Skip to main content

अजून

लेखक अजिंक्य यांनी शुक्रवार, 18/09/2009 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
काळचक्र काळ ओढतो अजून, का मनुष्य व्यास मोजतो अजून ||१|| मात्र रात्र झोपण्या मिळे तयास, का उगाच स्वप्न पाहतो अजून ||२|| पाहतो जगात तो हिरे अनेक, कोळसे उगाच वेचतो अजून ||३|| लागते जमीन फक्त चार हात, वाटणीवरून भांडतो अजून ||४|| का स्वत:तला न सापडे प्रकाश, देवळात देव शोधतो अजून ||५||

पुन्हा केव्हातरी

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 16/09/2009 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
संवाद काही राहिले, साधू पुन्हा केव्हातरी काही तराणेही नवे, छेडू पुन्हा केव्हातरी! "सांगू पुन्हा केव्हातरी" नादात मागे राहिल्या, सांगायच्या गोष्टी अशा, सांगू पुन्हा केव्हातरी झाले कधी हाराकिरीचे वाद; केली भांडणे, तेव्हा असे का वागलो, बोलू पुन्हा केव्हातरी दोघांसही काहीतरी होते जरी मागायचे, आली कधी ना वेळ ती, मागू पुन्हा केव्हातरी! सांगून नाही भेटलो तेव्हा; कधी भेटूनही हे एवढेसे बोललो, "भेटू पुन्हा केव्हातरी" आयुष्य शोभादर्शकाच्या काचनक्षीसारखे, काही नवे आकारले, पाहू पुन्हा केव्हातरी!

मी

लेखक अजिंक्य यांनी रविवार, 13/09/2009 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
जाणुनी, झुंजीत नाही शूर मी, दौडलो ऐसा कसा चौखूर मी ||१| काव्यप्रांती काय माझी थोरवी, आग बाकीचे, फुकाचा धूर मी ||२|| ओघ हे मोठे नद्यांचे वाहती, गावच्या छोट्या नळाचा पूर मी ||३|| या जगी जे मोठमोठे गायले, वाटतो त्यांच्यापुढे बेसूर मी ||४|| का अजिंक्या, मोह काव्याचा पडे, त्याच त्या स्वप्नात का हो चूर मी? ||५||

मंजूर नाही

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 11/09/2009 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
नको बंधने, जाच मंजूर नाही नदीला किनाराच मंजूर नाही ! कशी साथ द्यावी तुझ्या कीर्तनाला? मृदंगास ठेकाच मंजूर नाही ! तुला शिंपडावे सुखाच्या सरींनी, तुझ्या श्रावणालाच मंजूर नाही हसू तेच ओठी, खळी तीच गाली, कशी आज ही लाच मंजूर नाही ? तुझ्या सांगण्यानेच मी का फुलावे? वसंता, तुझा जाच मंजूर नाही ! मिळेना तुझ्या साक्षिने न्याय येथे, दिलेला पुरावाच मंजूर नाही लपेटून घ्यावे तुला मी, मला तू, दुरावा कुणालाच मंजूर नाही ! अरे, त्या 'उद्या'ला कुणी आज सांगा, 'तुझी भेट आताच मंजूर नाही '

(घजळ )

लेखक चेतन यांनी सोमवार, 07/09/2009 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
यशोधरांची सुंदर गझल http://misalpav.com/node/9264 वाचून मला ही लिहावसं वाटलं :& ~X( ~X( ~X( असे चोंदले, राहिला श्वास नाही घसे शेकले, थांबला त्रास नाही उरी कोंडला, पूर बेभान सारा असो भेसुरा! कोरडा खास नाही मला धाप लागे, उरी दाटल्याने कुणा हाक देईन, आवाज नाही किती क्षोभ नाकातुनी शेंबडाचा मिळाली सर्दी साथ, आराम नाही जसे होतसे प्राण नाकात गोळा जरी पाहिजे, मोकळा श्वास नाही किती झीट झाले, तरी पार नाही उतारे ठरे फोल ईलाज नाही चेतन अवांतर: कधीपासुन ही सर्दी काही पाठ सोडत नाही आहे.
काव्यरस

शोध

लेखक अजुन कच्चाच आहे यांनी रविवार, 06/09/2009 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
हि "गझल" आहे का ते जाणकार सांगतीलच. मी मात्र याला 'गझल सदृष्य' काव्य म्हणेन फारतर. मिपावरील लेखनाचा हा माझा पहीलाच प्रयत्न आहे. (परीक्षेला जाताना होत असे तशी धडधड होतेय छातीत.) ............... सकाळची सोनेरी किरणे माझ्याशी पोचलीच नाहीत धुक्यात हरवला माझा मी गाव शोधीत राहीलो शब्दा शब्दातले अनुबंध हृदयांतरी पोचलेच नाहीत माझ्याच कवीतेसाठी मी नाव शोधीत राहीलो झुकल्या नजरेतून सुटलेले तीर दिसलेच नाहीत हृदयावर झाले ते मी घाव शोधीत राहीलो कानी पडलेल्या शब्दांचे अर्थ उमगलेच नाहीत ऐकल्या सुरांतील मी भाव शोधीत राहीलो देहगंधाच्या नशेने श्वास भरून घेतलेच नाहीत सोडावया नि:श्वास मी वाव शोधीत राहीलो

न्यास

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 21/08/2009 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
या जिवाला एक ज्याचा ध्यास होता तोच की त्याचा खुळा आभास होता? भोगले आयुष्य, नव्हती कैद साधी, सक्तमजुरी आणि कारावास होता रंगलेल्या मैफली उधळून जाणे हा कुणाचा सांग अट्टाहास होता? चिंब भिजण्याचे ऋतू केव्हाच सरले, फक्त ओल्या पालवीचा वास होता राम सुटला, मात्र सीतेच्या कपाळी गोंदलेला आमरण वनवास होता हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे, जो दगा देऊन गेला, श्वास होता मी निषादाभोवती गुंतून गेले, हाय, त्याचा पंचमावर न्यास होता

तुम आ गए हो नूर आ गया है ...अर्थात्, गुलझारची पंचाहत्तरी!

लेखक बहुगुणी यांनी बुधवार, 19/08/2009 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
कवी, गीतकार आणि दिग्दर्शक गुलझार आज पंचाहत्तर वर्षांचे झाले. त्यांना अनेकोत्तम शुभेच्छा!

भूमिका

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 11/08/2009 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
पाठ वार्‍याने फिरविली ती दिशा माझीच होती मूक, हळवी, दीन, शापित नायिका माझीच होती दैव दुबळे; शाप माझा भोगते जन्मांतरी मी राम तो नव्हता, अहिल्येची शिळा माझीच होती एकही नव्हता दिवा, ना काजवा होता कुठेही चांदणे ना चंद्र, अवसेची निशा माझीच होती भंगले फुलताक्षणी का स्वप्न माझे मोहराचे? वादळाने मोडलेली वाटिका माझीच होती संशयाने गोठल्या संवेदना माझ्याच होत्या, जाळली क्रोधाग्निने ती संहिता माझीच होती काळजाला विंधणार्‍या आप्तस्वकियांच्या विषारी बोलण्यावर चालली उपजीविका माझीच होती ज्या कथेला वाचता आले तुझ्या डोळ्यांत पाणी, काय सांगू?
काव्यरस