करार
माझे कधी तुझ्याशी काही करार होते
तू मोड जीवना, ते फसवे, चुकार होते
श्वासासवे कधीही नव्हतेच सख्य माझे,
ते श्वास कर्ज होते, जगणे उधार होते
वाळूत कोरलेली नावे जशी मिटावी,
गेले मिटून जितके हळवे विचार होते
वाटेतल्या फुलानी स्वप्ने लुटून नेली
काळोख पान्गताना उघडेच दार होते
हातून सावलीचा निसटून हात गेला,
आयुष्य फाटलेले मी सान्धणार होते
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1977
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख गझल..
धन्यवाद
In reply to सुरेख गझल.. by प्राजु
छान, आवडली
धन्यवाद! क
In reply to छान, आवडली by अनामिक
वाटेतल्या फुलांनी स्वप्ने लुटून नेली
करार
धन्यवाद
In reply to करार by मयूरी