बरेच काही..!
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आठवशिल तर आठवेलसे बरेच काही.
अजुनी आहे राहिले तसे बरेच काही.
मुठीत नाही आली स्वप्ने खंत कशाला,
ओंजळीतही मोहवेलसे बरेच काही..
क्षितिजापाशी सांज देऊनी गेली मजला.
निशा, चांदणे, गंध, कवडसे बरेच काही..
तुझे वचन स्वप्नी येण्याचे म्हणून निजतो.
घडले आहे जागवेलसे बरेच काही..
जगता जगता नकळत पायी तुडवत गेलो.
श्रद्धा, निष्ठा, प्रेम, भरवसे बरेच काही..
आज किनारी उरलेले वेचण्यास आलो,
वचने, शपथा, पावले, ठसे बरेच काही..!
-- अभिजीत दाते
वाचने
1908
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
एकदम सुंदर... अजुन येऊ देत....
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मस्त आहे
क्षितिजाप