मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गझल

कुणी एक गझलाकार

दत्ता काळे ·
लेखनविषय:
हे जे काही मी रचलं आहे, ते नक्की कुठल्या काव्यप्रकारात बसेल हे माझ्या ल क्षात येत नाहीये. पण जसं सुचलं, तसं लिहिलं. घ्या सांभाळून दादानु गझलांची चळ्त रचतोच आहे छापण्या पुढे व्हा, मी येतोच आहे कुणी सांगण्या येई, गझल दे करुनी मागण्याआधी मी देतोच आहे लिहिण्यास पाने पड्ली, जराही कमी ती मुलांच्या वह्या मी उसवतोच आहे भिऊनी पळाले शब्द ओळीमधुनी गचांडी धरुनी, त्यांना बसवतोच आहे ओळ्खून गझलाकारास, प्रतिक्रिया जर दिली 'तिलाही' धुवाधार धुतोच आहे

पालखी

बेसनलाडू ·
लेखनविषय:
पूर्वप्रसिद्धी: मनोगत दिवाळी अंक २००८ 'अनिवासी (पण) भारतीय' म्हणुनी दुखर्‍या किती ओळखी डॉलरने भरले खिसे पण मने प्रेमास का पारखी? आहे जे विसरायचे ठरवले, करतो उजळणी जरा (विस्मरणे नव्हती कधीच कुठली सोपी, मनासारखी) आषाढा, बघतोस काय नुसते! भिजवायचे मग कुणी? 'आधी तू, मग मी' करीत बसलो, खोळंबली ना सखी! दुर्दैवा, इतके नकोस विसरू बाबा स्वत:ला कधी! माझे नाव पुरेल की तुज हवी ओळख तुझी आणखी? आयुष्या, तुज भोगले नि जगलो - ऐटीत, राजापरी तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी

(आशिक मी अन माल भेटली होती 'कविता')

चतुरंग ·
लेखनविषय:
अनिरुद्ध अभ्यंकरांची 'आवरताना काल मिळाल्या काही कविता' वाचली आणि आम्हाला भेटलेल्या काही 'कविता' डोळ्यांसमोर तरळून गेल्या!

आवरताना काल मिळाल्या काही कविता...

अनिरुद्ध अभ्यंकर ·
लेखनविषय:
आवरताना काल मिळाल्या काही कविता लिहिलेल्या मी सार्‍या होत्या तुझ्याच करता लिहायचो मी पत्र तुला दररोज पानभर जपुनी ठेवली ती सारी मी न पाठवता तुझ्या संगती घालवलेले क्षण सोनेरी आले नाही कधीच पण ते मज गोठवता दिलेस तू ते फूल आजही वहीत आहे गंध तुझा मज करतो वेडा वही उघडता अजून येती डोळ्यांमध्ये अश्रू अवचित वाट वेगळी करणारा तो क्षण आठवता कधी एकटा असलो की मी रडून घेतो सवयीने मग येते आता हुकुमी हसता खूप ठरवले सारे सारे विसरायाचे कुणास आले सांगा पहिले प्रेम विसरता? -अनिरुद्ध अभ्यंकर

नाही तर नाही.... जा!

प्राजु ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
नमस्कार मंडळी, खालील गझल मी मायबोली च्या गझल कार्यशाळेसाठी लिहिली होती. नाही रदिफ घेऊन लिहायची होती गझल. गझल लिहिण्यासाठी महत्प्रायास करावे लागले आणि अजूनही लागताहेत. ही गझल कार्यशाळेसाठी पाठवल्यावर तिच्यात १-२ बदल करून संयोजकांनी तिला निर्दोष गझल असे जाहीर केले आणि माझा जीव भांड्यात की मतल्यात पडला.. खरंतर, गझलेच्या कार्यशाळेमध्ये भाग घेण्यापूर्वीही जवळ जवळ २ ते २.५ महिने मी गझल लिहिण्याचा अखंड प्रयत्न करत होते.. त्यासाठी माझे गुरू आणि मिपाचे गझलकार आणि निवृत्त विडंबन सम्राट केशव सुमार उर्फ अनिरूद्ध अभ्यंकर यांना भरपूर त्रास दिला आहे.

