मन भरून गेले प्रेमाने मी रिताच होतो ना?

रसप जे न देखे रवी...
मन भरून गेले प्रेमाने मी रिताच होतो ना? नव्हतीस कधी तू माझी पण मी तुझाच होतो ना ? "चल विसरुन जाऊ झाले-गेले, जगू नवे आता" म्हटलेस तरीही गुरफटून मी उगाच होतो ना ? तुज बरेच काही दिले सुखी करण्याला नशिबाने पण मनात गुपचुप जपलेली मी व्यथाच होतो ना ? मज वेडा मानुन सोडुन जा, हरकत नाही माझी 'तो' प्रेम तुझ्यावर करणारा मी खुळाच होतो ना? माझ्या पायाशी हरून ही दुनिया लोळण घेवो तू समोर माझ्या आल्यावर मी खुजाच होतो ना ? तुला नेहमी तुझ्या घराची चौकट प्यारी होती केलेस मनातुन प्रेम तरी मी 'दुजा'च होतो ना ? ....रसप.... ११ जून २०१२ http://www.ranjeetparadkar.com/2012/06/blog-post_12.html
वर्गीकरण
लेखनविषय:

3 टिप्पण्या 1,332 दृश्ये

Comments

मिसळलेला काव्यप्रेमी नवीन

नाही आवडली. नुसताच शब्दखेळ वाटतोय.

चौकटराजा नवीन

अशी विरोधा भासी ... रचना ही गझ्ल या काव्य प्रकारात असावी लागते असे फार मागे कुठेतरी वाचले होते. उदा .. केलेस मनातुन प्रेम तरी मी 'दुजा'च होतो ना ? त्या लेखातही या गर्दीत मी एकटा एकटा असे काहीतरी वाचल्यासारखे आठवते. मला आवडली बुवा ! ( सकारण) .कट पेस्ट प्रतिसाद नाहीये !