Skip to main content

कविता

रात्रीच्या निळ्याशार डोहात डुंबताना....

लेखक कविता१९७८ यांनी रविवार, 06/12/2015 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीच्या निळ्याशार डोहात डुंबताना विसरते मी दिवसभराचे सर्व कष्ट तुझ्या सर्व आठवणींची लक्तरे फेकुन द्यावीशी वाटतात पण तुझ्या आठवणीच त्या तुझ्यासारख्याच निर्लज्ज सारख्या येतच राहतात दु:खाच्या डागण्या देतच राहतात जिथे तु अहंकारापायी बाई म्हणुन स्वत:च्या आईचाही तिरस्कार करु शकतोस तिथे दुसर्‍या बायकांची काय बिशाद तरीही तुझ्याकडुन सन्मानाची वेडी आशा केलीच मी आणि तुझ्या मुळ स्वभावापायी ती पायदळी तुडवलीच तु तरीही जा तुला माफ केले कारण एक आई दुसर्‍या आईच्या कुसेचा अवमान करुच शकत नाही..
काव्यरस

म्हणूनतर नाही ना चांदोबा निंबोणीमागे लपला ?

लेखक माहितगार यांनी रविवार, 06/12/2015 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
चांदोबा असतोच तसा आजन्म उपाशी तुपात पडलीयेना त्याच्या माशी ! तुपरोटी तो कसला खातो चिरेबंदी गाण्यातली अंगाई ऐकत मामा होऊन भटकत राहतो ! निंबोणीच्या झाडात गंधर्व होऊन विराणी कुठलीशी गात राहतो. बाबा ?, की आईनेच चांदोबाचा भागाकार केला, म्हणूनतर नाही ना चांदोबा निंबोणीमागे लपला ? * माझ्या उपरोक्त विडंबनास खरे तर एका पेक्षा अधिक शीर्षके सुचत होती, तुम्हाला काही चपखल शीर्षक सुचलेतर प्रतिसादातून जरुर नोंदवा. * उपरोक्त विडंबन खालील बडबड गीताचे आहे : चांदोबा चांदोबा भागलास का निंबोणीच्या झाडामागे लपलास का निंबोणीचं झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी मामाच्या वाड्यात येऊन जा तूपरोटी खाऊन जा तुप

दुष्काळ - जिंकायाची आहे लढाई

लेखक शार्दुल_हातोळकर यांनी रविवार, 06/12/2015 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
दुष्काळाचा पडला वेढा रूष्ट जाहले पाऊसपाणी मात्र भूमीच्या राजपुत्रा तू नकोस राहु खचल्यावाणी दुर्दैवाने आजघडीला आभाळाचा रोष इथे जिथे डोलली हिरवी राने उजाड आता शेत तिथे जिंकायाची आहे लढाई आपणास ही आज पुन्हा दुर्भाग्याचे जरी उन्हाळे तरी न भितो आम्ही उन्हा जरी कोपली अवघी सृष्टि समस्त बांधव तुझ्यासवे लाख हातांनी लढत राहु घडवाया सुखस्वप्न नवे संपुन जातील दिवस हेही इथे बरसतील पाऊसधारा पुनश्च येईल जुनी सुबत्ता दुःखाला ना उरेल थारा नकोच ओझे उपकारांचे हिमतीने अन् जाऊ पुढे अशी घेऊया गगनभरारी गरुडाचीही फिकी पडे विसरुन जाऊ निराशवाटा प्रगतीच्या त्या घडवु पथा आता दाखवु अवघ्या विश्वा ही बळीराजाची जिद्दकथ
काव्यरस

काल पाहिली मी तिला......

लेखक एक एकटा एकटाच यांनी रविवार, 06/12/2015 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
काल पाहिली मी तिला पावसात चिंब भिजलेली माळुन अगणित मोती इंद्रधनुत सजलेली.............. काल पाहिली मी तिला पहाटेच्या धुक्यात वेढलेली ओझरत्या स्पर्शाने तिच्या ही हवा गुलाबी झालेली........ काल पाहिली मी तिला चांदण्यात निजलेली स्वप्नांच्या दुनियेत तिच्या सारी रात्र रमलेली.............. काल पाहिली मी तिला क्षितिजावर विसावलेली सांज उतरुन गेल्यावरही संधिप्रकाशात उरलेली............

साकल्यसूक्त

लेखक मितान यांनी शनिवार, 05/12/2015 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
समईचा घेऊन हार ही रात उभी तलवार गात्रात पौर्णिमा काळी भरजरी तलम अलवार उन्मुक्त नदीसे जगणे या अधोवदन वेलीचे वृक्षाचा खांदा नीरव पर्युत्सुक मंत्र भुलीचे संन्यस्त शिळेच्या माथी का डाग तप्त चंद्राचा अतृप्त भग्न वैरागी जोगवा त्यास गीताचा नखखुडल्या माडांनाही का तृषा जहरभरणीची जळतीच्या पागोळ्यांची का दिशा पार्थ बाणांची साकल्यसूक्त गंगेचे भय लोभस हिरवे कहरी हंबरून गायी सार्‍या उधळीत दिशा गिरिकुहरी निर्लज्ज उगवती अंकी उन्मादी गातो पक्षी पांघरी डोह काळोखी नवरातकिड्यांना रक्षी अस्तांकित चकवे गहिरे लपवून वनातिल राई अन राख होऊनी शून्य रंध्रात निनादत राही !!!

