृगजळ…
---गिरीराज
Taxonomy upgrade extras
आठवण....
आठवते का? आकाशावर उमटुन गेली होती लाली,
आठवतो का? तोच रक्तीमा फुलला होता तुझ्याच गाली. - १
आठवले का? हळवे स्पर्श, नीसटती त्यांची हुरहुर,
आठवली का? उशीर होता लटक्या रागाची कुरबुर. - २
आठवतो का? ओंजळित फुलला होता चाफा धुंद,
आठवला का? सुवास कसला? चोरला त्याने तुझाच गंध. - ३
आठवली का? अधीर वचने अधराची अधराला,
आठवले का? चुकार अश्रु बिलगते पदराला. - ४
आठवते का? मी निघतो म्हणता घट्ट मीठि विणलेली,
आठवली मज, मला शोधती नजर तुझी शिणलेली. - ५
- सौरभ वैशंपायन(मुंबई).
राख.....
राख.....
नाकात कापुस घालु नका,
संगतीने माझ्या चालु नका....
प्राण माझे कधीच गमवले,
परत मला मारु नका.....
रडण माझ नाही ऍकल,
आता तुम्ही रडु नका....
लग्नात मी सजलो नव्हतो,
सरणावर मला सजवु नका....
संकटात कोणी नाही आले,
बघ्यांची गर्दी करु नका......
जीव गेला पाणी-पाणी करता,
दोन-दोन घोट पाजु नका.....
देवाला कधी पुजले का तुम्ही...?
राम नाम तोंडात घेऊ नका....
कोणी एक बोट नाही दिले,
चार-चार खांदे देऊ नका.....
शरीर जळुन गेले माझे,
उरलेली राख जाळु नका......
किरण रामचंद्र मल्लाव..08
@धन्यवाद........!
Taxonomy upgrade extras
तूझे येणे.......
तु आयुष्यात आलास
श्रावणधारा सारखा
आषाढ्घनासम काळोख्या
मनात पेरलेस
चमचमते प्रीतिचे थेंब
आता तु नसलास तरी...
त्याच प्रीतीचे अकुंर आलेत मनभरुन
कधी कधी वहातात डोळ्यातून
अश्रुची फुले होउन.....
नीता
Taxonomy upgrade extras
कधी रे येशील तू... अनामिका....
पुनवेच्या चंद्राला नभी शोभतसे, शुभ्र चंद्रिका
यमुनेच्या तीरी साद घाली, हरीची मुग्ध सानिका
ऐकुनि ते सूर, नुपुरे झंकारित येई वेडी राधिका
येई त्वरेने, नजरा चुकवित, परि नसे ती अभिसारिका
परमात्म्याची ओढ तिला, ती होय अलौकिक साधिका
दिव्यत्वावरि प्रीती करी, ती हरीची प्रियतम प्रेमिका
दोन ह्रदयांचे पाहुनि मिलन, मोहुनि जाती वृक्ष-लतिका
साक्ष आहे, या अमरप्रेमाची, वृंदावनातील मधु-मल्लिका
सांगे मजला ही स्नेहकथा, जाईची अबोध कलिका
झुरते मी वेड्या राधेपरि, कधी रे येशील तू... अनामिका....
Taxonomy upgrade extras
श्यामसखा.
कुणी नसावे दुरवर परी,
श्यामसखा जवळी असावा,
श्रावणधारांसवेच अलगद,
श्यामसखा बरसुनी जावा - १
श्यामसख्याच्या निळाईत अन मग,
गौरतनु हे रंगुन जावे,
वेणु त्याने लावताच ओठी,
सप्तसुरात दंगुनी जावे - २
श्यामसखा असा बरसता,
चंद्र लाजुनी चुरुन जावा,
सैलावल्या केसात अन मग,
स्पर्श जरासा उरुन जावा - ३
- सौरभ वैशंपायन(मुंबई).
बाप्पा मोरया..
बाप्पा मोरया..
.
जाळी झाडली.. झाडली..
पुटं काढली.. काढली..
रंग दिला घरा नवा..
या चैतन्य भराया.. या
या कौतुक कराया.. या
या.. बाप्पा मोरया.. या
बाप्पा मोरया..
पाचोळा झाडला.. झाडला..
सडा घातला.. घातला..
रांगोळी घेतली काढायाला..
या रंग भराया.. या
या कौतुक कराया.. या
या.. बाप्पा मोरया.. या
बाप्पा मोरया..
तोरण लावलं.. लावलं..
घर सजलं.. सजलं..
घेतला उत्सव करायाला..
या आनंद भराया.. या
या कौतुक कराया.. या
या.. बाप्पा मोरया.. या
बाप्पा मोरया..
आसन मांडलं.. मांडलं..
आवतान धाडलं.. धाडलं..
मनी करतो सदा धावा..
या लेकरा बघायाला..
या आशीर्वाद द्याया.. या
या कौतुक कराया.. या
या.. बाप्पा मोरया..
Taxonomy upgrade extras
मिसळपाव