निशब्द

लेखनविषय:
काव्यरस
शब्दांनी आज बंड केले होते नव्हते सर्व नेले उरावे हाती असे जमवलेच नाही क्षणभंगुर लालसेने षंड केले वाटते वाचा पांगुळ झाली निराशा आशेस वांझ झाली ओहोटीने भरतीस दिला नकार नकळे कोणती ही भूल झाली प्रकाशाने रविसंगे घात केला वसंताला ग्रिष्माने आघात केला डोळ्यांनीच काळजाची वाट पुसली लेखणीचा प्राण का गर्भात गेला शायराच्या शायरीतून भाव गेला काटयांनीच गुलाबाशी घाव केला दिव्यास पतंगाने का बदनाम केले शब्दांनी भावनांशी लपंडाव केला शब्दास शब्दांनी हे शब्द द्यावे शब्दांचे शब्द शब्दात ल्यावे शब्दाविण ना आधार आम्हास कुणाचा शब्दसुमने रसिकांनी निशब्द व्हावे

स्वानंदचा बावरा आणि कबीराचा निरंजन

लेखनप्रकार
एक एक सकाळ एक एक नवीन गाणं घेऊन येते. आणि मग तेच गाणं दिवसभर माझा ताबा घेऊन बसतं. दोन दिवसापूर्वी असंच झालं. "हजारो ख्वाहिशे ऐसी" या चित्रपटातलं, "बावरा मन देखने चला एक सपना" हे गाणं आठवलं. स्वानंद किरकिरे साहेबांनी एकंच शब्द वापरला आहे "बावरा" पण काय मौज केली आहे ! या "बावराला" समर्पक शब्द मला मराठीत सापडला नाही. पण त्याला जवळ जाणारा एक शब्द आहे बेभान. तुम्हाला अजून चांगला शब्द सापडला तर कमेंट मध्ये सुचवा. गाण्याचे बोल खाली देतोय.

जगण शिकतोय मी आता.......!

लेखनविषय:
काव्यरस
जगण शिकतोय मी आता जुनी कात टाकून, अंकुरापरी मातीतून पुन्हा उगवून काही नवीन तारा जोडून जगण्याची नवीन धून बनवून, जुन्याच शब्दांना जराशी वेगळी चाल देवून, जगण शिकतोय मी आता…. सुखानं सुखाशी थोड गुणून दुखांना दुखाशी घेतलं भागून, बाकी काही उरेल ना उरेल आयुष्याच गणित पाहतोय पुन्हा सोडवून, जगण शिकतोय मी आता…. स्वप्नांना जरा पुन्हा जाग करून तुटलेल्या वाटां सांकवाना जोडून, निशब्द नात्यांना हळुवारपणे पुन्हा पुन्हा हसवून, जगण शिकतोय मी आता….

पहिली चाचणी

कविता लिहिल्यावर करतो मी गुणवत्ता तपासणी, अर्थात बायकोवरच असते त्याची पहिली चाचणी, कवितेचे नाव काढताच पडते ती बुचकळ्यात, पण ऐकल्यानंतर, निष्कर्ष लगेच कळतो तिच्या डोळ्यांत !! डोळ्यांत हरवते ती माझ्या, लवते न तिची पापणी, लगेच टपकतो अश्रू, जणू सुखावता माहेरच्या आठवणी, ग्यासवर दूध ऊतू गेल्याचे, शल्य मनी नसते या क्षणी, विविधभारतीवर रमतो दोघे, ऐकत सुरेल प्रणय-गाणी.

५. दुष्काळ झळा ... रानातली वाट..

लेखनविषय:
काव्यरस
बर्‍याच दिवसानी पुन्हा थोडे कवितेत लिहावे म्हणतोय .. आवडले तर सांगा... चोचभर दाण्यासाठी वेशी बाहेर पाखरं टीचभर पोटासाठी घर उंबर्याशी वैर || पाणी आटलं डोळ्यात शेत जळलं रानात पोर धाडलं शरात गाव दुष्काळ पिडित || दारातली तुळस, कधीच.. कोरडी फट्ट काळी... हं, गोठ्यातली गाय, कत्तल खाण्यात कापली... पांढर्‍या रानागत, गावपोरींची कपाळं...दादल्यांनी त्यांच्या, होता जेंव्हा आवळला फास... शेतकरी हा अन्नदाता, हे सगळंच झुट... त्याच्या दाताखाली अन्नाचा, कुठ हाय तपास... शासनाची पांढरी बुजगावनी, फिरतात कधी शेतात..

