मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तू

जयवी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
तुझे स्वप्न माझ्याच स्वप्नात होते तसे सोबतीच्या करारात होते नको ना अता त्या निशेची प्रतिक्षा तुझ्या मुक्त केसातही रात होते पुन्हा जाग आली सुन्या मैफ़लीला तुझे दाद देणे अकस्मात होते नसावे नशीबात घायाळ होणे तुझे तीर सारे पहार्‍यात होते निशेला न ऐसेच वैराग्य आले तुझे चांदणे ऐन बहरात होते जयश्री अंबासकर

वाचने 2299 वाचनखूण प्रतिक्रिया 9

जागु Mon, 03/16/2009 - 15:02
नको ना अता त्या निशेची प्रतिक्षा तुझ्या मुक्त केसातही रात होते आवडली.

क्रान्ति Mon, 03/16/2009 - 21:50
पुन्हा जाग आली सुन्या मैफलीला तुझे दाद देणे अकस्मात होते वा! क्या बात है! एकदम सुरेख गझल जयूताई! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

प्राजु Mon, 03/16/2009 - 21:53
पुन्हा जाग आली सुन्या मैफ़लीला तुझे दाद देणे अकस्मात होते नसावे नशीबात घायाळ होणे तुझे तीर सारे पहार्‍यात होते निशेला न ऐसेच वैराग्य आले तुझे चांदणे ऐन बहरात होते जयू ताई, हे तिन्ही शेर म्हणजे.. कळस आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

शितल Mon, 03/16/2009 - 21:54
जयवी ताई, गझल आवडली. :) पुन्हा जाग आली सुन्या मैफ़लीला तुझे दाद देणे अकस्मात होते निशेला न ऐसेच वैराग्य आले तुझे चांदणे ऐन बहरात होते खुप सुंदर...:)

मदनबाण Tue, 03/17/2009 - 12:58
निशेला न ऐसेच वैराग्य आले तुझे चांदणे ऐन बहरात होते व्वा.. मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.