मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गझल

सुवर्णप्रभा..

प्राजु ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
लाल केशरात रंग खेळते पहाट खास दिव्य तेज फाकताच जागली दिशांत आस... तारकांत लोपली निशा उषेस पाठवून अग्निरंग होत धुंद पूर्व रेखिते नभांस... सूर्य बिंब लाल बुंद भेदते तमास पूर्ण विश्वतीर पेटताच जाहला सुवर्ण भास... वाहताच वात मंद , मंद मंद गंध धुंद सांडताच पारिजात भूवरी पडेल रास... थेंब थेंब पाकळ्यांत आळसांत चिंब चिंब का जपून पाकळीत ठेवलेय मोतियास? ... सागरात गाज आणि लाट जात उंच उंच गारवा हवेत आणि वेड लागते मनांस... पंचमात तान घेत आज कोकिळा स्वरांत मोहरून आम्रही सुगंधितो चराचरास...

चूक..!

उपटसुंभ ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कैफात चूक झाली, डोळे भरून आले. "सैतान" ती म्हणाली, डोळे भरून आले. टाहो न ऐकले मी, धिक्कारल्या विनवण्या, रचला कलंक भाली, डोळे भरून आले. निःशब्द ती तिथे अन आक्रोश आत माझ्या कल्लोळ भोवताली, डोळे भरून आले. वदली अता जगाच्या छळतील रोज नजरा. मृत्यूच एक वाली, डोळे भरून आले. विझला इथे सुडाचा वणवा मनातला पण झाली चिते हवाली, डोळे भरून आले. तसबीर पाहिली ती भिंतीवरी तुझी अन. खपली पुन्हा निघाली, डोळे भरून आले. -- अभिजीत दाते

खाज!

चतुरंग ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
'माज!' वाचल्यावर 'खाज' सुटली नाही तर रंग्या कसला? तेव्हा सादर आहे .. कालचा 'गजकर्ण' थोडा आज आहे , आणि त्याची फार मोठी 'खाज' आहे ॥ कोणत्या वैद्याकडे मी जात नाही, आपल्या वैदूगिरीचा माज आहे ॥ आणि त्याची फार मोठी 'खाज' आहे ॥ कालच्या 'पेल्यातले' तात्पर्य थोडे, अन उद्याचा 'बेवडा' अंदाज आहे॥ आणि त्याची फार मोठी 'खाज' आहे ॥ घोरण्याचा ध्यासही आहे कधीचा, अंगणातच घोंगडी अन 'बाज' आहे॥ आणि त्याची फार मोठी 'खाज' आहे ॥ तोंड मी कोठे कधी लपवू पाहातो ना जनाची वा मनाची 'लाज' आहे ॥ आणि त्याची फार मोठी 'खाज' आहे चतुरंग

बर्फ जादाचा जणू...

केसुरंगा ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मिल्याचे 'स्वप्न एखादे जणू...' वाचताना आम्हाला सत्याची जाणीव झाली! ;) चार चौघांसारखे माझे पिणे हे चालले चार चौघांसारखे मी चार प्याले ढोसले स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या ग्लासातले बर्फ जादाचा जणू घालून आहे गोठले टेबलाला धडकुनी पडलो कितींदा मी जरी भंगले नाही तरी प्याले कधी हातातले घेतली काढून त्यांनी बाटली हातातली वाटले मी टुन्न झालो; ग्लास सारे तोडले दोष हा माझा कसा? जर पाजले त्यांनी मला मीच हवर्‍यासारखे प्याले 'विरोधी' ढोसले? मी किती ठोठावले पण दार ती उघडेच ना का असे अमुचे कलत्र आज ही रागावले? हाय!

प्यार कुणावर...

चतुरंग ·
लेखनविषय:
'वार कुणावर...' झालेले बघून मला अगदी कसेसेच झाले आणि मग आम्हाला उमाळा आला!

