Skip to main content

उजाडले तरी.....

लेखक उदय सप्रे यांनी मंगळवार, 14/04/2009 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
मि.पा.कर , सप्रेम नमस्कार ! सोबत एक गझल जोडत आहे.....पहा जमली आहे का ! उजाडले तरी ..... उजाडले तरी न कां , तांबडे मला दिसे? केस मोकळें जयांत वदन गुंतले असे ! दरवळतो मोगरा अजूनही उशीवरी चुरगळल्या कांतीला गंध कसा येतसे? झुळझुळत्या साडीच स्पर्श मऊ मखमली दूर जरी झालीस तू , बोलतात की ठसे ! विचारले न मी तुला , बोललीस तू कुठे? "ये मिठीत - घे मिठीत " उभयतांस हे पिसे ! सळसळत्या बांगड्या रुमझुमती पैंजणे अजून यौवनांत तू , अजून मी असा फसे !
Taxonomy upgrade extras

ब्यूटी पार्लर अर्थात यौवनफुफाटा

लेखक शरदिनी यांनी शुक्रवार, 03/04/2009 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
सांग दर्पणा कशी मी दिसते... ..... जामानिमा साग्रसंगीत कौशल्याचे कुवलयापीड .... मन जळे जीव उरे काजळावर कृष्ण पुटे .... हल्लीच फुटलीय कोंडी अन् परतवलेत आरंभशूर हल्ले ... फसव्या क्रांतीला झालीय बाधा यच्चयावतांची विचक्षण त्रेधा ... पीटिकांना मसाज अन् मलम पण मनावर कोणते कलम? ... कोणते सन्मान अन् कोणते पुरस्कार दिव्या दिव्या दीपत्कार...
Taxonomy upgrade extras

अशक्य केवळ

लेखक जयवी यांनी बुधवार, 25/03/2009 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
तुझाच वावर मनात केवळ निभाव आता अशक्य केवळ नको अता ही उगाच जवळिक पुन्हा मनाचे दुभंग केवळ तुझ्यामुळे ही फितूर गात्रे अता गुलामी तुझीच केवळ तुझी जराशी झुळूक यावी कसे जगावे उन्हात केवळ नको नव्याने तुझी उधारी हिशेब नव्हते हिशेब केवळ जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras

गजल का सफर. -

लेखक मॅन्ड्रेक यांनी बुधवार, 25/03/2009 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. दत्तप्रसाद रानडे आणि स्वरदा गोखले ह्यांच्या 'गजल का सफर' कार्यक्रमाचे महाराष्ट्र मंड्ळ - लंडन व इतर ठिकाणि २७ मार्च ते ८ एप्रिल या कालावधित प्रयोग होणार आहेत.रसिक मिपकरानि अवश्य आनंद घ्यावा.

दुसरा कुणीच नाही....

लेखक जयवी यांनी रविवार, 22/03/2009 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
पैशापरी जवळचा दुसरा कुणीच नाही माणूस माणसाचा झाला कधीच नाही गणगोत आप्त सारे जमले उगाच नाही टाळूवरील लोणी उरले(पुरले) मुळीच नाही शमले तसेच सारे देहातले निखारे वणव्यास पावसाची नड भासलीच नाही काळोख तुंबलेला दाही दिशात सारा सूर्यात आग पुरती का पेटलीच नाही डोळ्यात दाटलेले आभाळ मित्र झाले पाऊस का सखा मग झाला कधीच नाही सरणावरी कळाले उपभोग फार झाला उपयोग जीवनाचा केला कधीच नाही जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras

मैफल

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 16/03/2009 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेजमधली अत्यंत हुशार, उत्साही, लाघवी आणि नंतर "श्रीमंत पतीची राणी "झालेली एक मैत्रिण अचानक एका लग्नात भेटली. त्यावेळी तिच्या भाग्याचा हेवा करणार्‍या सगळ्याच मैत्रिणींची तिच मनोगत ऐकल्यावर जी अवस्था झाली, तिच वर्णन करण कठीण होत. तरीही या गझलेत तिच्या भावना मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. भूमिका मांडण्याच कारण इतकच, की सगळीच दु:ख आपली नसतात, पण ती आपली कधी होतील, याचा नेम नाही. त्यात व.पुं. च्या भदेप्रमाणे आम्ही लोकांची मानसिक दुखणी उसनी घेण्यात तत्पर!
Taxonomy upgrade extras

