मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तू दिलेल्या वेदना

जयवी ·

मदनबाण 01/12/2008 - 17:23
जी नशा युद्धातल्या मरणात आहे ती नशा लाचार या जगण्यात नाही व्वा......... कविता आवडली.. मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

उंब-याशी थांबले पाऊल माझे स्वागताला आसवे दारात नाही का जपावे व्यर्थ मी झोळीस माझ्या आज पुरते दु:ख ही पदरात नाही

दत्ता काळे 01/12/2008 - 19:36
उंब-याशी थांबले पाऊल माझे स्वागताला आसवे दारात नाही का जपावे व्यर्थ मी झोळीस माझ्या आज पुरते दु:ख ही पदरात नाही . . . ग्रेट !

वेताळ 01/12/2008 - 19:45
पेलणे गांडीव तुजला शक्य नाही मनगटी दुबळ्या तुझ्या ती बात नाही छान जी नशा युद्धातल्या मरणात आहे ती नशा लाचार या जगण्यात नाही क्या बात है..अगदीच मनातलं वेताळ

प्राजु 01/12/2008 - 21:11
पेलणे गांडीव तुजला शक्य नाही मनगटी दुबळ्या तुझ्या ती बात नाही जबरदस्त. का जपावे व्यर्थ मी झोळीस माझ्या आज पुरते दु:ख ही पदरात नाही शेवट खूपच छान. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

जयवी 02/12/2008 - 12:09
तहे दिल से शुक्रिया दोस्तो !! तुम्हा सगळ्यांचे अभिप्राय वाचून छान वाटलं. लेकिन दिल बहोत भारी है..... :( जे काही सुरु आहे ... खूपच बेचैन करणारं आहे.... :(

तू दिलेल्या वेदना मी गात नाही ती उधारी चुकविणे नशिबात नाही पेलणे गांडीव तुजला शक्य नाही मनगटी दुबळ्या तुझ्या ती बात नाही भोगण्याचा शाप आहे नंदिनीला आजही का आग प्रतिकारात नाही जी नशा युद्धातल्या मरणात आहे ती नशा लाचार या जगण्यात नाही उंब-याशी थांबले पाऊल माझे स्वागताला आसवे दारात नाही का जपावे व्यर्थ मी झोळीस माझ्या आज पुरते दु:ख ही पदरात नाही जयश्री अंबासकर

जगायचे जगायचे !

पल्लवी ·

In reply to by घाटावरचे भट

राघव 27/11/2008 - 12:43
असेच म्हणतो. ताम्र अग्रजेपरी..क्षितीज पेटवायचे, [पण] चंद्रभान ठेवुनी निमूट मावळायचे वा वा..! बहोत खूब! सुंदर! मुमुक्षु

वि.सु : ही कविता माझा मित्र राजदीप जोशी ह्याची असुन त्याच्या वतीने व पुर्वपरवानगीने इथे मी प्रसिद्ध करत आहे. असेच धडपडायचे..पुन्हा पुन्हा उठायचे, मधेच डगमगायचे.. तरी उभे रहायचे ! व्यथेत गलबलायचे..पडायचे..रडायचे, करुन अश्रु कोरडे, लढायचे लढायचे ! घाव घालता कुणी.. फुटायचे..तुटायचे, असेच मोड-मोडता, जडायचे घडायचे ! कल्पनेच्या अंगणी..निमग्न रिमझिमायचे, पहाट-पालवी सवे सजायचे.. फुलायचे ! ताम्र अग्रजेपरी..क्षितीज पेटवायचे, [पण] चंद्रभान ठेवुनी निमूट मावळायचे ! हवे तिथे असायचे,नको तिथे नसायचे, दुरांत रम्य जीवना, जगायचे जगायचे ! ~राजदीप जोशी~

हि कार!

केसुरंगा ·
प्रदीप कुलकर्णींची 'शिकार!' बघून आमची कार आम्हाला आठवली नसती तरच नवल! ;) ....................................... हि कार! ............................................... उन्हात या कोवळ्या सकाळीच धार येते नि संपता संपता बघा ही दुपार येते! कधी तरी भेटती जुने मित्र सांजवेळी... नशेत होतात छान गप्पा...

