मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शुभेच्छा

काsssssssssssssयपो छे......... ( ईन्टरनॅशनल)

विजुभाऊ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मागील दुवा..... काSSSSSSयपो छे.... http://misalpav.com/node/16556 संक्राम्तीच्या निमित्ताने पुन्हा अहमदाबादच्या आठवणी जाग्या झाल्या. तिथला पतंगमहोत्सव हा अवर्णनीय असतो. गरब्याप्रमाणेच पतंग हाही गुजरातच्या सांस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. संक्रान्तीला सगळेजण पतंग उडवत असतात. मुले मुली आजी आजोबा आई वडील नातेवाईक मित्र सगळे जणू मिळून अक्षरशहा दिवसभर आकाशात असतात. सगळा गुजरात पतंगमय झालेला असतो.

अनाहिता ठाणे कट्टा

भावना कल्लोळ ·
नमस्कार, आजच्या ठळक बातम्या ……… तर दिनांक २२ डिसेंबर २०१३ रोजी अतिचर्चित आणि दर वेळे प्रमाणे फाटे न फुटता खूप वेळेपासून गाजत असलेला अनाहिताचा पहिला वाहिला कट्टा हा ठाणे येथील स्वाद उपहारगृहामध्ये नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिरा का होईना पार पडला. परदेशी वास्तव्यास असलेल्या आमच्या काही मिपा अनाहिता अनाहुतपणे भारतवारी करण्यास आल्या होत्या आणि त्या आपसुकच या आमच्या कट्ट्या मध्ये गवसल्या. या कट्ट्याचे सर्वेसर्वा लिमाउजेट उर्फ माऊ यांनी अनाहितावर धागा काढला आणि बाकी सर्वं अनाहिताना पिंगवले.

आणि रजनीकांत रडला - धूम ३

मृत्युन्जय ·
१८ मे १९७४ भारतीय इतिहासात एक अतिशय क्रांतिकारक घटना घडली. पोखरण मध्ये पहिली अण्वस्त्र चाचणी घेण्यात आली आणि भाभा अणुसंशोधन केंद्राच्या प्रमुखांनी डॉ. होमी सेठनांनी पंतप्रधानांच्या सचिवांना दूरध्वनीवरुन ही रोमांचकारक बातमी देताना सांकेतिक भाषेत सांगितले "आ़णि बुद्ध हसला. काही लोकांच्या मते "आणि बुद्ध हसला" वगैरे असे काही सांगितले गेले नाही. ही नंतर बुद्धजयंतीचे निमित्त साधुन काही लोकांच्या डोक्यातुन निघालेली सुपीक कल्पना असेल. डिसेंबर २०१३ मध्ये एक अशीच अजुन एक क्रांतिकारक घटना घडली. धूम ३ प्रदर्शित झाला.

सचिनची निवृत्ती आणि क्रिडा रसिकांच्या प्रतिक्रिया

पाषाणभेद ·
लेखनविषय:
दै. बातमीपत्र (बातमीपत्रच म्हणजे बातमीपत्र) सचिनची निवृत्ती आणि क्रिडा रसिकांच्या प्रतिक्रिया आमच्या वर्तमानपत्राकडे आलेल्या असंख्य प्रतिक्रियांपैकी काही निवडक प्रतिक्रिया खाली देत आहोत. गोपाळ सुंदर, अमरावती: सचिन म्हणजे क्रिकेटचा देव आहे. देव कधी रिटायर होतो का? लागू म्हणतात देवाला रिटायर करा. पंकज मोरे, कारसुळ बु.: सचिनची निवृत्तीची बातमी ऐकून डोळ्यात पाणी आले. वडील म्हटले शेतावर जा अन कांद्याला पाणी दे. मी गेलो नाही, घरीच माळ्यावर रडत बसलो. अवनी बापट, पुणे: सचिनसरांचा खेळ मी लहाणपणापासून पाहते आहे. त्याचे रेकॉर्डचे मी बुक केले आहे.

आपण ग्रेट आहोतच !

