Skip to main content

समीक्षा

समीक्षा — पुस्तक, चित्रपट आणि साहित्यकृतींच्या मराठी समीक्षा. रसग्रहण व चिकित्सक परीक्षण येथे वाचा.

जेंव्हा ते पहील्यांदा चालून आले...

लेखक विकास यांनी शनिवार, 14/11/2009 00:41 या दिवशी प्रकाशित केले.

मनसेवरून गेल्या दोनचार दिवसात झालेल्या अनेक चर्चांमधे एक प्रकर्षाने वेगळी जाणवलेली चर्चा ही श्री. कलंत्री यांची होती. त्यावर उत्तर लिहीण्यासाठी खालील विषय सुचला आणि विचार घोळू लागले, पण तेव्हढ्यात योगायोगाने, धनंजयने एक लेख लिहीला ज्याचा विषय, माझ्या विषयाच्या संदर्भात, विनोबांच्या भाषेत वर्तुळाच्या दोन आजूबाजूंच्या टोकांप्रमाणे ठरला: एकीकडून बघितल्यास सगळ्यात दूर आणि दुसरीकडून बघितल्यास सगळ्यात जवळ. :)

उचललेस तू मीठ मुठभर

लेखक भोचक यांनी गुरुवार, 12/11/2009 17:01 या दिवशी प्रकाशित केले.

यंदाच्या 'मौज'च्या दिवाळी अंकात महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाविषयी पत्रकार अंबरिश मिश्र यांचा एक छान लेख आहे. एरवी गांधीजींनी केलेले हे एक आंदोलन या पलीकडे त्याची आपल्याला फारशी माहिती नसते. 'उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया' या वाक्याच्या उत्तरार्धाविषयी मनात का कुणास ठाऊक खिल्लीच दाटून येते. पण या लेखातून या सत्याग्रहामागची गांधीजींची व्यापक भूमिका समजायला मदत होते. आणि खरोखरच या साध्याशा वाटणार्‍या सत्याग्रहातून ब्रिटिश साम्राज्याचा पाया गांधींनी कसा हादरवला हेही कळते.

बेगम बर्वे : आळेकरांचे जुने नाटक नव्या जगात

लेखक विसुनाना यांनी बुधवार, 11/11/2009 17:43 या दिवशी प्रकाशित केले.

हैदराबाद येथे सुरू असलेल्या कादर अली बेग स्मृती नाट्य महोत्सवात थिएटर अकादमी, पुणे निर्मित प्रा. सतीश आळेकरांचे 'बेगम बर्वे' हे नाटक सादर झाले. (दि. १०/११/२००९) हे नाटक पाहण्याचा योग आला.
त्या निमित्ताने हे विस्कळित विचार (म्हटले तर समीक्षण) -

प्रा. सतीश आळेकर या नाट्यलेखकाची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. मराठी रंगमंचावर नवकल्पनांना साकार करणार्‍या लेखकांमध्ये आळेकर अग्रणी आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये.

द लायन किंग

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 09/11/2009 14:04 या दिवशी प्रकाशित केले.

काल डिस्नेचा 'लायन किंग स्पेशल एडीशन' चित्रपट मिळाला आणी मी अक्षरश: हातातले काम सोडुन त्यावर तुटुन पडलो.

लहानपणी बघितलेला तो सिंबा, नाला, टिमॉन, पुंबा, रफिकी सारे पुन्हा एकदा आजुबाजुला फेर धरुन नाचु लागले. आता काही वेळ का होईना लहानपण परत येणार ह्याचा मला जास्ती आनंद होता.

गार्गी अजून जिवंत आहे...

लेखक ऋषिकेश यांनी रविवार, 25/10/2009 01:23 या दिवशी प्रकाशित केले.

आज अचानक मंगला आठलेकर यांचं "गार्गी अजून जिवंत आहे" हे पुस्तक हातात पडलं. जन्मतारीख वगैरे नसणार्‍या काळात साधारण १९१४-१५ च्या सुमारास उत्तरप्रदेशात इलाहाबादला जन्मलेल्या गुलाबबाईची ही कहाणी. सातव्या वर्षी लग्न होऊन दहाव्या वर्षी मुलाला जन्म दिलेल्या ह्या गुलाबबाईने इतक्या जुन्या काळात इलाहाबाद-प्रयागसारख्या कट्टर धार्मिक परंपरा असलेल्या शहरात अंत्यसंस्काराच्या कामाला वयाच्या अकराव्या वर्षी सुरवात करून तिने "स्त्रियांनी स्मशानपौरोहित्य का करू नये?" असा प्रश्न तत्कालीन धर्ममार्तंडांना केला होता.

गोष्ट छोटी डोंगरा एवढी

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 24/10/2009 13:14 या दिवशी प्रकाशित केले.

"अहो मरणार्‍या शेतकर्‍याला एक लाख देता, त्यापेक्षा शेतकर्‍याला जगण्यासाठी पंधरा - विस हजार द्या".

कसे वाटले वाक्य ? खरेतर हा आहे संवाद (डायलॉग) तो पण निळु फुलेंच्या तोंडी. चित्रपटाचे नाव 'गोष्ट छोटी डोंगरा एवढी'.

दोन कोल्ह्यांची (इसापनीतीबाहेरील) सुरस कथा!

लेखक सुधीर काळे यांनी सोमवार, 19/10/2009 11:18 या दिवशी प्रकाशित केले.

मी सध्या Nuclear Deception हे Adrian Levy-Cathy Scott-Clark लिखित पुस्तक वाचत आहे. सध्या फक्त २० टक्केच वाचून झालेय. पण या भागात जे वाचले त्यावरून दोन गोष्टी ल़क्षात येतात त्या इथं मांडाव्याशा वाटल्या म्हणून हे लिहितोय.