Skip to main content

हिशोब

लेखक उपटसुंभ यांनी गुरुवार, 20/11/2008 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
कर्जाचे अन कर्जमाफीचे ओघ ठेवले. दान दिले पण परताव्याचे योग ठेवले. पाणी आता साधन झाले लढण्यासाठी, पिण्यास बाकी पेप्सी आणि कोक ठेवले. दर रविवारी संस्कृतिरक्षण पुरले नाही. रोज पार्वती अन तुलसीचे “सोप” ठेवले. विचार मांडायाला त्यांनी दिली मुभा पण, छातीवरती तलवारीचे टोक ठेवले. देवा तुजला नवसाचा बघ चेक फाडला. गार्‍हाणे मी मात्र आपुले “रोख” ठेवले. चित्रगुप्तही मला म्हणाला कमाल झाली. हिशोब होते मीही ऐसे “चोख” ठेवले..! – अभिजीत दाते
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2052
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

नेहमीप्रमाणेच छान गझल! विचार मांडायाला त्यांनी दिली मुभा पण, छातीवरती तलवारीचे टोक ठेवले. देवा तुजला नवसाचा बघ चेक फाडला. गार्‍हाणे मी मात्र आपुले “रोख” ठेवले. हे अगदी खास! मुमुक्षु

देवा तुजला नवसाचा बघ चेक फाडला. गार्‍हाणे मी मात्र आपुले “रोख” ठेवले. - वा, वा, फार सुंदर

वा वा गजल आवडली.. नवसाचा चेक मस्तच ! :) -- लिखाळ.

विचार मांडायाला त्यांनी दिली मुभा पण, छातीवरती तलवारीचे टोक ठेवले. वा वा सुंदर गझल. मिपावर पण सध्या असे आमच्या छातीवर टोक ठेवलेले आहे http://kalekapil.blogspot.com/

छान गझल... मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर

आवडली विचार मांडायाला त्यांनी दिली मुभा पण, छातीवरती तलवारीचे टोक ठेवले. ... छानच