सुधीर मुतालीक ·
लेखनविषय:
१५ ऑगस्ट २०१२ चे पंतप्रधान मनमोहनसिंघ यांचे भाषण मला आठवते. बहुदा विज्ञान, तंत्रज्ञान या क्षेत्रातल्या घोषणा लक्षात राहतात. कारण या दोनही क्षेत्रातल्या माझ्या देशाच्या घोडदौडीचे मला नेहमी कौतुक वाटते. १७५० साली ब्रिटन मध्ये सुरु झालेली औद्योगिक क्रांती तंत्रज्ञानाची सुरुवात मानली तर सुमारे दोनशे वर्षांनी म्हणजे सुमारे १९५० साली आपल्याकडे स्वत:च्या तंत्रज्ञानाची सुरुवात झाली. डॉ भाभा, जमशेदजी आणि नेहरू या त्रिकुटाचे प्रत्येक स्वकीयाने आभारच मानले पाहिजेत.

दिवाळीचे विष्णूपूजन !

जे.पी.मॉर्गन ·
आली दिवाळी ! आपण नेहेमीप्रमाणेच लक्ष्मीपूजन करणार. तसेही आपण एरवी लक्ष्मीचीच पूजा-अर्चना करत असतोच. लहानपणापासून ह्या ना त्या स्वरूपात आपलं लक्ष्मीपूजन सुरूच असतं. बालपणी आपण परीक्षेतल्या मार्क्सरूपी लक्ष्मीच्या मागे धावतो. मग चांगल्या कॉलेजच्या, मग नोकरी, प्रमोशन, चांगला जोडीदार, चारचाकी गाडी, ३ बीएचके फ्लॅट, मुलांसाठी प्रतिष्ठित शाळा, सेकंड होम... ही यादी न संपणारीच असते. पण म्हणतात ना... लक्ष्मी चंचल असते. तिच्या मागे लागणार्‍याच्या हातात ती कधीच सापडत नाही. मग लक्ष्मी असते कुठे? लक्ष्मी असते भगवान विष्णूच्या चरणांशी.

देवासाठी काय करावे बरे

देशपांडे विनायक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सचिन तेंडूलकर शेवटच्या रणजी सामन्यात ५ वर त्रिफळा चीत झाले डॉन ब्राड्मन शेवटच्या सामन्यात ० वर बाद झाले सचिनचा प्रवास त्या दिशेने चालू झाला असे वाटू लागले म्हणून विचारतो कि या देवासाठी भक्तगण तर भरपूर आहे पण त्यांची प्रार्थना त्याला शेवटच्या सामन्यात १०० धावा करून देईल का ? हा प्रश्न पडण्याचे कारण सचिनने काढलेल्या प्रत्येक धावेकारता त्याच्याबरोबर खेळपट्टीवर कुणालातरी थांबावे लागे हे विसरले जातेय !! हे विसरणे म्हणजे हा सांघिक खेळ आहे हे विसरणे !!! संघ जिंकतो किव्हा हारतो खेळाडू नव्हे !

कोजागिरी स्पेशल

प्यारे१ ·
लेखनविषय:
आज आमचे येथे कोजागिरी निमित्त्य मसाला दूध प्राशनाचा कार्यक्रम आयोजित केला असून प्रतेकानं आपापल्या घरुन २-२ लिटर दूध (आमच्या प्रोव्हिजन स्टोअरमधूनच. आज म्हणून म्हैस : चौरेचाळीस रुपये लिटर ) तशेच पाव किलो साखर प्रतेकी आणि दूध मसाला (२५ रुपये तोळा) (स्पेशल आलाय आमच्या कडे तोच घ्या) संध्या़ काळी चार वाजेपर्यंत आणून द्यावे. कार्यक्रम बिल्डींगच्या टेरेस वर ठीक ९.३० वाजता (रात्री) सुरु होऊन ११.४५ (रात्रीच) ला संपेल. दूध तापवताना वेगळे काही घडत नसल्याने दूध कसे तापत आहे हे पाहण्यासाठी गर्दी करु नये. बसायची व्यवस्था आपली आपण करायची आहे.

दुर्गे दुर्घट भारी... एक विचार.

प्यारे१ ·
गणेश विसर्जन झालं की पितृपक्ष येतो. तो संपला की लगेच प्रतिपदेला घटस्थापना होते नि आपण देवीची उपासना सुरु करतो. देवीच्या उपासनेची सुरुवात कधी झाली, का झाली, कशी झाली ह्याबाबत मला माहिती नाही. इतिहासकारांचा विषय आहे तो. असो. पुराणांमध्ये कुठंतरी सांगितल्याप्रमाणं महिषासुर नावाचा राक्षस प्रचंड मातला होता नि त्यानं सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली.