Skip to main content

कळी संगे निर्दय भोंवरा मधूर गुंजन करतो कसे?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 03/09/2008 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवादीत. कवी-भरत व्यास ) कसे विचारू ह्या गोमट्या कमलिनीला लपून छपून भ्रमर होऊनी येई तो रात्रीला घेऊनी खबर तुझी चोरीतो तुझ्या चित्ताला का विचारसी तू असे त्या कळीला प्रेमात होतोच असा घात त्या घटकेला बाण फेकूनी नजरेने बोलाविते जादूला खेचून घेता जवळी दोष का मग भ्रमराला निर्दय भ्रमर गुंजन करूनी फिरतो गली गली कसा करावा भरवंसा जो चुंबित जाई कळी कळी चवकस ह्या भ्रमराला साथ देईल कुठली कळी विसरूनी जाई भान अपुले जेव्हा भेटे कमलिनी कळी गोमटि भ्रमर सावळा, संगत कशी निभेल रे ! काळ्या मेघा संगे बिजली, कशी राहते विचार रे ! गोरे सावळे रात्रंदिनी, मिळवूनी घेती असे कसे? रात्र काळी चंद्र गोमटा, रास मिलनाची करती कसे? कळी संगे निर्दय भोंवरा मधूर गुंजन करतो कसे? श्रीकृष्ण सामंत
लेखनविषय:

वाचने 1663
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

छान अनुवाद. शब्दयोजना आवडली. फक्त गली गली हा हिंदी शब्द जरा खटकत आहे. त्याऐवजी समर्पक मरठी शब्द योजायला हवा होता...जसे स्थळी मूळ हिंदी गाणं मात्र आठवलं नाही.

In reply to by वेलदोडा

वेलदोडाजी, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. आपण "स्थळी" हा सुंदर शब्द सुचवला आहे. आमच्या डोचक्यात त्यावेळी आलं नाही. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com