गजल

mahesh jahagirdar ·
लेखनविषय:
हासताना याद आली सोसताना याद आली अगणी प्राजक्त हा मी वेचताना याद आली सूर माझ्या अतरीचे छेदताना याद आली चादण्याशी बोलताना जागताना याद आली घेतला कोणी उखाणा ऐकताना याद आली रोखलेली आसवे तू या क्षणाना याद आली महेश जहागीरदार

प्राक्तन

संदीप चित्रे ·
लेखनविषय:
साथ देण्याचा इरादा पाहिला स्वप्नात होता प्राक्तनाचा वार तेव्हा हाय रे अज्ञात होता....१ मी जरी की ह्या ठिकाणी मैफलींनी धुंदलेला आठवांच्या वेदनांचा मारवा रंगात होता.... २ पाहताना तू मला हे प्रेम नाही का दिसेना तू मला वैर्‍यांत मोजावे ग हा आघात होता.... ३ बैठकीच्या लावणीने रंगलेल्या रात्र वेळी स्वप्नभंगा झाकणारा दागिना भांगात होता.... ४ रंगवूनी ओठ घेताना म्हणे ती गावदासी कुंकवाचा योग नाही का ग संभोगात होता?... ५ सांग राणी आज झाले वाद शब्दांचे कसे ह्या? बासरीचा सूर जेव्हा रोज संवादात होता.... ६ “मी तुझी रे वाट पाहे”, सार्थ गाणे मीलनाचे सात जन्मी साथ नाही, आठवा हातात होता....

हमी

उपटसुंभ ·
लेखनविषय:
कुणालाच माझी हमी आज नाही. जगाला कशी बातमी आज नाही ? मला एकट्याला नको दोष देऊ. तुझी प्रीतही संयमी आज नाही..! कधी मी म्हणालो हवे चंद्र तारे, कसा काजवाही तमी आज नाही..! जरा धाव घे आसवांच्या सवे तू. खरे दुःख हे, मोसमी आज नाही..! तुझ्या वेदनेची नशा और काही. तशी वेदनांची कमी आज नाही..! -- अभिजीत दाते

आसाराम बापु

rahulkransubhe ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
बापुच्या प्रवचनाला गर्दी झाली फार ट्रक, बस, सुमो तर कोणी आणली कार मोकळ्या जागेत जणू वसलं होत गाव प्रत्येक वस्तूला तेथील आला होता भाव छोट्-छोट्या वस्तूंची अनेक मांडली दुकानं ग्राहक होते भरपुर खरेदी करत होते आवडीनं दोन-तीन लाख लोकांचा समुद्र तीथे लोटला बापुच्या भक्तीचा महिमा आज मलाही पटला माणसाच्या श्रध्देचं हे नविन रूप मी पाहीलं होतं बापुच्या नावाने आज हजारोंच पोट भरत होतं
-राहुल अरुणकिशन रणसुभे शास्त्रीनगर, सिडको औरंगाबाद.

(भणंग २)

चतुरंग ·
लेखनविषय:
सकाळी सकाळी चमत्कारी ह्यांची 'भणंग २' ही गजल वाचून आमच्या मनात विचारांची गर्दी झाली आणि हे लगोलग हे विडंबन बाहेर पडले! ;) उषःपान झाले सकाळी सकाळी तुला 'छान' झाले सकाळी सकाळी चवीला बिडी मस्त ओठात घेता 'धुरापान' झाले सकाळी सकाळी 'तिथे' पोचता पाहिले एकमेका कसे ध्यान झाले सकाळी सकाळी जरा 'वेग' आल्यावरी लोक सारे गतीमान झाले सकाळी सकाळी इसबगोल सर्वास उ:शाप झाला बक:ध्यान झाले सकाळी सकाळी म्हणालाच 'रंगा', तरी शेवटाला समाधान झाले सकाळी सकाळी चतुरंग