(मदार)

चतुरंग ·
लेखनविषय:
नीरज कुलकर्णी यांची 'मदार' कशावर आहे हे बघून मला माझी मदार विडंबनावरच कशी आहे त्याची प्रकर्षाने जाणीव झाली आणि.... नवटाक ह्या कवींची, भाषा सुमार आहे... आता विडंबने ही, माझी मदार आहे... आश्वासने मिळाली, त्यांना जरी कुणाची; निश्चीत आज त्यांची, कविता शिकार आहे... मी हासलो तुलाही, वाचून ओळि सार्‍या; असतील दोन जमल्या, तिसरी चुकार आहे... का भाव मोल केला, ही शायरी अशी का? मारुन सर्व बाता, होतो फरार आहे! 'हे काव्य आज त्याचे, उसवून काढले मी!!' हा कोणता निराळा, शिंपी टुकार आहे? गझला किती कवींच्या, मी फाडल्या प्रभावी; 'रंग्यास' कल्पनेचा, चढला बुखार आ

(आनंदाने)

चतुरंग ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
अजब यांना 'आनंदाने' कविता करताना बघून मला राहवले नाही, अर्थात तत्काळ विडंबन धर्माला जागणे क्रमप्राप्त होते! ;) पुन्हा पुन्हा तो कविता रचतो, आनंदाने सरसावुन मी लगेच बसतो, आनंदाने... शब्द बदलणे अवघड नसते माझ्यासाठी बोरू त्याचा तोच झिजवतो, आनंदाने... जालावरती टुकार कविता तुडुंब मिळती जुन्या नव्या मी सर्व उसवतो, आनंदाने... "विडंबुनी ही कविता तुजला काय मिळाले? " चडफडणारे प्रश्न ऐकतो, आनंदाने... पूर्वी काव्ये छोटी-मोठी भादरायचो; आता गजला तासत सुटतो, आनंदाने... लिखाण तुमचे आनंदातच चालू राहो विडंबने ही 'रंग्या' करतो, आनंदाने... चतुरंग

(अफवा)

चतुरंग ·
लेखनविषय:
प्रसाद कुलकर्णींच्या 'अफवा' वाचून आमच्या पूर्वीच्या काही प्रमादांबद्द्ल उठलेल्या अफवांची आठवण ताजी झाली!

(खायचे आहे कुठे?)

चतुरंग ·
लेखनविषय:
अजब यांना 'जायचे आहे कुठे?' हा पडलेला प्रश्न बघून, आम्हाला बहुतेक रोज रात्री पडणारा प्रश्न डोळ्यांसमोर न येता तरच नवल! काल रात्री प्रश्न पडला, खायचे आहे कुठे? चापली अंडा-करी, 'संदेश'* तो आहे कुठे?... ओळखीचे भेटले ते लोक सारे हासती ढेरपोट्या कसरतीला चालला आहे कुठे?... सॅलडे तर येत होती, जात होती नेहमी मी म्हणालो, पण मला लाडू बघू आहे कुठे?... दिसत असती तीच ती स्वप्ने मला का सारखी? कोण तो?

जाम कोणी देइ

धनंजय ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
******************** * जाम कोणी देइ अव्हेरू नये चुंबनाला "ना" कधी सांगू नये * खाक जाळे दु:ख मोठे थेंबही एकही थेंबा कधी सांडू नये * भेटता तू स्वर्ग भेटे या इथे या क्षणाला दृष्ट मी लावू नये * काल 'हो' अन् आज 'नाही' सांगणे काळजाशी खेळ हे खेळू नये * घोट घेता घात करिते वारुणी तीत मेलेल्या पुन्हा मारू नये * वेगळी काही नशा होते जया जाहिदाचे नाव त्या देऊ नये * ********************