स्वप्न

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
भेटण्याची काय पण ही रीत आहे? टाळुनी म्हणतेस वरती प्रीत आहे गांजलेल्या माणसांच्या स्वागताला झोपडी माझी उभ्या वस्तीत आहे राहिल्या आता न चिंता कोणत्याही मी दिवाळे काढुनी नि:श्चिंत आहे आठवण गेली तुझी देऊन झोका मी पुन्हा आता गडे मस्तीत आहे ये भविष्याचे पुन्हा चल स्वप्न पाहू कालचा इतिहास त्या रद्दीत आहे ----धोंडोपंत आपटे

पडक्या घरास माझ्या

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
या आसवांस माझ्या... तू साहतेस का गं? अन आठवांत माझ्या... तू राहतेस का गं? हरवले सूर माझे... सांजवेळी तरीही या मैफ़लीत माझ्या... तू नाहतेस का गं? होतेस का पुजारी... अन फूल ही कधी तू तुज मंदिरात माझ्या... तू वाहतेस का गं? आता उरात झरती... या वेदना सदाच्या या वेदनेस माझ्या... तू चाहतेस का गं? तू दूर दूर जाता... बघ निखळले सहारे पडक्या घरास माझ्या... तू पाहतेस का गं? --शब्द्सखा!

नभी चांदणे...(गझल)

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
वृत- भुजंगप्रयात मात्रा- लगागा लगागा लगागा लगागा नभी चांदण्याची जुनी साथ होती उशाला कधीची उभी रात होती जळे जीव कोणी उदासीत येथे पुकारीत कोणा निशा गात होती कुणाला कसा सांग आता विसावा उसासून दु:खे हळू गात होती मला भासले अंत ना या क्षणाला पहाटेस ही रोजची रीत होती कुठे अंत आता अशी रात ओली पिवोनी उजेडास जागीत होती क्षणामागुती धावती जीव सारे इथे शेवटाची सुरुवात होती

झुंज

लेखनविषय:
महासागरी उभा असे मी, झुंज घेतो वादळाशी विजय ललाटी असो नसो वा, जिद्द ठेवतो जिंकण्याची. कधी वाटते थिटा पडे मी, कधी वादळा पुरुन उरतो कधी लाटंचा जबर तडाखा, कधी तयांवर स्वारी करतो. जरी जिंकतो डाव कधी मी, त्वेष आतुनी हो न कमी ओढ नव्या क्षितीजांची मजला, नकळत धरतो खडःग करी. लढण्यासाठी जन्म आपुला, हेच मजला ठाव असे हार्-जीत तर चालायाचीच, मजला त्याचे गम्य नसे. संकटांना झेलण्याचा, छंद माझा आगळा भय कुणाचे कधीच नाही, मी सर्वांहुन वेगळा. चाकोरीत राहुनी मी, डाव कधी ना मांडला फेकले तिथेच फासे जेथे, अद्द्याप कुणी ना जिंकला. वळुनी मागे अतीत बघता, माझेच मजला वाटते भय फिरुनी आगीत चाललो मी, आगीचीच मला सवय.

बाग - गझल!

लेखनविषय:
फ़ूलही कसे सलते उरात आहे? वादळे कशी या अंतरात आहे? वाट संपता माझा प्रवास होतो पावले कशी वेड्या भरात आहे? चुकवून रस्ते निघुन मरण गेले वेदना अशा माझ्या घरात आहे सोसतो असा आजकाल मज मी आसवे बरी साध्या दरात आहे वाळवंट रे हे बाग का खुलावी? मेघ त्या कितीसे अंबरात आहे? चांदणे ढळाले एकटा पुन्हा मी काजळी कशी ही चांदरात आहे? --शब्द्सखा! (संदीप सुरळे)

रुदाली - गझल ...

लेखनविषय:
श्रावणी कोठून आली ही वावटळ वाळवंटी स्वैर झाली ही वावटळ का फ़ुलांनी सजविले खोटेच मजला भावली मज आज आली ही वावटळ वादळाने बांधली कधिची सोयरी वीज बनुनी आज व्याली ही वावटळ आजही होते इरादे साधेच रे सांडली का आज प्याली ही वावटळ नेहमी तू भग्न, आता का रंगली रंग माझे आज ल्याली ही वावटळ 'दीप' विझला, थांबला झंझावात ही आज का झाली 'रुदाली' ही वावटळ --शब्दसखा! रुदाली म्हणजे, एखाद्याच्या मृत्युवर पैसे देउन रडण्यासाठी बोलवीलेली स्त्री .

मनाचिया अंगणात.....

लेखनविषय:
मनाचिया अंगणात मनाचिया अंगणात दरवळतो हा वसंत संगतीस नाहिस तू , ठुसठुसते हीच खंत ! गुरफटलो अवचित मी , मोकळ्यां केसांत तुझ्या तप भंगले महर्षिंचे , मी कुठला होय संत? भिजलेल्या रात्रींच्या आठवणी त्या अनंत जगण्याचे श्वास ज्यांस नसे आदी नसे अंत ! संवेदनांच्या पल्याड , जाऊन मी तिष्ठतोय होशील ना माझी मग, जन्माची सरताच भिंत ? -----------------------उदय गंगाधर सप्रे-ठाणे------१८ मे, २००८------------ आम्हांस इथे ही भेटा..... कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com/ कवितांजली :http://uday-sapre.blogspot

धोतर (हे लिखाण काढून टाकण्यात आले आहे.)

मि.पा.वर लेखन करण्यापूर्वी 'हे वाचा', अशी स्पष्ट सूचना देऊनही विषयाचा आगापीछा नसलेले आणि मि.पा.च्या रसिकांचा अपमान होईल असे वाह्यात लिखाण येथून काढून टाकण्यात आले आहे.

किंमत

लेखनविषय:
कारणे होती तशी जागायला चांदण्या मज यायच्या भेटायला प्रश्न हा साधाच होता पण तरी लागली ती कारणे शोधायला मी जरी आता सुखी दिसतो तुला खूप किंमत लागली मोजायला काळजी माझी नका इतकी करू काळजी लागेल ही बोचायला बंद मी केले इथे उमलायचे आणि ती आली फुले मागायला हो मला म्हटलेस तू कविते जसे मी खुळ्यागत लागलो वागायला भाव मी दुखःस या थोडा दिला आसवे ही लागली माजायला माणसे येतील ही रस्त्यावरी भूक आहे लागली बोलायला

मेळा

लेखनविषय:
लग्नात थोर त्यांच्या बोलाविले मलाही शिंपून अत्तरांना, ते भेटले मलाही हासून फक्त तेथे मीही बसून होतो खोटे रमून जाणे, ते जमले मलाही एकेक माणसाला मी न्याहळीत होतो कोणीच दोस्त नाही, ते गमले मलाही देती यथेच्च सारे उंचीच भेटि सार्‍या सजवून भासते का ठेवले मलाही भर्धाव जाति तेही खाण्यावरी तुटाया आधाशि भाव त्यांचे, न भावले मलाही लोटून अन्न सारे फेकून तेहि देता व्याकूळ आर्ततेने का भेदले मलाही! येथे बुभुक्षितांचा मेळा जमून आला लज्जाहि लाजली ती ,"का विकले मलाही?" चतुरंग
Subscribe to गझल