(होता खमंग, होता चकणाहि खास बाकी)
मिलिंद फणसेंची अप्रतिम कारागिरी 'होता वसंत, होता सुमनात वास बाकी' वाचून आम्ही भारावून गेलो आणि त्या खुषीतूनच हे पहिल्या धारेचे विडंबन जन्मले! ;)
होता खमंग, होता चकणाहि खास बाकी
सारेच टुन्न होती पण आसपास बाकी
जाईन घरकुला मी, अद्याप आस बाकी
उरलेत मात्र आता थोडेच ग्लास बाकी
मी प्यायलो किती ते? उमजे मला न काही
हातात फक्त काजू करणे खलास बाकी!
फुटलेत पेग सारे अन् फोडलेत काही
उरला तिथेच माझा 'रीगल शिवास' बाकी
धुंडाळ नीट डावा पुढला खिसाच माझा
अजूनी असेल तेथे 'चपटीच' खास बाकी
ओठांवरी तिच्याही घनघोर युद्ध भाषा
सांगू तिला कसे मी? करणे कयास बाकी
अद्याप दूर आहे घरचीच वाट माझ्या
अद्याप मारतो हा तोंडास 'वास' बाकी
म्हणुनीच बांधली का 'देशी दुकान धारा'
पिउनी विलायती ही होणेच लास बाकी
आहेच नाव खोटे, मेल्या तरी तुझेही
'रंगा' तुझाच आहे अज्ञातवास बाकी
चतुरंग
वाचने
4386
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
प्रतिक्रिया
धुंडाळ नीट डावा पुढला खिसाच माझा अजूनी असेल तेथे 'चपटीच' खास बाक
वा वा वा - दारुबंदी उठली तर!
हाहाहा..
फुटलेत पेग
वा वा
वास्तवदर्शी कविता...
टुन्न्न झालो मी
मस्त
केमिस्ट्री
अडीच पेग
आवडीने चकणा चाखणार्या आमच्या
येक्द्दम् भारी विडम्म्म्बन
हे विडंबन आवडण्याचं खास कारण
In reply to हे विडंबन आवडण्याचं खास कारण by उत्खनक
>>>पुर्वीची आंतरजालीय निकोपता
लई जोरात येलकम बॅक.
In reply to लई जोरात येलकम बॅक. by llपुण्याचे पेशवेll
चायल जुनीच कविता आहे वाट्टं.