लेखककेसुरंगायांनी शुक्रवार, 15/08/2008 03:35 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावावर सदस्यांची नावे अशी फिरताना बघून आमचे डोळे फिरले! 8|
एकामागून एक सदस्य अशी नावे फिरवून फिरताना पाहून ना.घ. देशपांड्यांच्या डाव मांडून भांडून मोडू नको ह्या अप्रतिम गाण्याचे शब्द आम्ही फिरवले!
लेखकचतुरंगयांनी शुक्रवार, 15/08/2008 01:09 या दिवशी प्रकाशित केले.
विक्षिप्त ह्यांच्या गजलेचा 'कहर' बघून आसपासच्या आफिसातील काही नमुने डोळ्यांसमोर चमकले! ;)
टंच आहे टंकणारी बांधणीला
ढेर-टकल्या सायबाच्या दावणीला
आडलो नाही तसा मी बोलताना
आडला येऊन हुद्दा ऐरणीला
काय सांगू कहर हा झाला कशाने
का पुढे बसवून गेली ढापणीला?
ओठ मादक, केवढा अन् रंग त्यावर
बोलवी साहेब कसल्या चाचणीला?
ते भले मोठे नको रोखूस डोळे
संभ्रमी बघ कंप सुटतो पैरणीला
खोड 'रंग्याची' जुनी नाठाळ आहे
मार खाण्याची अखेरी वळचणीला
चतुरंग
लेखकराघवयांनी गुरुवार, 14/08/2008 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
जयालागी ध्यास,
नामाची आस,
कोण श्रीमंत दास,
तयावीण.
भावाची प्रचीती,
राम स्वयें सांगाती,
प्रेमाची महती,
वर्णावी किती!!
रामाचे पायी,
जया चारी धाम,
विचारांचे काम,
तयासी कैसे.
मोजावे कशास
उरलेले दिन,
नामी समाधान,
आनंदी असावे.
राम ठेवी जोवर,
त्याचे असावे तोवर,
अन् निघावे सत्त्वर,
हाक येता!
नामी राहावे मन,
नाम असावे प्राण,
मुमुक्षूचे आवाहन,
सगळ्यांसी.
मुमुक्षू
[टिप: ही कविता आधी दुसरीकडे याच नावाने प्रकाशीत केलेली आहे. येथेही आवडेल अशी आशा करतो.]
लेखकअरुण मनोहरयांनी गुरुवार, 14/08/2008 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
दृष्टी
वर्तमानाच्या खांध्यावर बसून
भविष्याकडे पाहीले.
धुक्यातून काहीच दिसेना
पण ऐकू आले अस्पष्ट नाद.
बोलावणारे, भुरळ पाडणारे.
त्या नादाचे बोट पकडुन
सुखाच्या शोधात जावे म्हटले.
पण ठेच लागण्याच्या भितीने
पाउल पुढेच पडेना!
भुरळ पाडणारे नाद येतच होते.
नंतर तेही धुक्यात विरून गेले.
धुके आणखिनच दाट.
मी मुके धुके ऐकत तिथेच थिजलेला.
..............
वर्तमानाच्या खांद्यावर बसून
मागच्या दिशेला भूत पाहीले.
स्वच्छ प्रकाशात उजळलेल्या वाटा
फ़ुले काटे खड्डे रस्ते महाल झोपड्या
स्पष्ट ऐकू येणारे नाद, संगीत, सूर, बेसूर.
अगदी डोळे मिटून,
कोणाचेही बोट न पकडता
जाऊ शकेल मी त्या दिशेला.
पण फक्त
लेखकहर्षद आनंदीयांनी गुरुवार, 14/08/2008 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी;
अन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी.
एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरांमागे धावणारी;
फुलांचे सारे रंग उधळत, झाडांमागे लपणारी.
एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी;
माझ्या बाहूपाशात, अलगद येऊन बसणारी.
एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसणारी;
पण मनाने मात्र, अप्रतिम सुंदर असणारी.
एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी;
आमच्या नाजुक नात्याला, हळुवारपणे जपणारी.
एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी;
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी.
एक प्रेयसी पाहीजे, प्रेमाला प्रेम समजणारी;
सुखा-दुःखात माझ्या, तन्मयतेने साथ देणारी
लेखकपद्मश्री चित्रेयांनी सोमवार, 11/08/2008 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस असा हा झरतो ,धारांतुन गाणी गातो
नभ घेवुनी उशाशी ,मोत्यांची स्वप्ने देतो..
ओल्या मनात माझ्या दडुनी खुशाल बसतो
रोमांच होवुनी वा हातावरी उमटतो..
थेंबात ये रुपेरी, घेई हवेत झोके
मातीतुनी उगवती , त्याची अनंत रुपे..
पाऊस आसमंती, पाऊस अंतरात
पाऊस होवुनी मी ,माझ्या मनी तृषार्त...
लेखकअनिरुद्ध अभ्यंकरयांनी सोमवार, 11/08/2008 03:35 या दिवशी प्रकाशित केले.
वय सोळावं सरलं की
सगळं हिरवं दिसू लागत
स्वतःभोवती गिरकी घेत
मनात पाखरू वसू लागत
वसंताच्या बागेमध्ये
चाफा केवडे फुलू लागतात
फुलां भोवती पिंगा घालण्या
भवरे ही जमू लागतात
न बोलता प्रत्येकाला
सार काही कळू लागत
वय सोळावं सरलं की.....
पुनवेच्या रातीला
सागराला भरती येते
क्षितिजावर आकाशाला
भेटायला धरती येते
प्रेमाची ही आगळी भाषा
प्रत्येकजण बोलू लागत
वय सोळावं सरलं की.....
पहिला वाहिला पाऊस अन
पहिली वाहिली प्रीत असते
प्रत्येकाच्या ओठांवरती
धुंद एक गीत असते
ओलाचिंब मन तेव्हा
वार्यावर झुलू लागत
वय सोळावं सरलं की.....
हिरव्या हिरव्या पानांमध्ये
सळसळणार वारं असत
तुझ्या डोळ्यांच्या नजरबंदीत