कधीच नाही

जयवी ·

निखिलराव 22/11/2008 - 14:50
जग जिंकले सदा मी, जिंकेन मी पुन्हा ते का जिंकणे तुला मज जमले कधीच नाही वा वा वा वा...

दत्ता काळे 22/11/2008 - 16:31
डोळ्यात जागलेल्या रात्री कितीक माझ्या स्वप्नात भेटणे तुज सुचले कधीच नाही . . . फार आवडलं

विसुनाना 22/11/2008 - 18:05
सर्व शेरांतल्या कल्पना आवडल्या. एकूण गझल आवडली. गझल अजून गोळीबंद करता आली असती असे वाटले. नाही/ नाही हा भेद सूक्ष्म आहे. अनेकवचनी कर्त्याला 'नाही' ऐवजी 'नाहीत' असे वापरावे लागेल असे वाटते. जाणकारांनी मत द्यावे. उदा. का घाव तू दिलेले भरले कधीच नाही? किंवा का घाव तू दिलेला भरला कधीच नाही अशा रितीने. चु.भू.द्या.घ्या.

शितल 22/11/2008 - 18:35
जयवी ताई, सुंदर ग़झल केली आहे. का बंध रेशमाचे जुळले कधीच नाही चित्रात रंग माझ्या भरले कधीच नाही जग जिंकले सदा मी, जिंकेन मी पुन्हा ते का जिंकणे तुला मज जमले कधीच नाही हे खासच . :)

प्राजु 22/11/2008 - 22:58
जखमा दिल्या जगाने, बुजल्या तशाच सा-या का घाव तू दिलेले भरले कधीच नाही जग जिंकले सदा मी, जिंकेन मी पुन्हा ते का जिंकणे तुला मज जमले कधीच नाही हे शेर तर अत्युच्च. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

जयवी 23/11/2008 - 12:33
निखिलभाऊ, बाळकराम, तात्या, शितल, प्राजु...... तहे दिल से शुक्रिया :) विसुनाना..... नाही आणि नाहीत मधला फरक जाणवतोय. तुमच्या या टीप्स नक्की लक्षात ठेवेन. असंच मार्गदर्शन असावं शिष्याला :)

In reply to by जयवी

विसुनाना 24/11/2008 - 10:50
हे काय? छे! छे! गुरु-शिष्य वगैरे नाही हो. केवळ एक समकालीन वाचक म्हणून काय वाटले ते लिहिले. आगंतुकपणाबद्दल माफी असावी.

सुवर्णमयी 24/11/2008 - 04:54
क्या बात है! जग जिंकले सदा मी, जिंकेन मी पुन्हा ते का जिंकणे तुला मज जमले कधीच नाही हा विशेष आवडला.

मनीषा 24/11/2008 - 06:33
बरसात ही सुरांची तव मैफ़लीत होते मज त्या सरींत भिजणे जमले कधीच नाही ...सुंदर!!!

मदनबाण 24/11/2008 - 07:36
जखमा दिल्या जगाने, बुजल्या तशाच सा-या का घाव तू दिलेले भरले कधीच नाही व्वा..जबरदस्त.. मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर

का बंध रेशमाचे जुळले कधीच नाही चित्रात रंग माझ्या भरले कधीच नाही त्या सावळ्याच होत्या रात्री फिरून माझ्या देहात चांदणे मग फुलले कधीच नाही बरसात ही सुरांची तव मैफ़लीत होते मज त्या सरींत भिजणे जमले कधीच नाही डोळ्यात जागलेल्या रात्री कितीक माझ्या स्वप्नात भेटणे तुज सुचले कधीच नाही जखमा दिल्या जगाने, बुजल्या तशाच सा-या का घाव तू दिलेले भरले कधीच नाही जग जिंकले सदा मी, जिंकेन मी पुन्हा ते का जिंकणे तुला मज जमले कधीच नाही जयश्री अंबासकर