तू

लेखक जयवी यांनी सोमवार, 16/03/2009 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे स्वप्न माझ्याच स्वप्नात होते तसे सोबतीच्या करारात होते नको ना अता त्या निशेची प्रतिक्षा तुझ्या मुक्त केसातही रात होते पुन्हा जाग आली सुन्या मैफ़लीला तुझे दाद देणे अकस्मात होते नसावे नशीबात घायाळ होणे तुझे तीर सारे पहार्‍यात होते निशेला न ऐसेच वैराग्य आले तुझे चांदणे ऐन बहरात होते जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras

वर्षाव अमृताचा..

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 12/03/2009 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
कंपीत गात्र होई तू छेडिल्या सुरांनी श्वासात खोल जाई मिसळून रातराणी बेहोष मंद तांडे निघताच चांदण्यांचे क्षितिजास अन पहाटे ही चंद्रिका दिवाणी उठती अनेक हलके हलके तरंग कोठे गंधीत रात्र होई घुमवीत धुंद गाणी आल्हाद स्पर्श होई पात्यावरी धुक्याचा लाजून हिरवळीचे काळीज होत पाणी (हळुवार मंद होई हा दीप तेवणारा वारा तशात गाई बेधुंदशी स्वराणी) वितळून या क्षणी मी माझीच ना उरावे उजळून जात काया, लावण्य हे नुराणी घेई टिपून हलके हे क्षण यौवनाचे दृष्टीस आज सांगे बघ मौन होत वाणी हलकेच गूज सांगे ती रात्र पांगताना बेधुंद मीलनाची अन् ठेवते निशाणी वर्षाव अमृताचा ..

भूल

लेखक बेसनलाडू यांनी शनिवार, 07/03/2009 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
पांघरायला विस्मरणांची झूल नको आता! आठवायला काटे पुष्कळ! फूल नको आता हवे करीअर, हवे प्रमोशन्, माडी अन् गाडी हवी 'मजा' प्रणयातसुधा, पण मूल नको आता मिटक्या मारत गिळून घेताना ओव्हनमधले, मऊभात, भाकरी ...?... धूर अन् चूल नको आता लपाछपीचे खेळ पुरेसे झाले, हे मृत्यो, पुढ्यात ये जर असेल हिंमत! हूल नको आता गंधित वारा तुझ्या गावचा - पण मी गुदमरतो (मिणमिणत्या श्वासास तुझी चाहूल नको आता) सुदैव माझे कुणी पळवले मलाच ना पत्ता, उरलेलेही लुटायचे तर भूल नको आता! मिठीत घे रे, कुशीत घे, विठ्ठला जरा आता नाळ जिण्याशी घट्ट करे तो पूल नको आता
Taxonomy upgrade extras

रंग मेन्दीचा

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 03/03/2009 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
रंग मेन्दीचा रंग मेन्दीचा हातावरती अजून खुलतो कधी कधी शारदरात्री तोल मनाचा अजून ढळतो कधी कधी हिरमुसलेली रातराणी ही कधी अचानक मोहरते निशिगंधाचा धुंद ताटवा अजून फुलतो कधी कधी खिन्न मनाच्या मैफलीत या आर्त विराणी गाताना आनंदाचा सूर अचानक अजून जुळतो कधी कधी वठलेल्या निष्पर्ण मनाच्या थरथरत्या फांदीवरती आशेचा हलका हिंदोळा अजून झुलतो कधी कधी कधी अचानक हसता हसता डोळे भरती अन झरती फुले वेचता चुकार काटा अजून सलतो कधी कधी तृप्त मनाच्या नभी अचानक दाटून येई मळभ कसे? अवचित हळ्वा भास तुझा का अजून छळतो कधी कधी? क्रान्ति