जगण शिकतोय मी आता.......!
लेखनविषय:
काव्यरस
जगण शिकतोय मी आता जुनी कात टाकून,
अंकुरापरी मातीतून पुन्हा उगवून
काही नवीन तारा जोडून
जगण्याची नवीन धून बनवून,
जुन्याच शब्दांना जराशी
वेगळी चाल देवून, जगण शिकतोय मी आता….
सुखानं सुखाशी थोड गुणून
दुखांना दुखाशी घेतलं भागून,
बाकी काही उरेल ना उरेल
आयुष्याच गणित पाहतोय पुन्हा सोडवून, जगण शिकतोय मी आता….
स्वप्नांना जरा पुन्हा जाग करून
तुटलेल्या वाटां सांकवाना जोडून,
निशब्द नात्यांना हळुवारपणे
पुन्हा पुन्हा हसवून, जगण शिकतोय मी आता….
चुकांना किती जायचो घाबरून
अपयशाला रोज कंटाळून
हार जीत आता खूप दूर राहिलेत
मी प्रयत्नांनाच बसतो कवटाळून, जगण शिकतोय मी आता….
वाचने
1519
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
जगण का जगणं?
In reply to जगण का जगणं? by प्रचेतस
मला वाटलं कोणा जगन नावाच्या मित्राला हाक मारताहेत ते! ;-)
In reply to =)) by एस
थोडया शाब्दिक चुका समजून घ्याल हि अपेक्षा आहे.
In reply to नाही हो… by एकप्रवासी
एकवेळ गद्यात शाब्दिक चुका क्षम्य आहेत पण पद्यात असू नयेत नाहीतर अर्थच बदलतो हो. अगदी मोकलाया दाही दिशा होऊन जातं.
In reply to एकवेळ गद्यात शाब्दिक चुका by प्रचेतस
सहमत आहे तुमच्या मताशी.
"जगणं" च लिहायचं होत, चुकून जगण लिहिलं गेलंय.
जगण का जगणं?