Skip to main content

लाज

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 29/05/2009 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
टाकलेली लाज फासलेली लाज माडीवर आज विकलेली लाज टेबलाखालून सारलेली लाज नेत्याच्या डोळ्यात कोळलेली लाज दाह दहशत पोळलेली लाज देशद्रोही ताठ वाकलेली लाज आंधळा कायदा झुकलेली लाज वासना हल्ल्यात जन्मलेली लाज मानवा पाहून लाजलेली लाज -ऋषिकेश
Taxonomy upgrade extras

मनासारखे

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 26/05/2009 09:13 या दिवशी प्रकाशित केले.
हसू खुलू दे मनासारखे जरा घडू दे मनासारखे तुझी दिठी केसांत माळुनी मला सजू दे मनासारखे मुठीत बांधू नको कळीला तिला फुलू दे मनासारखे खुळे तुझ्या स्वप्नात जागते, मना करू दे मनासारखे दंवात न्हाते पहाट ओली, धुके झरू दे मनासारखे सुरांसवे माझ्या काव्याचे दुवे जुळू दे मनासारखे पसायदानी मागे ज्ञाना, जनां मिळू दे मनासारखे
Taxonomy upgrade extras

मौन तुझे

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 23/05/2009 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
बोल एकदा काहितरी रे मौन तुझे घायाळ करी रे कातर हळवी सांज गातसे तरल विराणी दर्दभरी रे श्रावणातही तळमळते मी झेलुनिया अलवार सरी रे जाणवते ती तुझी असोशी इथे दाटतो श्वास उरी रे देहच उरतो माझ्यापाशी मन घुटमळते तुझ्या घरी रे अंतरण्याने अंतर वाढे मिटव दुरावा हा जहरी रे पंचप्राण ज्यांच्यात गुंतले छेड पुन्हा त्या स्वरलहरी रे
Taxonomy upgrade extras

(काळजी)

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 22/05/2009 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालावर भटकताना आपल्या आनंदयात्री साहेबांची 'काळजी' ही सुरेख गजल वाचली आणि दूरदर्शनवरचे गाण्याचे कार्यक्रम ऐकताना मला समस्त प्रेक्षकांची वाटणारी काळजी अचानक आठवली! ;) गायचा आहे तुला का राग हा चंपाकळी त्या बिचार्‍या तबलजीचा जायचा आहे बळी! जीवघेण्या गायकांना ऐकणे नव्हते नवे हाय!

सांगता.....

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 18/05/2009 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
सांगता..... लागला माझा लळा या आसवांना फार आहे जाहला नाही बरा जो , हा असा आजार आहे ! हिंडतो मी घेत कोणाच्या ठशांचा माग हा गुंफुनी हातात "त्या"चा हात ही गुलझार आहे ! बोलणे अन् वागणे जणू अमृताची धार आहे ओततो पेल्यात माझ्या वीष हा शेजार आहे ! मैफिलीने गीत माझे अन् मला वाखाणले लांब सदर्‍याआड आता .....फाटकी विजार आहे ! शेवटी रडलीस तू अन् स्वच्छ मी झालो पुन्हा जा सुखाने नांद सखये , बोलली.....मझार आहे !
Taxonomy upgrade extras

तुझ्या जगात कधी असेन मी,नसेन मी...

लेखक नवाब अमोल यांनी शुक्रवार, 15/05/2009 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या जगात कधी असेन मी,नसेन मी... पण तुझ्यात नेहमी असेन मी,नसेन मी... संपतील डोळ्यातली आसवे सारी तरी पापणीच्या कडेवर असेन मी,नसेन मी... झटकून टाकशील माझा विचार..केसातल्या पाण्यापरी... त्या बटांच्या सावलीशी .. असेन मी,नसेन मी... विसरशीस मला दिलेले शब्द सारे तु.. तरी ओठांच्या किनारी असेन मी,नसेन मी... काढुन टाक ह्रदयातून तू मला... तरी आतवर खोल कुठे असेन मी,नसेन मी... विसरून जाशील सर्व त्या क्षणांना... अन् तरी श्वासात तुझ्या .. असेन मी,नसेन मी...
Taxonomy upgrade extras

