आज आमचे येथे कोजागिरी निमित्त्य मसाला दूध प्राशनाचा कार्यक्रम आयोजित केला असून प्रतेकानं आपापल्या घरुन २-२ लिटर दूध (आमच्या प्रोव्हिजन स्टोअरमधूनच. आज म्हणून म्हैस : चौरेचाळीस रुपये लिटर )
तशेच पाव किलो साखर प्रतेकी आणि
दूध मसाला (२५ रुपये तोळा)
(स्पेशल आलाय आमच्या कडे तोच घ्या)
संध्या़ काळी चार वाजेपर्यंत आणून द्यावे.
कार्यक्रम बिल्डींगच्या टेरेस वर ठीक ९.३० वाजता (रात्री) सुरु होऊन ११.४५ (रात्रीच) ला संपेल.
दूध तापवताना वेगळे काही घडत नसल्याने दूध कसे तापत आहे हे पाहण्यासाठी गर्दी करु नये.
बसायची व्यवस्था आपली आपण करायची आहे. (बसायची म्हणजे बसायची, लोळणे नाही.)
दूध अधिक गरम हवे असल्यास एका ग्लास मागे ४ रुपये अधिक द्यावे लागतील.
ग्लास आपापले आणावे.
ग्लास स्टीलचा असला तर व्यवस्थित पकडावा.
गरम दुधाने हात भाजल्यास नि दूध सांडल्यास आम्ही जबाबदार नाही.
बिअरचा ग्लास आणू नये. पडला तर फुटतो, काचा पायात घुसण्याची शक्यता असते.
दूधाच्या प्रत्येक ग्लासमध्ये प्रत्येकी २ काजू तुकडे, २ बदाम तुकडे, २ पिस्ता तुकडे नि ४ चारोळ्या मिळतील.
कोजागिरीनिमित्त्य दूध पिण्याचाच कार्यक्रम होईल.
भेळभत्ता हवा असल्यास आमच्याकडे फरसाणा, कांदा, कोथिंबीर, लिंबू, कुरमुरे मिळतील.
दर चौकशी करुन घ्यावा. वर्तमानपत्राचे कागद घरुन आणावेत.
बाकी कार्यक्रम आपापल्या जागी करावेत.
गाणी वाजवाय ची असल्यास आपल्या घरुन टेपरेकॉर्डर अथवा कॉम्प्युटर आणून रात्री ८.३० नंतर ९.५५ पर्यंत वाजवावीत.
लाईट कनेक्शन मिळणार नाही.
९.५५ ला एक, ९.५७ ला एक नि ९.५९ ला एक असे तीन वेळा आवाज बंद करण्याबाबत मिसकॉल दिले जातील.
१० नंतर टेपरेकॉर्डर काँप्युटरचा आवाज झाल्यास १५१ रु. दंड सोसायटी मध्ये भरावा लागेल.
माणसांचे कमी आवाजात बोलण्याचे आवाज चालतील.
भसाड्या आवाजात गाणी म्हणू नयेत. तोंडाव्यतिरिक्त आवाज व इतर प्रदूषण करु नये.
कोजागिरीनिमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा!
वाचने
8248
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाईकरांचा हा पुणेरी धाटणीचा
वाईकर गॉन पुणेरी!!!! लेख
सगळ्यांना अपिल व्हावं म्हणून
In reply to वाईकर गॉन पुणेरी!!!! लेख by बॅटमॅन
छान
In reply to सगळ्यांना अपिल व्हावं म्हणून by प्यारे१
भेळभत्ता?
In reply to छान by अभ्या..
ब्याट्रिकेचा प्रकाशु टाकणे
In reply to भेळभत्ता? by बॅटमॅन
आपी भेळ्भत्ता असा शब्द नय्ये.
In reply to भेळभत्ता? by बॅटमॅन
अच्छा तसंय होय? हे तर
In reply to आपी भेळ्भत्ता असा शब्द नय्ये. by अभ्या..
अब्या तु मला सांगितलं नैस ,
In reply to आपी भेळ्भत्ता असा शब्द नय्ये. by अभ्या..
+१ टु ब्याटु!
In reply to वाईकर गॉन पुणेरी!!!! लेख by बॅटमॅन
@ अ. आ.
In reply to +१ टु ब्याटु! by अत्रुप्त आत्मा
आम्ही निव्वळ कोजागिरीच्या
In reply to +१ टु ब्याटु! by अत्रुप्त आत्मा
मंजि या टायंबाला तुम्चा ईचार
In reply to आम्ही निव्वळ कोजागिरीच्या by प्यारे१
क्रुपया
आम्ही फक्त बघायला येउ. चालेल
कोजागिरीच्या दुधाचे (साधे )
योग्य ती नोंद घेतल्या गेली आहे....
मस्त !
निघायचे ठरवले पण...
हरकत नाही
In reply to निघायचे ठरवले पण... by अनन्न्या
पुणेकर व्हायचा क्षीण प्रयत्न
आता ढवळ्या- पवळ्या , वाण -
In reply to पुणेकर व्हायचा क्षीण प्रयत्न by पैसा
+१
प्यारे काकु आवडेश गं लेख ..
ज्यांना दूध, सुका मेवा वैगरे
आणि ज्यांना नाय बादते त्यांची
In reply to ज्यांना दूध, सुका मेवा वैगरे by सूड
अतिशय उत्तम, सकस आणि
असं पण असतं काय?
In reply to अतिशय उत्तम, सकस आणि by प्रचेतस
कोजागिरिनिमित्त धागा वर काढत
वो प्यारे भौ
वो प्यारे भौ
दुध एवढे स्वस्त कसे(म्हशिचे
खुसखुशीत
अंताक्षरीत एखाद्या अक्षरावर
अंताक्षरीत एखाद्या अक्षरावर
काका, काय हे?
In reply to अंताक्षरीत एखाद्या अक्षरावर by दिवाकर कुलकर्णी
काका, काय हे?
In reply to अंताक्षरीत एखाद्या अक्षरावर by दिवाकर कुलकर्णी