अजून एक सिनेमा ओळख .. " टु बी ऑर नॉट टु बी" ( १९८३)

लेखनविषय:
टु बी ऑर नॉट टु बी १९३९ सालातला पोलंड, नाझी आक्रमण, वॉर्सॉमधले चळवळ करणारे देशप्रेमी नागरिक, गेस्टापो अधिकारी, नाझी गुप्तहेर, वॉर्सॉमधून इंग्लंडला पळून जायच्या प्रयत्नात असलेले ज्यू नागरिक या सार्‍या गोष्टी घेऊन एक धमाल विनोदी सिनेमा बनवता येईल का? तर या प्रश्नाचं उत्तर "हो" असं आहे. तर ही गोष्ट आहे वॉर्सामधल्या सुप्रसिद्ध "ब्रॉन्स्की थिएटर्स" या नाटक कंपनीची.

एका (अज्ञात) सैनिकाने लिहिलेल्या हृदयद्रावक कवितेचे भाषांतर!

लेखनविषय:
श्री. तरुण विजय यांचे टाइम्स ऑफ इंडियावरील ब्लॉग्ज हल्ली वाचनात आले व मला आवडले. श्री. तरुण विजय यांचा परिचय करून दिला जातो तो असा: सिंधु नदीवरची झुळूक, कैलास पर्वतावरचा शिवमंत्र, चुशुलमधील सफर, गोठलेल्या झंस्कारवर चादर पांघरून मारलेली चक्कर. या सर्वांची गोळाबेरीज म्हणजे श्री तरुण विजय! ते श्यामाप्रसाद मुखर्जी रीसर्च फाऊंडेशनचे संचालक असून भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत.

द अंग्रेज

परवा गणपाचे हैद्राबादी वाचले आणि सगळ्यात पहिल्यांदा आठवण झाली ती 'द अंग्रेज' ह्या तुफान विनोदी हिंग्लिश चित्रपटाची. 'बॉम्बे बॉईज' वगैरे चित्रपटानी पहिल्यांदा मल्टिप्लेक्स चित्रपटांची लाट आणली, त्याच लाटेतला हा एक नितांत सुंदर विनोदी चित्रपट. चित्रपटाचे अजुन एक वैशीष्ठ्य म्हणजे हिंग्लिश चित्रपट असुनही हा चित्रपट कौटुंबीक करमणुक करणारा आहे. कुठेही अश्लील दृष्यांचा, द्विअर्थी संवाद, शिव्या ह्यांच्या भडिमार नाही. नवा दिग्दर्शक, सर्व चेहरे फ्रेश आणि नविन पण चित्रपटाचा दर्जा नक्कीच उच्च करमणुक करणारा आहे.

दबंगला शुभेच्छा

लेखनविषय:
मतदान न करता राजकारन्याना नावे टेवने आणि पिच्चर न पाहता त्याची स्तुती करणे गैर. मी दबंग पाहिला नाही.प्रोमोज पाहिले .प्रोमोज सुसह्य आहेत.थ्री इडियट्च्या उत्पन्नाचे उच्चांक मोडले. आनंद झाला. खूप जणांनी दबंग ला शिव्या पण दिल्या. आमीरची स्तुती केली.दोन पिच्चरची तुलना केली. एक जण दबंग ला म्हणतो 'लोक आजकाल कचरा पण विकत घेतात...

Paths of Glory

काही चित्रपट पाहुन झपाटल्यासारखे होते. मंत्रमुग्ध झाल्यासारखे वाटते. आपण नि:शब्द होतो. स्टेनली कुब्रिक दिग्दर्शित पाथ्स ऑफ ग्लोरी हा असाच एक चित्रपट. लोलिता, आइज वाइड शट, क्लोकवर्क ऑरेंज असे एकापेक्षा एक वादग्रस्त आणि भडक चित्रपट बनवणार्‍या कुब्रिकने पाथ्स ऑफ ग्लोरी सारखी दर्जेदार कलाकृती देखील सादर केली आहे. पाथ्स ऑफ ग्लोरी याच नावाच्या Humphrey Cobb लिखीत कादंबरी वर आधारीत आहे. चित्रपटाला पहिल्या महायुद्धातील जर्मनी आणि फ्रान्स यांच्यामधल्या एका लढाईची पार्श्वभूमी आहे. पण हा युद्धपट मात्र नाही. लढाईमागचे राजकारण हाच या चित्रपटाचा विषय आहे.

पारध

लेखनविषय:
"भिंतींवर थुंकणारा माणसाची औलाद नसेल" या खास पुणेरी पद्धतीच्या पाटीने आमचे जंगी स्वागत केल्यावर आम्ही आमचा मोर्चा तिकीटखिडकीकडे वळवला. प्रभातच्या दारावर तिकीट घेणारे आजोबा मी गेल्या १८ वर्षांपासून बघत आलोय. ते अजूनही तसेच दिसतात. पुणेरीपणाची 'सिनेमा बघायचाय तर बघा नाहीतर शनिवारवाडा बघा पण दारातून लवकर टळा' अशी एक खास मिजास चेहर्‍यावर ठेवून ते आत्मीयतेने तिकीटे फाडतात. तिकीटखिडकीवर मी ५०० ची नोट देत "दोन द्या" असे म्हटल्यावर तिथल्या माणसाने चेहर्‍यावरची सुरकुतीही न हलू देता थंडपणे "सुट्टे द्या!" अशी पुणेरी संयत डरकाळी फोडल्यावर मी गुपचूप सुटे काढून दिले.

सौदागर

लेखनविषय:
लेखनप्रकार
ये बहुत लंबी कहानी है! सनातनपुर आणि पालीनगर अशा भरदार नावाच्या गावातील तेवढ्याच भरदार नावांचे राजेश्वर (राजकुमार) आणि दादावीर (दिलीप कुमार) यांची. त्या डोंगरदर्‍यांत इकडे तिकडे फिरणारा एक माणूस यांच्या कहाण्या सांगेल... कारण तेथे बहुधा तोच एक शिल्लक राहिला असावा, बाकी गावकर्यांपैकी अर्धे यांची दुश्मनी झाली तेव्हा तर उरलेले अर्धे पुन्हा दोस्ती झाली आहे हे माहीत नसल्यामुळे एकमेकांना मारून मेले असावेत. एक मात्र जाणवते: तेव्हा बरे यांना असे ठाकुर, मुखिया, जमीनदार वगैरेंच्या नादी लागणारे लोक मिळत होते.
Subscribe to समीक्षा