निशब्द
लेखनविषय:
काव्यरस
- Read more about निशब्द
- १ प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
शब्दांनी आज बंड केले
होते नव्हते सर्व नेले
उरावे हाती असे जमवलेच नाही
क्षणभंगुर लालसेने षंड केले
वाटते वाचा पांगुळ झाली
निराशा आशेस वांझ झाली
ओहोटीने भरतीस दिला नकार
नकळे कोणती ही भूल झाली
प्रकाशाने रविसंगे घात केला
वसंताला ग्रिष्माने आघात केला
डोळ्यांनीच काळजाची वाट पुसली
लेखणीचा प्राण का गर्भात गेला
शायराच्या शायरीतून भाव गेला
काटयांनीच गुलाबाशी घाव केला
दिव्यास पतंगाने का बदनाम केले
शब्दांनी भावनांशी लपंडाव केला
शब्दास शब्दांनी हे शब्द द्यावे
शब्दांचे शब्द शब्दात ल्यावे
शब्दाविण ना आधार आम्हास कुणाचा
शब्दसुमने रसिकांनी निशब्द व्हावे