श्रावण शृंगार (गझल)
लेखनविषय:
मालवून टाक दीप
चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात
लाभला निवांत संग
कै. सुरेश भटांचे अजरामर गीत.
मध्यंतरी बोलता बोलता ह्या गीताचा विषय निघाला. तेव्हापासून हे गीत, वृत्ताचे नियम वगैरे मनात रेंगाळत राहिले. शेवटी एकदाची ही गझल कागदावर उतरली.
ही गझल लिहायला सुरूवात केल्यावर खऱ्या अर्थाने अनुभवलं की भटसाहेबांनी किती नजाकतीची कलाकुसर अगदी सोपी वाटावी अशी लिहून दाखवली आहे !
ही गझल म्हणजे माझी आदरांजली, भटसाहेबांना आणि त्यांच्या लेखणीला.
-------------------------------------------------------------------------------
धूप छाव खेळ सांजवेळ श्रावणात आज
सांजवेळ आणि गात्र गात्र यौवनात आज…. १
शिंपतात प्रेमरंग कृष्णमेघ, वात, थेंब
मोरपीस होय चिंब चिंब पावसात आज…. २
पाहिलीस वाट गं भिजून तू दवात रोज
भेटलो तुला नि शांत शांत मन्मनात आज… ३
भेटते वसुंधरा तिथेच सागरास जेथ
गुंजतेय गाज ऐक ऐक पैंजणात आज…. ४
बैसलो इथे कधीतरी तुझी घडेल भेट
भेटलीस आणि गंध गंध अत्तरात आज…. ५
लाजतेस तू सखे भिजून पावसात चिंब
घे टिपून लाज थेंब थेंब सांगतात आज…६
घे सुखाकडून ही मिठीच, सोड प्रश्न व्यर्थ
माग श्वासगंध धुंद धुंद जीवनात आज…. ७
राहिले उसासलेच दोन जीव फार काळ
मालवून दीप, रात्र रात्र मीलनात आज… ८
------------------------------------------------
माझा ब्लॉगः www.atakmatak.blogspot.com
------------------------------------------------
वाचने
2658
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
लगे रहो संदिपशेठ. एक नंबर गझल. :)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
फारच शृंगारिक...!
-झेल्या
थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.
पाहिलीस वाट गं भिजून तू दवात रोज
भेटलो तुला नि शांत शांत मन्मनात आज
सुंदर!
तात्या.
वा.. मस्तंच आहे गझल!
-अनामिक
खूप सुंदर..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
संदीप,
खुपच सुंदर गझल रचली आहेस.
खुप आवडली. :)
सुंदर गझल !
भेटते वसुंधरा तिथेच सागरास जेथ
गुंजतेय गाज ऐक ऐक पैंजणात आज
खूप छान ! :)
शृंगार असला तरीही कुठेही `शारिरीक` शृंगार जाणवला नाही.
मानसिक पातळीवरच्या शृंगाराची गझल आवडली.
मीनल.
In reply to छान आहे . by मीनल
>> शृंगार असला तरीही कुठेही `शारिरीक` शृंगार जाणवला नाही.
धन्स मीनल :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
सुंदर गझल!
आवडली.
--शाल्मली.
मस्त :)
--अवलिया
छान आहे गझल.
लगे रहो