Skip to main content

कविता

भास

लेखक अनिरुद्ध अभ्यंकर यांनी शुक्रवार, 29/08/2008 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
होऊन कान्हा येईन पुन्हा करण्यास गुन्हा का बोल तुझे स्मरतात मला तोडून बंध होऊन धुंद आवेग अंध का ओठ तुझे डसतात मला तू दूर तिथे हे सूर इथे आकाश रिते का श्वास तुझे कळतात मला विरहात असे जळणार कसे ही रात्र हसे का भास तुझे छळतात मला अनिरुद्ध अभ्यंकर

मातृदिनाच्या निमित्ताने

लेखक पद्मश्री चित्रे यांनी शुक्रवार, 29/08/2008 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या मातृदिन. प्रत्येक आई आपल्या मुलांच्या उदंड आयुष्यासाठी, सुखासाठी पिठोरी ची पूजा करेल.. इथे अनेक जण आहेत , जे कामानिमित्त, शिक्षणानिमित्त घरापासून लांब रहातात.
Taxonomy upgrade extras

छायाचित्र क्र. ४ चे परिक्षण

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 29/08/2008 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्र परिक्षण वाचण्याआधी मुळ चित्र येथे पहावे ============== ही नजर की बाण हा, घायाळ करते जीवा त्या मुठित लपविले, घायाळ माझ्या जीवा ते लटकलेले कानचे, की आशा माझ्या मनीची स्वत:संगे झुलविले, घायाळ माझ्या जीवा ती वक्रगती कटीका, की रस्ता माझ्या मनीचा त्या झटक्याने फसविले, घायाळ माझ्या जीवा ती कमरसाखळी हो, की इच्छा माझ्या मनीची त्या विळख्याने भुलविले, घायाळ माझ्या जीवा सर्व असूनही एकटी, की आस माझ्या मनीची तु विश्वामित्र बनविले, घायाळ माझ्या जीवा -ऋषिकेश (रात्री १२ ची वेळ असल्याने छंदाच्या अपेक्षा माझ्यासारख्या
Taxonomy upgrade extras

भातुकलीच्या खेळामधले, राजा आणिक राणी.....

लेखक मृगनयनी यांनी गुरुवार, 28/08/2008 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
भातुकलीच्या खेळामधले, राजा आणिक राणी..... अर्ध्यावरती डाव मोडला, अधूरी एक कहाणी..... हातामध्ये हात गुंफुनि, बालपणी ते बागडले .... अल्लडपणे त्या प्रेमाचे, बंध गुंफिले गेले... कधी राजाचे डोळे विचारिती, घरट्यात राहशील माझ्या? राणीला ही कळली त्याची, शब्दावाचूनि भाषा... वचन दिले त्यांनी परस्परांना, मानुनि जीवनसाथी... आयुष्यभर साथ देण्याच्या, बांधल्या रेशीमगाठी... त्यांच्या घरट्यापुढे उमलल्या, सुखस्वप्नांच्या वेली... राणीच्या वेणीत माळे राजा, जाई जुई चमेली... ते दोधे आनंदाच्या डोही रमले, काळ लोटला काही... पण राजा-राणीचा हा संसार, नियतीला बघवला नाही... नियती अचानक एके दिवशी, वादळ घेऊनि आली...

कधी सांगु शकलो नाही तुम्हाला......

लेखक चिंतामणराव यांनी गुरुवार, 28/08/2008 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
कधी सांगु शकलो नाही तुम्हाला जाणीवा रुंदावत जातांना तुम्हीच प्राम्टिंग करत होता मी मिजाशित टाळ्या घेत होतो विंगेत तुम्ही आनंदाश्रु पुशीत होता कधी बोललो नाही तुम्हाला तुम्हीच तर दिलंत मला स्रुजन सारस्व्ताच भान तुम्हीच ऍकवलंत मला नव्या युगगीतांच उदगान कधी सांगीतल नाही तुम्हाला जीवन म्हणजे अपार श्रद्धा प्रेम, सेवा, कर्तव्य आणि निश्ट्टा खोचलेला पदर आणि यज्ञमग्न हात तुमच जीवन हाच मुर्तिमंत पाट्ट सांगायच राहिलंच तुम्हाला तुम्हीच शिकवलंत, भिमसेनी धबधब्याखाली सोबती गोळा करुन रंगवाव्यात मॅफली झेलाव्यांत सुर तालांच्या आशाडी बरसाती रंग्-रस-गंधांनी भिजवावी मनाची माती कधी कसा आट्टवत नाही पण तुम्हीच
Taxonomy upgrade extras

(...आदिम घास...)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 27/08/2008 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
हा थरकाप उडवणारा...आदिम ध्यास.. हीच आमच्या आदिम घासामागची प्रेरणा! ;) ...आदिम घास... ================================ अमूर्त अनाकलनीय कवितांपासून.. लपूनछपून.. स्वत:ला वाचवत.. फिरत होतो, अगदी तेव्हापासून! मी टाळत होतो... प्रत्येक असह्य कविता... जीवघेण्या प्रतिकांतून.. उपमांच्या कराल जबड्यांतून.. थरकाप उडवणार्‍या रुपकांपासून.. दूर.. दुबळ्या वाचकासारखं जगत..! त्याच विडंबनाच्या ध्यासापोटी.. दुर्बल वाचकाचा लेखक झाला.. लेखकाचा झाला विडंबक... लेखणीत चळ, शब्दात घोळ असलेला... चक्रम.. विक्षिप्त..! आणि त्या बरोबरच जन्माला आली.. वक्रोक्तीतली हूल...

पाहुनी तुमची सोंगेढोंगे

लेखक शंकर पु. देव यांनी मंगळवार, 26/08/2008 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
पाहुनी तुमची सोंगेढोंगे मात्र कशी येईल दया । बंद करा बोंबलणे गणपती बाप्पा मोरया ।। कशाला हवा झगमगाट एक भक्तीचा पुरेदिवा प्रत्येकाच्या मनामनात माणुसकीची ज्योत लावा तुमच्या इथल्या मांडणात उत्सवाची जाते रया बंद करा बोंबलणे गणपती बाप्पा मोरया ।।१।। नको मात्र फुलांचे ढीग वहा एकच लालफूल फुलांच्या या ओझ्याखाली माझा दातच केलात गुल ओंकाराचे रूप पहाव्या मोकळी ठेवा माझी काया बंद करा बोंबलणे गणपती बाप्पा मोरया ।।२।। प्रेमाने नाव घ्या कशाला बोंबलून करता आरती फेकून तुमचे आवाज शप्पथ वाटे लवकर जावे वरती उदबत्त्यांच्या धुरात मी तुमच्या कानी अत्तर काया बंद करा बोंबलणे गणपती बाप्पा मोरया ।।३।। दर वर्षी दहा द

फाळणी

लेखक सौरभ वैशंपायन यांनी सोमवार, 25/08/2008 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
११ जुलै रोजी मुंबईत रेल्वेमध्ये जे स्फोट होऊन २०० पेक्षा जास्त माणसं मारली गेली होती त्या नंतर दोन दिवसांनी मला ही कविता सुचली आहे. शक्य तितकं वास्तव मांडण्याचा प्रयत्न केलाय. दुर्दैवाने गेल्या २०-२५ दिवसांत अश्या घटाना घडात आहेत कि सुभाषबाबुंचे ३रे कडवे आपण खरच खुप सिरीअसली घ्यायला हवे. ----------------------------------------------- परवाच एका स्फोटात मेलो, पहिल्याच झटक्यात स्वर्गात गेलो, स्वर्गात जाण्याचा एकच कायदा होता, सरळ जगण्याचा हाच एक फायदा होता.

फोड रे मटका...

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 23/08/2008 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
धुंद हे काश्मिर सगळे, एकमेकां मारिती प्रश्न विसरूनी जनांचा, फोड रे मटका धुंद त्या पदकांत सगळे, सुवर्ण कवटाळती प्रश्न हरलेल्या क्षणांचा, फोड रे मटका धुंद त्या खुर्चीत सगळे, राजिनामा खेळती प्रश्न मॅडमच्या खुणांचा, फोड रे मटका धुंद त्या नोटांत सगळे, राज-का-रण आहुती प्रश्न विकलेल्या मतांचा, फोड रे मटका धुंद ते मुंबईत सगळे, वीजपाणी सांडती प्रश्न विझलेल्या दिव्यांचा, फोड रे मटका धुंद अभिषेकांत सगळे, दुधदही अर्पिती प्रश्न सुकलेल्या घशांचा, फोड रे मटका धुंद त्या माडीत सगळे, साकीपेले रिचवीती प्रश्न चुरलेल्या कळ्यांचा, फोड रे मटका धुंद ते तंत्रात सगळे, दो करांनी उपसती प्रश्न वितळत्या हिमाचा, फोड
Taxonomy upgrade extras

सल ...

लेखक मनीषा यांनी शनिवार, 23/08/2008 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
सळसळते मनात काही सल हलकासा जागवी थरथरती पापण्यां वरती अश्रुंचे ओले मोती | त्या गूढ जलाशयावरी तरंग हळू उमटती जे खोल अंतरी काही अनामिक उमगत नाही | मेघ नभी दाटती कडकडती त्या दामिनी -हुदयात या धुमसती आवेग अनावर किती ? उसळते धूळही वरती दशदिशा कोंदून जाती पाचोळा वाटेवरती पाउल रोखिते धरती | बंध कसले बांधती? प्राणांस कसली भिती ? जोडण्या ईश्वरापुढती हे हात न माझे उरती |