Skip to main content

का ग धरिला

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 16/07/2012 या दिवशी प्रकाशित केले.
जीवघेणा शूल- अबोला असा का ग धरिला ग्रीष्मजैसा पोळण्याचा, वसा का ग धरिला मी दिला होता सखे, चन्द्र तुझिया हाती फेकुनी पाण्यामधे, कवडसा का ग धरिला पाहिली होती सखे तू बेवफाई माझी श्वासातल्या जाणिवांचा, भरवसा का ग धरिला ओलावा शोधित, फिरलीस वणवण सखे संग ऐसा कोरडा, गरमसा का ग धरिला मखमली पाकळ्यानी लपविले मी कफन पदर त्याचा रेशमी, तलमसा का ग धरिला जीवघेणा शूल- अबोला असा का ग धरिला ग्रीष्मजैसा पोळण्याचा, वसा का ग धरिला
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 797
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया