मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सुख

चांदणे संदीप · · जे न देखे रवी...
हरवलेले ते सापडले सापडले हरवल्यानंतर हरवले सापडण्याआधी      कळाले सापडल्यानंतर! तेच होते ते जरी ते न राहिले तसे तरी हवे होते ते तसेच तेव्हा      कळाले सापडल्यानंतर! भाव पुसा बाजाराला दाम जरी ना लाविला अनमोल ते आहे खरे      कळाले सापडल्यानंतर! शब्दांचा ना लागे ठाव जरी दोन अक्षरांचा गाव 'सुख' म्हणती सारे त्याला      कळाले सापडल्यानंतर! - संदीप चांदणे

वाचने 2779 वाचनखूण प्रतिक्रिया 12

नाखु 04/03/2016 - 15:15
शब्दांचा ना लागे ठाव जरी दोन अक्षरांचा गाव

चांदणे संदीप 04/03/2016 - 15:48
वल्ली, जव्हेरगंज, नाखुकाका, हरिदास, मस्त वाटल लगेच प्रतिक्रिया वाचून! :) धन्यवाद, Sandy

खेडूत 04/03/2016 - 17:45
:) अवडली कविता हे कळाले वाचल्यानंतर...

चांदणे संदीप 04/03/2016 - 22:54
खेडूतअण्णा, ३ए, रातराणीतै, प्रतिसादाबद्दल धन्यवाद! Sandy