(सोडू नको)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 12/05/2009 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
मिल्या ह्यांची अप्रतिम गजल 'सोडू नको' ही वाचल्यावर विडंबनधर्मा सोडू नको असे आमच्या मनाने बजावलेच! ;) संपला रस्सा तरी चापायचे सोडू नको! अन प्रसंगी वाडगा चाटायचे सोडू नको! तू तिच्यापासून नक्की वाचशी, सांगू कसे? हेलमेटा रोज तू घालायचे सोडू नको! केस हे पडतील आपोआप त्यांच्या अंगणी रोज तू गच्चीवरी 'कोंबा'यचे सोडू नको! काय झाले सदनिकांतुन लोक पळती शेकडो? तू तुला जमते तसे थिरकायचे सोडू नको! पाहिजे तर काढ सदरा सोड दोंदा मोकळे बावळ्या 'सलमान'ची जिरवायचे सोडू नको! काय हा भारी तुझा पण खर्ज 'रंग्या' लागला गर्दभासम रोज तू रेकायचे सोडू नको! चतुरंग

रसग्रहण : सुन्या सुन्या मैफलीत माझ्या.

लेखक अनंता यांनी मंगळवार, 05/05/2009 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! चांगले, समृद्ध करणारे, ऐकावे असे काही! मध्ये सुन्या - सुन्या मैफिलीत माझ्या ...ऐकण्याचा योग आला. वाचून अगदीच राहवेना. गाणं ऐकून कधी समाधी लागली तेच कळलं नाही! सुरेश भटांची सुरेख शब्दरचना, पं. हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत, स्मिता पाटीलचा जिवंत अभिनय आणि दीदींच्या सुरांचे नक्षीदार कोंदण! केवळ अप्रतिम.हजार ऑस्कर एका पारड्यात नि हे गीत एका पारड्यात! समाजातील उपेक्षीतांसाठी झटणार्‍यांच्या वैयक्तीक आयुष्यात जेव्हा वादळ उठते, तेव्हाच्या मनोवस्थेचं वर्णन भटसाहेबांनी अचूक पकडलेय.

अष्टौप्रहर.....

लेखक उदय सप्रे यांनी मंगळवार, 05/05/2009 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
अष्टौप्रहर..... येते अशीच केंव्हा केंव्हा पहाट ताजी ओठांत अमृताची देतेस ठेव माझी ! येते अशीच केंव्हा केंव्हा तरी सकाळ करतेस दाट आणिक जवळीक फार माझी ! येते अशीच केंव्हा केंव्हा तरी दुपार डोळ्यांत धुंद दिसते , मिठी अनिवार माझी ! येते अशीच केंव्हा केंव्हा चुकार संध्या गाण्यात छेडतो मी , मनची सतार माझी ! येते अशीच केंव्हा केंव्हा तरीच रात्र येतो सुगंध, फुलते , "जाई" क्षणांत माझी ! ------------------२७ जुलै १९८४.....................
Taxonomy upgrade extras

बेवफा... एक वेगळी मिश्र गझल ( हिंदी - मराठी )

लेखक उमेश__ यांनी रविवार, 03/05/2009 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
आ गयी वो आज आखिर, हाल मेरा देखने... मी तिला धाडीत होतो, सारखी आमंत्रणे... देख लू इकबार तुझको, ये तमन्ना थी मेरी; पाहुनी तुजला सखे, हे श्वास माझे स्पंदले... आज भी मेरे लबोंसे, कुछ बयाँ ना हो सका; आसवांना पूर आला, शब्द माझे संपले... बेवफा से पूछता हू, क्या खता मुझसे हुई? का सखे तू टाळले, माझ्या मनाचे चांदणे... तू जफा दे या जहर दे, ये तुझे हक़ है सनम; शक्य नाही हे तुला, या भावनांना जाळणे...