Skip to main content

आहेस तू जगी हे दाखव कधी कधी..

लेखक प्राजु यांनी रविवार, 17/06/2012 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
आहेस तू जगी हे दाखव कधी कधी दगडास अंतरीच्या जागव कधी कधी होतो जरा सुखाचा वर्षाव अन पुन्हा वठल्या मनास होते पालव कधी कधी नुसत्या हताशतेला गोंजारसी किती? अंगार अंतरीचा पेटव कधी कधी का बोलणे तुझे हे 'आज्ञाच' भासते तूही करून बघ ना आर्जव कधी कधी स्वप्नांत रंगताना, पडला विसर असा बघते सहल म्हणुन मी, वास्तव कधी कधी मी एरवी तशीही, असतेच शांत पण नसते विचार करती, तांडव कधी कधी! आतूर मीच होते तुज पाहण्यास का? आतूरतोस तूही, भासव कधी कधी! ध्यानात ठेव 'प्राजू' हरलीस तू जरी जेत्यापरी स्वत:ला वागव कधी कधी -प्राजु
लेखनविषय:

वाचने 2526
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

प्राजुताईंनी बहुतेक 'मिलती है जिंदगी में मुहब्बत कभी कभी' गाण्याचा पुनःप्रत्यय घेतलेला दिसतोय. गंमत अलाहिदा. कविता सुरेख जमलीय. :)

वाह प्राजु, सुंदरच... नुसत्या हताशतेला गोंजारसी किती? अंगार अंतरीचा पेटव कधी कधी>> अत्यंत सुंदर शेर! का बोलणे तुझे हे 'आज्ञाच' भासते तूही करून बघ ना आर्जव कधी कधी>> फारच आवडला हा, सोपा आणि थेट! आतूर मीच होते तुज पाहण्यास का? आतूरतोस तूही, भासव कधी कधी!>> कातील शेर झालाय!

कविता नेहमीसारखी मस्तच आहे, आम्ही सातपुते या सिनेमातल्या "घे पाउल पुढ जरा" या गाण्याची चाल या कवितेला फिट बसते.

आतूर मीच होते तुज पाहण्यास का? आतूरतोस तूही, भासव कधी कधी! छान..!

" का बोलणे तुझे हे 'आज्ञाच' भासते तूही करून बघ ना आर्जव कधी कधी " वा ! क्या बात है ! ! खुप छान ! ! !