लपंडाव

लेखक माहीराज यांनी शनिवार, 05/12/2015 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या जिवनी कसला हा लपंडाव कधी सुख सारे कधी दु:खाचे हे डाव तुझे असणे नसणे ही वेड लावी मनाला तुझ्या नसण्यात ही तुझे भास जिवाला हे असले कसले धुके दाटले या मनी सरले दिवस सारे उरल्या आठवणी सारे असुन ही सलतो प्रीये तुझा अभाव असा माझ्या जिवनी कसला हा लपंडाव.. श्वास जरी हा माझा त्यात मी न कधी दिसलेला जीव हा माझा सारा फक्त तुझ्यातच गुंतलेला मन फिरते तुझ्याच मागे कसे सांगांवे कुणाला विसरून जावे म्हणता कसे आवरावे मनाला धडपडते अन् सावरते साराच तुझा प्रभाव असा माझ्या जिवनी कसला हा लपंडाव..
काव्यरस

आत्मनिवेदन

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी शुक्रवार, 04/12/2015 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
संमोहित मनाच्या दुख-या गाभा-याला स्पर्श करून सांगतो हे आत्मनिवेदन सत्य आहे ! पहाटे उमलुन पहिल्या प्रकाश किरणात कोमेजणा-या बकुळफुलांच्या संचिताच्या शापासारखं हे जगणं अन् क्लेश नवसाचं रूपं देवीच्या उंबरठ्यावर ठोकावं असं पूर्व परंपरेने चालत आलेलं ! संध्याकाळी मी जेव्हा डोळ्यावाटे रक्त वाहतो तेव्हा तुझे परसदार लालभडक होते, पसरलेले लाल अन् येणारे कृष्णमय ह्याच्या संगमाने जे काही क्षिताजावर उमटते त्याला शब्द नसतात त्याच अवस्थेत मी असतो ह्यासाठी पाहिजेतर मी माझ्या पहिल्या कवितेच्या गर्भपाताची शपथ घेतो ! शेवरीच्या कापसात विधवेची रात्र गुंडाळून विरह आग आग होऊन रात्र जाळतो मग झोप परागंदा होते अ

गॅलरीतला [दुसरा] पालापाचोळा

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 04/12/2015 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
कलत्या उन्हात, कोण अंगणात? तुळस एकटी, तिची सावली, बाकी मग कुणी नाही! कलत्या उन्हात, कोण आकाशात? फिरती घार, उडती धूळ, बाकी तसे कुणी नाही! कलत्या उन्हात, कोण झाडात? झुलता वारा, हलते पान, बाकी मग कुणी नाही! कलत्या उन्हात, कोण घरात? चार भिंती, एक खिडकी, बाकी तसे कुणी नाही! कलत्या उन्हात, कोण उरात? एका वेळी एक श्वास, बाकी मग कुणी नाही! कलत्या उन्हात, कोण गॅलरीत? असेल कुणी, नसेल कुणी, बाकी मग मी पण नाही!

पंचशील ..........संभोगाच्या अपूर्ण कथा

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी शुक्रवार, 04/12/2015 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
- 1 - आलास समोर | चढले खूळ | नजरेत अतर्क्य | विखार दाटलेले | तुटले टाके | उसवले बंध | विलग होवुनी | वस्त्र फडफडले | मनात गाणी | दाटती सूर | रक्तबंबाळ बोटे | विखुरल्या तारा | राणीचे उसासे | रखेलीचा टाहो | निपुत्रिक राजा | चढे सरणावरी | बाटला देह | विटाळ घेवुनी | धर्माची स्थापना | कुणी करावी ? विजयकुमार......... ०७ . ०२ .

टिटवी, म्हातारी आणि भुजंग

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी गुरुवार, 03/12/2015 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
तळ्याकाठच्या झोपडीतील म्हातारीचे विहळणे तळ्यावरच्या धुक्याच्या शालीला कापत टिटवीच्या घरट्यात तरंग निर्माण करत होते. भररात्री टिटवीचा भयाण भेसूर सूर अशुभाचे सूर आळवायला लागला. अशुभाच्या सावटाने चंद्र ढगाआड लपला, टिटवीची पिल्ले खाणारा भुजंग अस्वस्थ झाला, टिटवीच्या आकांताने, टिटवीच्या पिल्लांच्या स्पर्शाने विटाळलेली त्याची जीभ, जास्तच वळवळायला लागली. कातडीखालच्या सळसळीने भर थंडीतही भुजंगाचा विस्तव केला, विस्ताळलेला भुजंग, वा-याला चिरत, धुक्याला ग्रासत झोपडीच्या दिशेने सरसावला. टिटवीचा आक्रोश, म्हातारीचे विहळणे थांबले तरच थांबाणार होता. एकाच फुत्कारी दंशाने विहळ्णे कायमचे विरून गेले धूक्यात..