हिशोब

उपटसुंभ ·

राघव 20/11/2008 - 13:04
नेहमीप्रमाणेच छान गझल! विचार मांडायाला त्यांनी दिली मुभा पण, छातीवरती तलवारीचे टोक ठेवले. देवा तुजला नवसाचा बघ चेक फाडला. गार्‍हाणे मी मात्र आपुले “रोख” ठेवले. हे अगदी खास! मुमुक्षु

दत्ता काळे 20/11/2008 - 13:15
देवा तुजला नवसाचा बघ चेक फाडला. गार्‍हाणे मी मात्र आपुले “रोख” ठेवले. - वा, वा, फार सुंदर

कपिल काळे 20/11/2008 - 20:47
विचार मांडायाला त्यांनी दिली मुभा पण, छातीवरती तलवारीचे टोक ठेवले. वा वा सुंदर गझल. मिपावर पण सध्या असे आमच्या छातीवर टोक ठेवलेले आहे http://kalekapil.blogspot.com/

मदनबाण 21/11/2008 - 05:22
छान गझल... मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर

मनीषा 21/11/2008 - 12:35
आवडली विचार मांडायाला त्यांनी दिली मुभा पण, छातीवरती तलवारीचे टोक ठेवले. ... छानच

कर्जाचे अन कर्जमाफीचे ओघ ठेवले. दान दिले पण परताव्याचे योग ठेवले. पाणी आता साधन झाले लढण्यासाठी, पिण्यास बाकी पेप्सी आणि कोक ठेवले. दर रविवारी संस्कृतिरक्षण पुरले नाही. रोज पार्वती अन तुलसीचे “सोप” ठेवले. विचार मांडायाला त्यांनी दिली मुभा पण, छातीवरती तलवारीचे टोक ठेवले. देवा तुजला नवसाचा बघ चेक फाडला. गार्‍हाणे मी मात्र आपुले “रोख” ठेवले. चित्रगुप्तही मला म्हणाला कमाल झाली. हिशोब होते मीही ऐसे “चोख” ठेवले..! – अभिजीत दाते

बरेच काही..!

उपटसुंभ ·

सागर 07/11/2008 - 12:43
दात्यांचे नाव उज्वल केलेस मित्रवर्या... सुंदर अभिजित सुंदर खास करुन शेवटच्या ३ कडव्यांत प्राण ओतला आहे तुझे वचन स्वप्नी येण्याचे म्हणून निजतो. घडले आहे जागवेलसे बरेच काही.. जगता जगता नकळत पायी तुडवत गेलो. श्रद्धा, निष्ठा, प्रेम, भरवसे बरेच काही.. आज किनारी उरलेले वेचण्यास आलो, वचने, शपथा, पावले, ठसे बरेच काही..! एकदम सुंदर... अजुन येऊ देत.... माझ्या हृदयांत पण उमटतात तरंग काव्याचे तिच्या - माझ्या, आठवणी.... आणि बरंच काही.... (कधी तरी कविता करणारा) सागर

मस्त आहे संगणकिय किडे तयार करणे त्यावर नियंत्रण ठेवणे त्यांच्यात विध्वंसक क्षमता तपासणे आणी त्याचा वापर पुरेपुर करणे यात आम्ही सध्या प्रगती पथावर आहोत

प्राजु 07/11/2008 - 23:14
क्षितिजापाशी सांज देऊनी गेली मजला. निशा, चांदणे, गंध, कवडसे बरेच काही.. सुंदर.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

आठवशिल तर आठवेलसे बरेच काही. अजुनी आहे राहिले तसे बरेच काही. मुठीत नाही आली स्वप्ने खंत कशाला, ओंजळीतही मोहवेलसे बरेच काही.. क्षितिजापाशी सांज देऊनी गेली मजला. निशा, चांदणे, गंध, कवडसे बरेच काही.. तुझे वचन स्वप्नी येण्याचे म्हणून निजतो. घडले आहे जागवेलसे बरेच काही.. जगता जगता नकळत पायी तुडवत गेलो. श्रद्धा, निष्ठा, प्रेम, भरवसे बरेच काही.. आज किनारी उरलेले वेचण्यास आलो, वचने, शपथा, पावले, ठसे बरेच काही..! -- अभिजीत दाते

