Skip to main content

कविता

२ कविता

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 15/11/2015 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
१...जाताना ऑफिस ला जाताना ऑफिस ला गडबड झाली. घाईत शर्ट ची वरची गुंडी तुटली . सिनेमासारखी सिच्युएशन झाली सुईत ओवत दोरा हि धावत आली . शिवताना गुंडी हि फार जवळ आली. मित्रानो सिच्युएशन रोम्यांटीक झाली. तशीच तिला बाहुपाशात घेतली हाय.....बायको ऐवजी सुई हृदयात घुसली अविनाश .............. २...नाजुक नासिका..गौर गुलाबी वर्ण तेजस्वि नेत्र..लालचुटुक अधर प्रमाणबद्ध बांधा..मोहक चेहरा.. बघताच खुदकन हसली . अन "खट्याळ काळजात घुसली"
काव्यरस

"जय" हो "श्री" "खंडुबाकी"

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शनिवार, 14/11/2015 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
*ढिस्क्लेमर* १. अस्मादिक टिव्ही नेहेमी पाहात नाही. २. ऐन दिवाळीच्या कधी नव्हे ते सलग दोन दिवस आणि एक विकांत असणार्या सुट्टीमधे दोन दिवस भेसेणेलने माती खाल्ल्यामुळे ब्रॉडबँड बंद असल्याने सोफ्यावर निर्विकारपणे बसलेलो असताना हा दुरचित्रवाणीय मानसिक अत्याचार आमच्यावर करण्यात आलेला आहे. तस्मात तु टी.व्ही. बघतोस का असा कुत्सित स्वरात विचारलेला प्रश्ण फाट्यावर मारण्यात येईल. (असे प्रश्ण टपालाने पाठवायचा पत्ता: पौड फाटा: ड्रॉपबॉक्स क्रमांक ४२० (अ)(प)ल्याडची पुण्यनगरी). ३. फालतु वाद घालणार्याच्या घरच्या स्त्रीवर्गास हे एपिसोड्स डाउनलोड करुन डीव्हीडी/ पेन ड्राईव्ह मार्गे पुरवुन बदला घेणेत येईल. ४.

कै च्या कै कविता ...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 13/11/2015 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
कविता..कवि...आणि कै च्या कै कविता... कधी मुक्यानेच बोलणारी कविता, तर कधी बिअरसवे डोलणारी.. येता जाता माफी मागणारी कविता....! झुरळावर स्वार होवून जोमाने ढेकणावर चढाई करणारी कविता.. आरसे फोडत, वादळात सापडत.. सिगरेटी फुकायला लावणारी कविता...! अतिव दु:खाने झडणारे (?) ढग अन् गोमुत्राची चव शिकवणारी कविता.. आमच्यासारखे समिक्षक असताना.. सफाईसाठी डेटॉल शोधणारी कविता..! गुपचुप चुंबनाच्या व्याख्या शोधताना तुम्ही-आम्ही मध्ये अडकलेली कविता.. विझलेल्या स्वप्नांची सारीभरणं करत, आ वासलेल्या सत्यात रुतलेली कविता...! डोळ्यासमोरून अलगद फिरताना.. डोक्यावरून जाणारी कविता.. आमच्या मंद डोक्यात मंदपणे.. कै च्या

शौ(चौ) र्यनिखारे

लेखक मोगा यांनी बुधवार, 11/11/2015 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
पुणेरी बाजीरावाने माझी कविता पळवली तेव्हां काव्यगुरु निकाळजे शनवार वाड्यावर गजला करत उभा होता बाजी बोलला जमवायचं कसं ? त्यावर तो शून्यात नजर लावून म्हणाला सगळंच विझलंय अगदी गझल कार्यशाळेचीही राख झाली आता मायबोली सर्चमधून तेच तेच जुने मतले काढून राजकारणाचे धागे पेटवण्याचा प्रयत्न करतो. ... मात्र उजवीकडून येणारा याकुबचा जनाजा म्हणाला भगविच्या , बघतोच तुला ! एव्हढ्य़ाचसाठी रोखून धरलेलं कधीचं एका काफियासाठी प्राण डोळ्यात आले असताना पन्नास हजार हिरवे कानात कुजबुजले तुझ्या सम्मेलनात इतकी माणसं जमतात का? मतले आणि काफिये फुकटात देइन उर्दू साहित्यातून. बाजी बोलला...

दिपज्योती

लेखक माहीराज यांनी बुधवार, 11/11/2015 05:29 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊल फीरते कधी माघारी या वाटेवर चालताना.. आसु दाटले डोळ्यांमध्ये चुकून कधी हसताना.. सर्व जाणतो तरीही का मी चुकून ही चुकतो.. शब्द सुचेना आता मजला रूसुन मी बसतो... येते सारे मलाच म्हणुनी गर्वाने मी फुललो.. सोडून मी कार्य माझे भासांना भुलून फसलो... ध्यास कोणता..लक्ष कोणते ..काहीच आठवेना.. शुन्यातुन मी घडलेलो पुन्हा शुन्यातच विरलो... वेळीच मला समजावणारा साथी थकुन गेला... आज नको उद्या करु यात वेळ ही निघुन गेला... आता नव्याने सुरवात करू..पण आज नको रे उद्याच करू.. आळसाचा डोंगर आधीच होता पण आता कळस केला ... शोक करणे पुरे आता रडणे ही खुप झाले. निश्चय कर पण नित्याचा अंतर्मन हे बोले.. लेखनी मजसोबत आली

तिथली दिवाळी.....

लेखक शिव कन्या यांनी सोमवार, 09/11/2015 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
तिथली दिवाळी..... तीरकामठा रंगीत कागद चिखलमाती अर्धा किल्ला.... शिवाजीच्या मावळ्यांहाती, परत फराळ ठेवशील का? पहाट झोपेत हळूच उठवून घमघमणारी आंघोळ घालून, फुलबाजांची हजार फुले परत हातात ठेवशील का? रांगोळीतील हुकले ठिपके रेषांमधील नाजूक वळणे, तुळशीमाईचे लगीन लटके परत दणक्यात लावशील का? किणकिण बांगड्या काचेच्या घिरघीर झालरी पोरींच्या! सुरसूर बत्त्या, चुटक्या टिकल्या परत उडवण्या येशील का? तिथली दिवाळी धमाल मजा इथली दिवाळी शांत सजा!! आठवणींचे व्याकुळ दिवे परत घरी पोचतील का?

हमारी... अधुरी...... नव्वदोत्तरी..............................

लेखक मारवा यांनी सोमवार, 09/11/2015 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
समुहगान आमचा कळप, आमचा झुंड ,आमचा गण अन आमचीच शिरगणती. अगणीत आम्ही तुझी गणना नाही कशात, तु नाहीच आमच्या खिजगणती. आमचा झेंडा , आमचाच अजेंडा, आमची चळवळ आमची तळमळ,अन आमचीच मळमळ. आमची कुलीन घराणी, आमच्या बांधलेल्या बंदिशी, अन आमच्याच तालावर नाचणारे ताल. आमच्याच समेवर आमचेच आदिम अभेद्य अविनाशी आवर्तन सहनाववतु ! सहनौभुनक्तु ! सहवीर्यम करवावहै ! आमच्या नाजुक भावना, आमच्या घाऊक संवेदना, अन आमच्याच भावुक संघटना. साथी हाथ बढाना एक अकेला थक जाये तो..... ..वा वा वा वा वा वा रे वा चल अकेला चल अकेला चल अकेला................
काव्यरस

जेव्हा जेव्हा कांदा कापला जातो

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 09/11/2015 01:22 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा जेव्हा कांदा कापला जातो कढईतली मोहरी चुर्रर करते हळद मीठ तेल टाकुन शेंगदाने खरपुस भाजले जातात मी बाहेरच बसलेला असतो पेपर वाचत कांद्यापोह्याच्या प्रतिक्षेत जेव्हा जेव्हा गाठोडी ईकडे तिकडे सरकतात पोटमाळ्यावरची झुरळं तर्रर पळतात झाडू बादली पाणी घेऊन भिंत पुसली जाते मी खालीच ऊभा असतो स्टुल घेऊन जळमटं काढायच्या प्रतिक्षेत जेव्हा जेव्हा साखरेचं माप होत असतं तेव्हा मालक सुर्रर करत चहा पितो डाळी तांदुळ कडीपत्ता पिशवीत कोंबुन भरला जातो मी तिथेच ऊभा असतो काऊंटरजवळ बिलाच्या प्रतिक्षेत जेव्हा जेव्हा माहेरचा पाहुणा घरी येतो सगळा शिणवटा अर्रर करुन पळुन जातो पुरणपोळी आंबरस चकल्या ताटात आग्रहा
काव्यरस

अस्तनीतले पत्रनिखारे

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी गुरुवार, 05/11/2015 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
याकुबने माझे पेपर चोरले त्याच वेळी कलामांना गाडले जात होते बातम्यांच्या ढिगात पुस्तकातल्या जॉर्ज बर्नार्ड शॉला मी विचारलं यांच्या लेखी कोण मोठा?
काव्यरस

नवकविता - ट्रॅफिक जॅम

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 05/11/2015 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
नवकविता ब-याच वाचनात येतायत आजकाल. माझाही प्रयत्न. :D विडंबन वगैरे समजू नये. मनावर सततच्या होणा-या वारांमुळे अविरत चिघळत रहाणारी जी जखम आहे त्यातून स्त्रवलेलं हे काव्य आहे. प्लीज रिस्पेक्ट दॅट.