मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अशी बायको असती तर

हरिदास · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
अशी बायको असती तर,आम्ही असे झालो नसतो भर तारुण्यात कफनी घालून, रानावनात निघालो नसतो तिची नसती आली कुणालाच सर अशी बायको असती तर पेशवाई गाजवली असती, मिजास मोठीकेली असती, राजबिंडा बनून मिरावलो असतो पर्वतीवर छोटस आमच असत घर अशी बायको असती तर सारसबागेच्या झुडुपांमधे तिला घेऊन बसलो असतो आम्ही सुद्धा छत्रीमागे तुम्हाला कधी दिसलो असतो तळ्यातल्या गणपतीने दिले असते अनेक वर अशी बायको असती तर तुळशीबागेतल्या फेरीवाल्यांनी केला असता सलाम एक ते चार रोज मस्त केला असता आराम दुकानदारानी माझ ऐकून वेळेअगोदर उघडले असते शटर अशी बायको असती तर चितळेबंधुनी होम डिलिव्हरी केली असती माझ्यासाठी रांग सुद्धा थांबवली असती काही नसते बोलले उडवल्यावर पुणेकरांची टर, अशी बायको असती तर शनिवारवाड्यात माझ्यासाठी खास ठेवली असती जागा सर्वाना बोललो असतो सौजन्याने वागा माझी गाडी नसती थांबवली कोणत्याच सिग्नलवर अशी बायको असती तर आता नाशिबाला दोष लावुन काय फायदा केला असता छातीठोकुन एक वायदा झालो असतो मी या जन्मातच पुणेकर अशी बायको असती तर

वाचने 22679 वाचनखूण प्रतिक्रिया 41

अभ्या.. Sat, 03/05/2016 - 12:12
लोल लोल लोल लोल हरिदासपंत आपणास मिपाचे 'देवांग पटेल(पुणेकर)' हा किताब शनवारवाड्यासमोरील पुलावर, जिथे टाकाऊ चार्जर मिळतात त्या गर्दीच्या साक्षीने देण्यात येत आहे. जरा सोमवारपर्यंत थांबा. सारे हपिसखर्चानेनेट्वापरणारे कसे मंगला टोकीजकडून त्वेषाने येतेत बघा. ;)

In reply to by अभ्या..

चांदणे संदीप Sat, 03/05/2016 - 13:04
गोंधळाला या... पुणे-६ च्या पुणेकरांनो गोंधळाला यावे... लक्ष्मी रोडच्या गिऱ्हाईकांनो.... जं.म. रोडला चिवचिवणाऱ्यांनो... प्रभात रोडच्या 'दाटी'करांनो... टिळकरोडच्या दुचाकीस्वारांनो.... झेडब्रीजला बिलगणाऱ्यांनो... अलका चौकात जमणाऱ्यांनो... पर्वतीवर चढणाऱ्यांनो... सारसबागेत दमणाऱ्यांनो... शनवारवाड्यासमोर ओरडणाऱ्यांनो... कोथरूडात निवांत असणाऱ्यांनो... एफसी रोडवर मिरवणाऱ्यांनो... मंडईतल्या शांतिप्रियांनो... युनिव्हर्सिटीत (झाडांमागे) लपणाऱ्यांनो... पाषाणरोडच्या हुच्चभ्रूंनो... कोर्टातल्या रिकामटेकड्यांनो... क्यांपातल्या एकमार्गींनो.... स्टेशनात धडपडणाऱ्यांनो... शनिपाराच्या भक्तगणांनो... लकडीपुलावर जाहीर होणाऱ्यांनो... गोंधळाला य्याव्वे! (खरा पुणेकर असलं काही ऐकून येतंच नस्तो म्हणा!) Sandy

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस Sat, 03/05/2016 - 13:55
त्यां मंगला टाकिजपाशी एक पाणीदार मामा मिसळ पण मिळते म्हणे. अर्थात आधी पातेल्यात डोकावून ती खावी लागते असे जाणकार म्हणतात.

In reply to by अभ्या..

सतिश गावडे Sat, 03/05/2016 - 14:13
सारे हपिसखर्चानेनेट्वापरणारे कसे मंगला टोकीजकडून त्वेषाने येतेत बघा. ;)
सगळ्यांचीच कुवत नसते हो उद्योगपती होऊन स्वतःच्या खर्चाचे नेट वापरण्याची. ;)

In reply to by अभ्या..

