मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समीक्षा

एक समृद्ध राग ... राग कंबलबहार.. त्यातलं एक परिपूर्ण गीत

भडकमकर मास्तर ·
लेखनविषय:
जेव्हा आशा भोसले,एस पी बालसुब्रमण्यम आणि बप्पी लाहिरी एकत्र येतात तेव्हा एक अफ़लातून गीत जन्माला येतं. फ़र्स्ट लव लेटर या सिनेमातलं हे गाणं.

पावसाळी छायाचित्रण....

नानबा ·
लेखनविषय:
पावसाळा सुरु झाला की आमच्यासारखे भटके थोडेच गप्प बसतात???? या पावसाळ्यात निसर्गाची काही रुपं मी माझ्या कॅमेर्‍यात बंदिस्त केली आहेत. आपण आस्वाद घ्याल आणि प्रतिक्रिया द्याल तर आनंद...

परिक्षण : मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ...

छोटा डॉन ·
"महेश मांजरेकर हे एक जेष्ठ व प्रतिष्ठित सिनेव्यक्तिमत्व आहे का ?” आहे. “महेश मांजरेकर हे उत्कृष्ठ अभिनेते आहेत का ?“ असु शकतात, नक्की सांगता येणार नाही. ते भाई अगर डॊनच्या रोलमध्ये जितके जिवंत वाटतात तितकेच ते शिवाजीमहाराजांच्या अस्थायी वाटतात. अर्थातच हा मतमतांतराचा मुद्दा असु शकतो. “महेश मांजरेकर हे एक उत्कॄष्ट आणि हुशार निर्माते / दिग्दर्शक आहेत का ? “ हो आहेत, हे उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत.

पुस्तक परिचय (तेलाविषयक)

सुचेल तसं ·
लेखनप्रकार
नुकतीच जेष्ठ पत्रकार गिरीश कुबेर ह्यांची दोन पुस्तकं वाचली. दोन्ही पुस्तकं खूप आवडल्यामुळे त्यांचा अल्पसा परिचय देण्याचा प्रयत्न करत आहे. १. हा तेल नावाचा इतिहास आहे: काळं सोनं असं ज्याला संबोधलं जातं त्या तेलाचा मनोरंजक इतिहास ह्या पुस्तकात मांडला आहे. अमेरीकेत पहिली तेलविहीर खणल्यानंतर अल्पावधीतच तेलाची मागणी प्रचंड वाढली. अमेरीकेतील उद्योगपती जॉन डी. रॉकफेलर (थोरले) ह्यांनी सुरु केलेली स्टँडर्ड ऑईल कंपनी, तेलातून मिळालेल्या प्रचंड नफ्यामुळे बलाढय बनली आणि तिची मक्तेदारी निर्माण झाली.

एंजल्स & डेमन्स ...

छोटा डॉन ·
लेखनविषय:
डॅन ब्राऊनच्या गाजलेल्या व अत्यंत आवडलेल्या "दा विंची कोड" ह्या चित्रपटानंतर ज्याची आतुरतेने वाट पहात होतो तो "एंजल्स & डेमन्स" काल चित्रपटगॄहात जाऊन पाहिला, त्याच्या आधीच पुस्तक मिळवुन पुर्वाभ्यास केला होता त्यामुळे चित्रपट पहाताना जास्त मज्जा आली ... जरुर आणि जरुर पहावा असा हा चित्रपट आहे. टीप : स्पॉयलर्स नाहीत, बिनधास्त वाचा ...

ढाई अक्षर प्रेम के

फारएन्ड ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
तुम्हाला नातेसंबंधांचा अभ्यास करायचा आहे का? असेल तर हा चित्रपट जरूर पाहा. कारण डीव्हीडी वरील माहितीनुसार "It's a study in relationships..."! त्याआधी स्त्री स्वातंत्र्याचे काही पैलू पाहूनच आपण थक्क होतो. मुलीला 'हायस्कूल' नंतर लग्नाच्या मागे लावणारे आधुनिक विचारांचे पुरूष तर नेहमीच असतात, पण येथे एक सोडून दोन स्वतंत्र विचारांच्या आणि स्वत:बद्दल आत्मविश्वास असलेल्या नायिका यात आहेत. एक स्वत:च्या आई वडिलांना आपले लग्न झाले आहे का नाही ते ठामपणे सांगू शकत नाही, दुसरी तर स्पष्टपणे 'हम लडकिया पेड के बेल की तरह होती है, हम को सहारे की जरूरत होती है, जो भी सहारा दे उसे थाम लेती है" वगैरे सांगते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अस्ताची सुरवात?

भोचक ·
''राष्ट्रवादी कॉंग्रेस हा काही नव्याने स्थापन झालेला पक्ष नाही. ती वैयक्तिक बळावर निवडून येणार्‍या नेत्यांची मोळी आहे,'' ही व्याख्या राज ठाकरे यांनी केलीय म्हणून दुर्लक्षिता येणार नाही. कारण त्यात बर्‍याच अंशी सत्यही आहे. कारण पक्ष स्थापन करताना त्याची एक निश्चित भूमिका, विचारधारा आणि धोरण असायला लागते. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसला नाही आणि नव्हते. वास्तविक निवडणूक संपली असताना आणि सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असताना, त्यातही राष्ट्रवादी कॉंग्रेस या सरकारमध्ये सामील होत असताना हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण काय? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो.

लॉर्ड ऑफ द फ्लाईज

केदार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
लॉर्ड ऑफ द फ्लाईज - लेखक विल्यम गोल्डींग मॉर्डन लायब्ररीने प्रसिद्ध केलेल्या १०० चांगल्या पुस्तकांच्या यादीचे वाचन होईल तसे चालू आहे. काही दिवसांपुर्वी लॉर्ड ऑफ द फ्लाईज आणले आणि वाचायला घेतले. सुरुवातीलाच दोन्-चार पानांनंतर उर्वरीत पुस्तकात काय आहे ह्याची उत्कंठा वाटायला लागते आणि पुस्तक हातातून सोडवत नाही. मध्ये दोन तीन वेळेस दोन तीन पानं सोडुन पुढे जावे वाटले तितकेच, पण बाकी वेग खूपच मस्त.