(होता खमंग, होता चकणाहि खास बाकी)

चतुरंग ·

प्राजु 05/11/2008 - 00:37
जबरदस्त.. बरेच दिवसांनी फुल टॉस मिळालेला दिसतो आहे.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर 05/11/2008 - 00:48
फुटलेत पेग सारे अन्‌ फोडलेत काही उरला तिथेच माझा 'रीगल शिवास' बाकी वा रंगाभैय्या, क्या केहेने...! :) आपला, (मॅक्डोवेल नंबर वन किंवा रॉयलस्टॅगच्या चपटीचा प्रेमी!) तात्या.

श्रीमान रंग्या नवटाककर यांची ही कविता अतिशय वास्तवदर्शी आहे. खास करुन या ओळी.
जाईन घरकुला मी, अद्याप आस बाकी उरलेत मात्र आता थोडेच ग्लास बाकी अद्याप दूर आहे घरचीच वाट माझ्या अद्याप मारतो हा तोंडास 'वास' बाकी
बिपिन कार्यकर्ते

टुन्न्न झालो मी आता नाही उरलि काहि बाकि दारु चिज है खराब आओ ईस खराबी को दुनियासे दुर करे साला एक बोतल तुम खतम करो एक हम कतम करे व्होड्का प्रेमी कोतवाल बरं?

चतुरंग 06/11/2008 - 10:19
सर्व रसिकांस धन्यवाद! (खुद के साथ बातां : रंगा, चकणा नीट बघून आणत जा रे, ह्या वेळी थोडे कच आले दाताखाली अशी काही रसिकांची तक्रार आहे, ऐकतोस ना? :? :W ) चतुरंग

उत्खनक 21/03/2013 - 14:06
हे विडंबन आवडण्याचं खास कारण म्हणजे मूळ गझल वाचायला यामुळे मिळाली. खरंच अप्रतीम कलाकुसर आहे मिलिंद फणसेंची! [रंगाष्टाईल] खुद के साथ बातां: पुर्वीची आंतरजालीय निकोपता आजकाल फारशी दिसत नाही, का तुझा अभ्यास कमी पडतोय रे उत्खनका??

In reply to by उत्खनक

प्यारे१ 21/03/2013 - 16:24
>>>पुर्वीची आंतरजालीय निकोपता आजकाल फारशी दिसत नाही, का तुझा अभ्यास कमी पडतोय रे उत्खनका?? एका लग्नाची गोष्ट मध्ये म्हटल्यासारखं ... इकडून चहा घ्यावं तिकडून दूध घ्यावं असं सुरु होतं 'तेव्हा' ! हनिमून संपून संसार सुरु झालाय मिपाचा. काहींनी सवतेसुभे काढले , काही घरातच राहून रुसवा धरुन राहिले, काही उसासे टाकू लागले, काही बंद खोलीत बोलू लागले, काहींनी संन्यास घेतला, काही साता समुद्रापार गेले नि काही आमचं तिकडं कसं बरं चाललंय म्हणायला अधून मधून वाकुल्या दाखवू लागले. संसार म्हटलं की असं होणारच नाही का? ;)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

चायल जुनीच कविता आहे वाट्टं. मला वाटले रंगाशेठ परतून आले की काय? सध्या कार्यमग्नतेमुळे वेळ मिळत नाही म्हटले.

मिलिंद फणसेंची अप्रतिम कारागिरी 'होता वसंत, होता सुमनात वास बाकी' वाचून आम्ही भारावून गेलो आणि त्या खुषीतूनच हे पहिल्या धारेचे विडंबन जन्मले! ;) होता खमंग, होता चकणाहि खास बाकी सारेच टुन्न होती पण आसपास बाकी जाईन घरकुला मी, अद्याप आस बाकी उरलेत मात्र आता थोडेच ग्लास बाकी मी प्यायलो किती ते? उमजे मला न काही हातात फक्त काजू करणे खलास बाकी! फुटलेत पेग सारे अन्‌ फोडलेत काही उरला तिथेच माझा 'रीगल शिवास' बाकी धुंडाळ नीट डावा पुढला खिसाच माझा अजूनी असेल तेथे 'चपटीच' खास बाकी ओठांवरी तिच्याही घनघोर युद्ध भाषा सांगू तिला कसे मी?

