लेखकसंपादक मंडळयांनी रविवार, 01/03/2015 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/30186 या सातव्या स्पर्धेलाही अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. अनेक सदस्यांनी आपली उत्तमोत्तम छायाचित्रे सादर केली. सदस्यांनी दिलेल्या गुणांनुसार पुढीलप्रमाणे पहिले ३ विजेते ठरले आहेत.
लेखकप्रसाद गोडबोलेयांनी शनिवार, 28/02/2015 01:08 या दिवशी प्रकाशित केले.
२७ फेब्रुवारी - मराठी भाषा दिनाच्या सर्व मराठी बांधवांना अनेकानेक शुभेच्छा !
माझा मराठाचिये काय बोलु कौतुके ! अमृता तेही पैजा जिंके ! ऐसी अक्षरे रसिके ! मेळवीन !!
मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे/ समृध्दीस्थळे म्हणल्यावर मनात पहिला विचार आला तो माऊलींचाच . संत ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद्भगवदगीतेवर मराठी भाषेतील टीका जी की भावार्थदीपीका अर्थात ज्ञानेश्वरी लिहुन सर्वसामान्य जनांवर जे उपकार केले आहेत त्याचे वर्णन करावे तरी कसे ? जशी जशी ज्ञानेश्वरी वाचत जातो आणि जशी जशी ती उमगत जाते तसे तसे संत ज्ञानेश्वरांना पुरुष असुनही "माऊली" असे का म्हणतात ते कळायला लागते .
लेखकआदूबाळयांनी सोमवार, 09/02/2015 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
ती हाताच्या तळव्यात हनुवटी ठेवून एकटक पहात होती. काहीही कळलं नव्हतं बहुतेक तिला.
"हे बघ, सोपा आहे हा फॉस वर्सेस हारबॉटल रूल." मी परत प्रयत्न केला, "कंपनीच्या बाबतीत काही गैरकृत्य घडलं, तर कंपनीच कोर्टात जाऊ शकते. शेअरहोल्डर नाही."
तिची नजर तशीच स्थिर. माझ्याकडे बघणारे दोन टपोरे डोळे.
"याला काही एक्सेप्शन्स असतात. म्हणजे मायनॉरिटी शेअरहोल्डर..." मी परत प्रयत्न केला.
"तुमचा अटेम्ट कधी आहे सर?" तिने अचानक विचारलं.
आयसीएसाय काही मला पास करायला मागत नव्हतं. हा चौथा अटेम्ट जूनमध्ये. इकडे डिग्रीविना क्लास पण चालेनात. ही एकच विद्यार्थिनी.
लेखकमाहितगारयांनी सोमवार, 22/12/2014 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
"मयूरपंथाच्या पुर्नजन्मापर्यंत" हा धागा लेख मी डिसेंबर २०१४च्या आसपास लिहिला गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत इसीस नावाच एक दमनचक्र इराक नावाच्या देशात दाखल झाल आता सावकाश पडद्या आड जाताना दिसते आहे. अग्दीच सिंजारचा पहाड आमेरीकन प्रयत्नांनी सोडवून घेतला नाही तो पर्यंत याझिदींच्या बातम्या मुखमृष्ठावर होत्या त्या आताही आहेत पण तुमच्या समोर मुखपृष्ठावर येत नाहीत एवढेच.
एकवीसाव्या शतकात एखाद्या समुहाला वंशसंहाराला सामोरे जावे लागेल असा विचारही येऊ नये त्या काळात इराक मध्ये याझिदी समुदायावर गेली तीन साडेतीन वर्षे उघड दमनचक्र चालले.
लेखकदशाननयांनी सोमवार, 15/12/2014 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
दुसरा कोणी पडला तर त्याच्याकडे पाहून फिदीफिदी हसण्याची आपल्याकडे वाईट सवय आहे. पण त्यांना पाडणाऱ्या व्यक्तीने घेतलेले कष्ट दिसत नसतात असे माझे स्पष्ट मत आहे म्हणून मी “पडणे” एक कला हा लेख लिहितो आहे. सतत पडण्याची माझी दीर्घकालीन वाटचाल आहे, मी रस्तावर पडलो आहे, पाण्यात पडलो आहे, डोंगरावर पडलो, स्कूटर, बाईक, कार मधून देखील पडलो आहे, तसेच अनेक वेळा खड्यात देखील पडलो आहे, तसेच एकदा हवेतून देखील पडलो आहे.
लेखकखेडूतयांनी बुधवार, 10/12/2014 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
कुठल्याही शाळेत जावं. पाचवीच्या पुढील हाताला लागेल त्या पोराला विचारावं, ‘'भीती वाटते असा तुझ्या अभ्यासातला विषय कुठला?'' समोरून ‘गणित’ असं उत्तर आलं नाही तर आपल्याला त्या पोराचीच भीती वाटू लागेल ! गणित-भूमिती सारख्या ‘डेंजर’ विषयांनी आपलं कोवळं बालजीवन किती खडतर केलं होतं, हे प्रत्येकाने आठवून पाहावं ! ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ म्हणतात त्याप्रमाणे आम्ही गणित-भूमिती विषयांना घाबरून त्यापासून दूर पळत राहिलो. गावाकडच्या विद्यार्थ्याना जणू विज्ञान -इंग्रजी व गणित म्हणजे पारंपारिक शत्रूच वाटत.
लेखकसंपादक मंडळयांनी बुधवार, 03/12/2014 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/29297 छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा
***
नमस्कार मंडळी! चौथ्या स्पर्धेचा निकाल तुमच्याहाती देताना अतिशय आनंद होत आहे. या वेळी स्पर्धेची तसेच मतदानाची मुदत जास्त ठेवली होती. अपेक्षेप्रमाणे स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला, तसेच सर्व सदस्यांनी उत्साहाने मतदानही केले. काही अपरिहार्य कारणामुळे निकाल प्रत्यक्ष घोषित करायला जरा उशीर होत आहे. तरी क्षमस्व! सर्व स्पर्धक तसेच विजेत्यांचे अभिनंदन! पुढची स्पर्धा पाठोपाठ घोषित करत आहोत.
लेखकजेपीयांनी गुरुवार, 06/11/2014 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
मुळ प्रेरणा :- पिवळा डाबिंस यांचे हे दोन लेख.भाग १ आणी भाग २डिसक्लेमियरः- १) सदरिल लेखातिल पात्रे जरी खरी असली तरी प्रसंग काल्पनीक आहे. भविष्यात आसे काहि घडल्यास
जबाबदारी माझी नाहि.
२) सर्वानीं हलके घ्यावे.
लेखकसंपादक मंडळयांनी शुक्रवार, 31/10/2014 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/28571http://www.misalpav.com/node/28729http://www.misalpav.com/node/28931
********************************************
नमस्कार मंडळी! दिवाळीच्या फराळाचा फन्ना उडवला का नाही! आणि दिवाळी अंकही बरेच वाचून झाले असतील! आता जराशा विश्रांतीनंतर छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त चौथी स्पर्धा सुरू करूया चला!. नुकतीच दिवाळी संपली आहे. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. म्हणून या स्पर्धेचा विषय राहील उत्सव प्रकाशाचा!