आमचा खरडवह्यांचा अभ्यास,व्यासंग आपण जाणताच. दिवसातले अनेक तास आम्ही ह्या अभ्यासासाठी खर्च करतो. ह्या अभ्यासात आम्हाला भावलेल्या काही खरडवह्यांची ओळख आपणास करुन द्यावी म्हणुन ही लेखमाला.
बिपिन कार्यकर्ते ह्यांची खरडवही.
आ हा हा काय वर्णावे ह्या खरडवही विषयी ? सध्या ह्या खव मध्ये कंपुबाज खेकडा, हृदयाला हात घालणारे भट साहेबांचे शब्द आणी 'हम दो हमारे(खरेतर हमारी) दो' यांचे एक रेखाचीत्र असे संमीश्र मिश्रण बघायला मिळेल.
काही लोकांना बिकांच्या सल्ल्यापेक्षा त्यांनी डकवलेली खव मधील भट साहेबांची कविताच जास्ती आवडली. मग त्यांनी ती सरळ उचलुन आपल्या वेबसाईटवर डकवुन टाकली, अगदी बिकांनी कवितेखाली लिहिलेल्या 'थँक यू भटसाहेब.' ह्या ओळीसकट.
सहसा ह्या खव मधली चित्रे वगैरे बदलली जात नाहीत. अगदी २/३ महिन्यातुन कधीतरी एकदा. बर दिवसभरात कमीत कमी ५०/६० खरडींचे रोजचे आवागमन येथे चालते. खरडी बहोतकरुन बिकांच्या कंपुबाज मित्रांच्या असतात. विविध बेत, एखाद्याची 'खेचण्याचे प्लॅन्स' वगैरे आखणे चालु असते.
'राजकारण, अफवा पसरवणे, विरोधकांनी चालवलेली बदनामी, नवाबी शौक' ह्या विषयाच्या खरडींना वाहिलेली खव असे साधारण ह्या खरडवहीचे वर्णन करता येईल. कधी कधी ह्या खव मध्ये नंदन, सहजराव, लिखाळपंत ह्यासारखी नावाजलेली मंडळी सुद्धा हजेरी लावुन जाताना आढळतात.
----------------------------------------------------------------------------------------------
भडकमकर मास्तरांची खव.
काही दिवसांपुर्वी दिवसाला सगळ्यात जास्ती वेळा मिपामधील काही विशीष्ठ सदस्यांकडुन उघडली जाणारी खरडवही असा हिचा सन्मानाने उल्लेख करावा लागेल. एखाद्या संस्थळाला दिवसभरात मिळणार नाहीत येव्हडे 'हिटस' ह्या खवला त्या 'कुपितल्या' काळात मिळत होते.
त्या काळी ह्या खवने मिपाला अनेक लेख, विडंबने आणी काथ्याकुट मिळवुन दिले हे मी अभिमानानी सांगु इच्छीतो.
सध्या ह्या खरडवहीत कुठलेच छायाचीत्र नाही. कधी काळी इथे मास्तरांच्या छोट्याश्या राजकन्येचे छायाचीत्र होते पण सध्या ती जागा मास्तरांनी मिपावर केलेल्या लिखाणाच्या दुव्यांनी घेतली आहे.
कधीकाळी मनसोक्त धिंगाणा अनुभवलेली ही खरडवही सध्या शांत शांत असते, ह्याला काही प्रमाणात मास्तरांचे रेग्युलर न येणे सुद्धा कारणीभुत आहेच.मास्तरांच्या खव मध्ये सहसा वैयक्तीक चर्चा आढळुन येत नाहीत. गाणी,चित्रपट, समिक्षा, दंतवैद्यकीय आणी नाटक ह्या विषयांना साधारणत: ही खरडवही वाहिलेली आहे.
आजही एकेकाळी ह्या खरडवहीत घातलेला धुडगुस आठवला की हसुन हसुन डोळ्यातुन पाणी येते.मास्तरांच्या खव मध्ये प्रदिप, चतुरंग, नंदन, डॉ.दाढे ह्या सारखे रथी महारथी हजेरी लावताना दिसतात. त्याच बरोबरीने मी, टार्या सारखे टारगटही हक्कानी मास्तरांना आमच्या खरडींनी लाज आणायचा प्रयत्न करत असतात. एकुणच समतोल अशी ही खव म्हणता येईल.
----------------------------------------------------------------------------------------------
विसोबा खेचर यांची खरडवही.
शब्दच तोकडे पडणार हो वर्णन करताना, फुल्ल टु गॅरंटी.
एकतर ही खरडवही उघडताना अंमळ वेळच लागतो, ब्रॉडबॅंड सुद्धा ६४ स्पीडचे भासायला लागते. परंतु एकद का ही खव उघडली की मग सौंदर्याचे एक एक ऍटमबॉम्ब फुटायला सुरुवात होते. मदनीका कोणीही असो, तिची कमीत कमी ३ चित्रे खरडवहीत लावायचीच हा तात्यांचा संकल्प आहे. ही चित्रे बदलली गेली की 'मिपाची मालकीण बदलली' अशी अफवा पसरते म्हणे. पण एकुणच तात्यांना दाक्षीणात्य सौंदर्य प्रिय असल्याची खात्री हि खरडवही पटवुन देते.
मिपाची सद्य परिस्थीती, कोणाचे कोणाशी वाजले आहे, नविन मैत्रीकिडा आला आहे का, संपादकांवर कोणी आरोप केले आहेत का, नवीन आलेल्या सदस्याची व्यक्तीगत माहिती (हुश्श) हे सगळे सगळे एकाच जागी समजण्याचे ठिकाण म्हणजे ही खरडवही. मिपावरील एक मोलाचा दस्ताऐवज असाच तीचा उल्लेख केला पाहिजे.
ह्या खरडवहीत जवळ जवळ ७०% मिपाकरांचा वावर आढळतो. "तात्या हे काय आपल्याला पटले नाही" पासुन "तात्या, यु आर सो स्वीट" पर्यंतच्या विविध गुणदर्शनाच्या खरडी आढळतात.
तक्रारी, मदत मागणे, आपण लिहिलेल्या लेखाच्या लिंका डकवणे ह्यासाठी वाहिलेली खरडवही असा हिचा साधारण उल्लेख करता येईल.
----------------------------------------------------------------------------------------------
विनायक प्रभु यांची खरडवही.
ह्या खरडवहीतील ७५% हुन जास्ती खरडी ह्या सामान्य माणसाच्या डोक्यावरुन जातील ह्याबद्दल शंकाच नाही. गुर्जींचे लेखच नाही, तर खरडवही सुद्धा क्रिप्टीकने भरलेली.
सध्या ह्या खरडवहीत गुर्जी लहान लहान लेकरांना 'मार्गदर्शन' (कशाचे हा चोंबडा प्रश्न आम्हालाही पडलेला आहे) करत आहेत असा फोटु डकवलेला आहे.
ही खरडवहीसुद्धा तात्यांप्रमाणेच सर्व प्रकारच्या मिपाकरांच्या आवागमनाच्या खुणा दर्शवते. अगदी १५/२० मिनीटासाठी आलेला एखादा जुना मिपाकर सुद्धा ह्या खरडवहीत हजेरी लावुन गेलेला आढळतो.
गुर्जींनी विचारलेल्या क्रिप्टीक प्रश्नांची उत्तरे अथवा गुर्जींना विचारले गेलेले प्रश्न ह्यांनी हि खरडवही भरुन वाहताना दिसते. मानवी शरीराचे विविध अवयव व त्यांची क्रिप्टीक नावे, वेगवेगळी आसने (योगा पासुन भोगा पर्यंत) ह्यांची परिपुर्ण माहिती मिळण्याचे ठिकाण म्हणजे ही खरडवही. ह्या खरडवहीतील अवलिया व गुर्जी ह्यांचे परस्पर संवाद प्रेक्षणीय.
क्रिप्टीक ह्या एकमेव विषयाला वाहिलेल्या ह्या खरडवहीत धनंजय, बिका, देवबाप्पा, मुक्तसुनीत ह्यांचा वावर एक वेगळीच खुमारी आणतो हे निश्चीत. टारझन व गुर्जी ह्यांची प्रश्नोत्तरे ज्ञानदंपदा वाढवणारी.
-----------------------------------------------------------------------------------------------
प्रमोद देव ह्यांची खरडवही.
अगदी 'देवाची खरडवही' असा उल्लेख करावा इतकी सात्वीक अशी ही खरडवही आहे.
सध्या ह्या खरडवहीत देवबाप्पा व त्यांच्या देवी ह्यांचे तरुणपणीचे छायाचीत्र डकवलेले आहे. फोटोच्या वरतीच देवबाप्पांना नुकत्याच रशियात प्राप्त झालेल्या पदवीबद्दल माहिती आहे.
कविता,गाणी, राजकारण, गृहकार्य, ऑफिसमधला त्रास.. अगदी कशा कशाचे म्हणुन ह्या खरडवहीला वावडे नाहिये. असे जरी असले तरी संगीत ह्या विषयावर मात्र मोठ्या प्रमाणात चर्चा आढळते.
इतर काही खरडवह्यांप्रमाणेच ह्या खरडवहीत सुद्धा मिपाकरांचा मुक्त वावर जाणवतो. एकुणातच सार्या खरडी ह्या थोडी आदब वगैरे राखुन, वयाला मान वगैरे देउन लिहिलेल्या आढळतात. (अपवाद अर्थातच आम्ही आणी धम्मु) कवी आणी कवियत्रींच्या मोठ्या प्रमाणातील वावरा बरोबरच विनायक प्रभुंचा ह्या खरडवहीमधील मोठ्या प्रमाणावर वावर अचंबीत करणारा. प्रा. डॉ. आणी देवबाप्पांचे सख्य अगदी जाणवण्या इतपत.
एकुणच खव बघताना मिपावरील एका जेष्ठ व संतुलीत व्यक्तिमत्वाची हि खरडवही आहे हे जाणवते.
-----------------------------------------------------------------------------------------------
चला ह्या भागात इतकेच. काहि सुधारणा हव्या असल्यास निश्चीत कळवा.
('ह्या असल्या टुकार लेखमाला लिहायचे पालथे धंदे बंद करा' असे मात्र कळवु नका.)
-+-+-+-+-+-+-+-+-+-+-१