येथे..!

उपटसुंभ ·

अश्रूत चिंब भिजल्या शब्दास भाव नाही लावायचा व्यथेचा हलकाच "वर्ख" येथे.
आपल्याला आवाल्डी बॉ. कदाचित समजल्यामुळे असेल प्रकाश घाटपांडे

राघव 04/11/2008 - 12:35
खूप आवडली गझल! निष्पाप अन निरागस ते वय निघून गेले. छळतो कटाक्ष आणि सलतात स्पर्श येथे. फुलशील केवड्यासम, ध्यानात ठेव तेव्हा, नसतात फक्त भुंगे, वसतात "सर्प" येथे. हे अतिशय खास. मुमुक्षु

अरुण मनोहर 04/11/2008 - 14:02
एक मस्त गझल.

चेतन 04/11/2008 - 14:11
फुलशील केवड्यासम, ध्यानात ठेव तेव्हा, नसतात फक्त भुंगे, वसतात "सर्प" येथे. खुप आवडलं अश्रूत चिंब भिजल्या शब्दास भाव नाही लावायचा व्यथेचा हलकाच "वर्ख" येथे. सही..... चेतन

प्राजु 04/11/2008 - 20:00
सगळेच शेर खास आहेत. मुख्य म्हणजे रदिफ खूप वेगळा आहे.. ग्रेट! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चतुरंग 04/11/2008 - 20:32
(बर्‍याच दिवसांनी तुझी कविता दिसली!) अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण गजल! सर्व शेर एकसे एक! बहोत बढिया!! :) चतुरंग

मनीषा 05/11/2008 - 11:08
अश्रूत चिंब भिजल्या शब्दास भाव नाही लावायचा व्यथेचा हलकाच "वर्ख" येथे. ....सुंदर !!!

दृष्टीस हिमनगाचा वरचाच बर्फ़ येथे. करतात मग कशाला भलताच तर्क येथे. लाखात मोल ज्यांचे कवड्यात भाव झाले. अर्थाशिवाय नसतो कुठलाच "अर्थ" येथे. निष्पाप अन निरागस ते वय निघून गेले. छळतो कटाक्ष आणि सलतात स्पर्श येथे. फुलशील केवड्यासम, ध्यानात ठेव तेव्हा, नसतात फक्त भुंगे, वसतात "सर्प" येथे. अश्रूत चिंब भिजल्या शब्दास भाव नाही लावायचा व्यथेचा हलकाच "वर्ख" येथे. -- अभिजीत दाते

(तसा कुठे मी....)

चतुरंग ·
गझलेच्या विशेषांकातली अनंत ढवळे ह्यांची 'तसा कुठे मी..' ही गजल वाचली आणि माझे जिवापाड चालवूनही फसलेले अनेक प्रयत्न डोळ्यांसमोर येऊन गेले!

सुरेशभट डॉट इन गझल विशेषांक

आजानुकर्ण ·

विसोबा खेचर 02/11/2008 - 20:29
सदर दिवाळी अंकाच्या टीमचे मन:पूर्वक स्वागत... अवांतर : "आंतरजालीय वाचनीय" इथे अस दुवे देण्याकरता सोय केलेली आहे. असो.. उद्या मिपाचा जर दिवाळी अंक निघाला तर भटसाहेबांच्या संस्थळावर त्याची अशी ढळढळीत जाहिरात करता येईल किंवा नाही याबद्दल शंका आहे! :) असो, आपला, (दिलदार!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आजानुकर्ण 02/11/2008 - 20:34
मिपाचा गझल विशेषांक असल्यास नक्की करता यायला हवी. कारण ते संकेतस्थळ केवळ गझलांसाठीच आहे. अर्थात हे मत मी एक अपेक्षा म्हणून व्यक्त केले आहे. आपला, (अपेक्षित) आजानुकर्ण