नीलमोहर Sat, 03/05/2016 - 14:31
हापिसकडूननेटहीएकमेवसुविधामिळतअसेलतरकावापरूनयेआणित्याबद्दलनेट्पॅकवापरणार्‍यांनीकशासाठीजळावेम्हणे? आणि मंगला टोकीजकडूनच का यायचे? पुणेकरांना येण्यासाठी गल्लीबोळातले अनेक शॉर्ट्कट आहेत ;)

In reply to by नीलमोहर

सतिश गावडे Sat, 03/05/2016 - 14:40
हापिसकडूननेटहीएकमेवसुविधामिळतअसेलतरकावापरूनयेआणित्याबद्दलनेट्पॅकवापरणार्‍यांनीकशासाठीजळावेम्हणे?
अगदी हाच विचार मनात आला होता. मात्र सोलापूरी शिव्या खायच्या नसल्याने "जळजळ" शब्द लिहीण्याचा मोह आवरला. :)
आणि मंगला टोकीजकडूनच का यायचे? पुणेकरांना येण्यासाठी गल्लीबोळातले अनेक शॉर्ट्कट आहेत ;)
ते सोलापूरचे असल्याने पुण्याचे गल्ली-बोळ त्यांना ठौक नसावेत.

In reply to by सतिश गावडे

अभ्या.. Sat, 03/05/2016 - 16:48
नवकविंचा सत्कार कुठे आयोजित केला आहे ते वाचावे. तेथे जायचा मंगला टोकीज कडूनचा रस्ता मला माहीती आहे. बाकी गल्ल्या काहून हुडकायच्या?

In reply to by अभ्या..

नाखु Sat, 03/05/2016 - 17:08
नाहीत हे मोठ्या मनाने मान्य करावे काहून पंगा घ्यावा पुन्या-धन्याशी (अस्स होतं या धाग्यावर आपोआप यमके जुळतात.) पूणेरी शेजारी नाखु

हरिदास Sat, 03/05/2016 - 12:24
या कवितेतून कोणाला ही दुखावण्याचा मनसुबा नाही. कोणाचे मन दुखावले असल्यास मी मनपूर्वक माफी मागतो.

असे https://lh3.googleusercontent.com/-JzdxFGOQU4g/U96Bo-ExL7I/AAAAAAAACeU/qg20_NBM6Wo/s640/blogger-image--1681305898.jpg डब्डे असते तर,आम्ही असे बसलो नसतो भर गवतात लुंगी घालून... सक्काळी सक्काळी निघालो नसतो (दोन दगडांवर!) त्याची नसती आली क'मोडला सर असे डब्डे असते तर!

In reply to by प्रचेतस

सतिश गावडे Sat, 03/05/2016 - 14:26
होय. हेच आम्चे जुने गुर्जी. कस्सा राव थांबू... या अजरामर तांब्या कवितेची आठवण झाली या निमित्ताने.

In reply to by सतिश गावडे

नाखु Sat, 03/05/2016 - 14:32
एक वेळ अंड्याविना बुर्जी चालेल पण डबड्याविना गुर्जी हे कसं खपवून घेणार.... ये अशक्य है अनहोनी है. खास गुरुजी आणि वरील लोकांसाठीच हे गाणे.. पसंद

गणेशा Sat, 03/05/2016 - 15:53
आवडली कविता ! चितळ्यांनी रांग थांबवली असती तर तुमच्या तशा बायकोलाच आम्ही घेवुन जावे लागले असते दरवेळेस असे सहज वाटले..

In reply to by गणेशा

अभ्या.. Sat, 03/05/2016 - 16:50
चितळ्यांनी रांग थांबवली असती तर तुमच्या तशा बायकोलाच आम्ही घेवुन जावे लागले असते दरवेळेस
गणोबा काय रे ह्या वाक्याचा अर्थ? काही लागेना बाबा टोटल. :(

In reply to by अक्षय१

अभ्या.. Sat, 03/05/2016 - 19:02
नाहीतर????? असो. एका व्यक्तीला भेटा. सतीसभौ नाव आहे त्यांच्या काकांचं. (म्हन्जे सतीस्भौ स्न्गतिल, पुतनेभौ पाथ्व्तिल लिहुन)

पैसा Wed, 03/09/2016 - 13:08
अशीच अमुची आई असती वगैरे आठवले! कवीला जास्त दु:ख बायको "अश्शी" नसण्याचे आहे की पुण्यात नसण्याचे आहे ते कळ्ळे नाही.