रंग मेन्दीचा
रंग मेन्दीचा हातावरती अजून खुलतो कधी कधी
शारदरात्री तोल मनाचा अजून ढळतो कधी कधी
हिरमुसलेली रातराणी ही कधी अचानक मोहरते
निशिगंधाचा धुंद ताटवा अजून फुलतो कधी कधी
खिन्न मनाच्या मैफलीत या आर्त विराणी गाताना
आनंदाचा सूर अचानक अजून जुळतो कधी कधी
वठलेल्या निष्पर्ण मनाच्या थरथरत्या फांदीवरती
आशेचा हलका हिंदोळा अजून झुलतो कधी कधी
कधी अचानक हसता हसता डोळे भरती अन झरती
फुले वेचता चुकार काटा अजून सलतो कधी कधी
तृप्त मनाच्या नभी अचानक दाटून येई मळभ कसे?
अवचित हळ्वा भास तुझा का अजून छळतो कधी कधी?
क्रान्ति
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4355
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा!
धन्यवाद
नशिबवान आहेस..
In reply to धन्यवाद by क्रान्ति
क्या बात है !
In reply to धन्यवाद by क्रान्ति
सुरेख ! :)
खिन्न
बेश्ट!
वा.
सुंदर !!
+१
In reply to सुंदर !! by अनिल हटेला
.
उत्तम
धन्यवाद!
चाल लावण्याचा एक प्रयत्न!
सुरेख चाल प्रमोदकाका!
In reply to चाल लावण्याचा एक प्रयत्न! by प्रमोद देव
सुंदर...
+१
In reply to सुंदर... by बिपिन कार्यकर्ते
सार्थक!
कविता आणि
+१ असेच म्हणतो!!
In reply to कविता आणि by लिखाळ
हेच म्हणते
In reply to +१ असेच म्हणतो!! by चतुरंग
धन्यवाद!
मस्त गाणे..