In reply to by विसोबा खेचर

सदर दिवाळी अंकाच्या टीमचे मन:पूर्वक स्वागत... गझलांचा एक चांगला अंक वाचायला मिळणार यात शंकाच नाही. सदर दिवाळी अंकाच्या टीमचे मनःपुर्वक अभिनंदन !!! "आंतरजालीय वाचनीय" इथे अस दुवे देण्याकरता सोय केलेली आहे. अगदी हेच म्हणायचे होते, आंतरजालीय वाचनीय इथे दिवाळी अंकाचे अनेक सदस्य दुवे देत असतांना नवीन धागा सुरु करण्याची गरज नव्हती असे वाटते. अवांतर : संपादकांना लेखन हलवण्याची सुविधा असती तर आम्ही सदरील लेखन तिथेच हलवले असते -दिलीप बिरुटे (रोखठोक संपादक )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 02/11/2008 - 23:09
अगदी हेच म्हणायचे होते, आंतरजालीय वाचनीय इथे दिवाळी अंकाचे अनेक सदस्य दुवे देत असतांना नवीन धागा सुरु करण्याची गरज नव्हती असे वाटते. ] जाऊ देत बिरुटेशेठ! करू देत बापड्यांना जाहिराती! :) साले, वो भी क्या याद रखेंगे..! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आजानुकर्ण 02/11/2008 - 23:40
चतुरंगांना सहज गमतीने विचारलेल्या प्रश्नाला असले उत्तर पाहून आश्चर्य नाही परंतु खेद वाटला. बाकी चालू द्या. आपला (प्रवासी) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 02/11/2008 - 23:48
चतुरंगांना सहज गमतीने विचारलेल्या प्रश्नाला असले उत्तर पाहून आश्चर्य नाही परंतु खेद वाटला. माफ करा.. तिरमिरीत तसं लिहून गेलो.. चुकलंच माझं... सॉरी... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

खरा डॉन 04/11/2008 - 05:46
तात्या सॉरी म्हणायच कारण न्हाय! आनी तुझा प्रतिसाद अजिबात उडवायचा नाही. आपल्याला तर लै आवडला..

खरा डॉन 02/11/2008 - 21:46
झालं आता तिथल्याही गझला इथंच एकएक करुन यायला लागतील आणी त्याचे समर्थन देखिल

रामदास 02/11/2008 - 22:01
एकूण मांडणी छान आहे.गझलांबाबत लिहू शकलो नाही.गझल थोडी-थोडी स्कॉचसारखी मूड बनवून घेतो. गझल या एका विषयाला वहीलेला अंक म्हणून जास्त कौतुक वाटले.

आनंदयात्री 03/11/2008 - 00:20
वा ! मेजवानीच आहे. धन्यवाद कर्णा. फक्त गझलेला वाहिलेला हा पहिलाच ऑनलाईन दिवाळी अंक असावा ! इथे माहिती करुन दिल्याबद्दल शतशः धन्यवाद ! नक्की वाचणार !

कर्णा, खूप छानच दुवा दिल्याबद्दल तुला मनापासून दुवा. नक्कीच वाचायला पाहिजे. बाकी एक काळ असा होता की दिवाळी अंक वाचता वाचता (लोकसत्ता, ललित, अबकडई पासून पाऽऽर शतायु पर्यंत :) ) जानेवारी उजाडायचा. भारताबाहेर खूप आठवण यायची दिवाळीअंकांची. आता आंतरजालावरील दिवाळीअंकांमुळे ही खंत मात्र दूर होते आहे. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बेसनलाडू 04/11/2008 - 05:09
कार्यकर्त्यांशी बहुतांश सहमत; फक्त खंत दूर न होता बव्हंशी कमी होते आहे, असे म्हणेन. (सहमत)बेसनलाडू गझल विशेषांक नक्की वाचणार. गझलेला समर्पित अशा या अंकाबद्दल संबंधितांचे हार्दिक अभिनंदन (अभिनंदक)बेसनलाडू