अशी बायको असती तर

लेखनविषय:
काव्यरस
अशी बायको असती तर,आम्ही असे झालो नसतो भर तारुण्यात कफनी घालून, रानावनात निघालो नसतो तिची नसती आली कुणालाच सर अशी बायको असती तर पेशवाई गाजवली असती, मिजास मोठीकेली असती, राजबिंडा बनून मिरावलो असतो पर्वतीवर छोटस आमच असत घर अशी बायको असती तर सारसबागेच्या झुडुपांमधे तिला घेऊन बसलो असतो आम्ही सुद्धा छत्रीमागे तुम्हाला कधी दिसलो असतो तळ्यातल्या गणपतीने दिले असते अनेक वर अशी बायको असती तर तुळशीबागेतल्या फेरीवाल्यांनी केला असता सलाम एक ते चार रोज मस्त केला असता आराम दुकानदारानी माझ ऐकून वेळेअगोदर उघडले असते शटर अशी बायको असती तर चितळेबंधुनी होम डिलिव्हरी केली असती माझ्यास

गद्य-पद्य

ताव मारीता जीभेने, विसरुन सारे ते पथ्य बळ लाभता ओठांना, सुरसुरते ते मद्य भाव उधळता मनाने, तोडून सारे जे बंध्य कळ लागता जीवाला, सरसर सुचते ते पद्य

सुख

हरवलेले ते सापडले सापडले हरवल्यानंतर हरवले सापडण्याआधी      कळाले सापडल्यानंतर! तेच होते ते जरी ते न राहिले तसे तरी हवे होते ते तसेच तेव्हा      कळाले सापडल्यानंतर! भाव पुसा बाजाराला दाम जरी ना लाविला अनमोल ते आहे खरे      कळाले सापडल्यानंतर! शब्दांचा ना लागे ठाव जरी दोन अक्षरांचा गाव 'सुख' म्हणती सारे त्याला      कळाले सापडल्यानंतर! - संदीप चांदणे

नवोदित कवी

लेखनविषय:
काव्यरस
नकोत मजला टाळ्या चुटक्या वाहवाही अन मान बढाई कोऱ्या पाट्या तुमच्या आमच्या रसिक आपुली बाप नि आई कुणी कल्पतो आकाशगंगा कुणी वर्णीतो प्रीत पतंगा नाद कुणासी विठू रायाचा रंगून जातो भलत्या रंगा अलंकारे सजवी कुणी कविता कुणाची वाहे दुःख सरिता भलत्या भलत्या कल्पना स्फुर्ती शब्द निराळे भाव पेरिता नवकवी मीही धडपड करतो फाटके तुटके शेले विणतो तुमच्या दारी हात जोडुनी कृपाप्रसादा निशिदिनी झुरतो रांगत्या मुलासी उचलुनी घ्यावे अनुभव अंजन नयनी दयावे तुम्हीच दावा चूक आमुची दिशा दावूनी मार्गस्थ करावे शब्दास शब्दांनी न्याय मिळावा नवजात प्रवाहे सहज रुळावा कल्पवृक्ष हा बहरत राहो नव्या कळ्यांनी सदा फ़ुलावा :हरिदास

आमचे आजोबा [बालकविता]

लेखनविषय:
काव्यरस
दोन पाय अन आधार काठी तीन पायांचे आमचे आजोबा.. पाठ ताठ खांदेही ताठ ना दुखतो एकही खुबा.. दृष्टी शाबूत दातही मजबूत हास्याचा तर नित्य धबधबा.. धाक दरारा अजून वाटतो गल्लीत साऱ्या त्यांचा दबदबा.. गिरणीत जाती घेऊन हाती दहा किलोचा दळण डबा.. चौरस आहार सतत विहार आरोग्याचा मंत्र अजूबा.. नव्वदीतला तरुण जणू हा पार शंभरी करणे मनसुबा .. ......... विजयकुमार देशपांडे .
Subscribe to कविता