सध्या मी काय पाहतोय ? भाग १०

लेखनविषय:
लेखनप्रकार
खरं तर गेला आठवडाभर मी डोळ्याच्या इन्फेक्शन ने त्रस्त आहे आणि त्यामुळेच रजेवर देखील आहे. डोळा उघडा ठेवणे कठीण जात होते म्हणुन काही पाहणे देखील नकोसे वाटतं होते.पण वेळ घालवायचा कसा ? कारण कामात व्यस्त राहण्याची नशा मला इतके वर्षात लागलेली आहे !

ऋतुमती

लेखनविषय:
लेखनप्रकार
ऋतुमतीचा अर्थ रजस्वला स्त्री.अस्सल गावठी भाषेत विटाळशी! स्त्रीच्या वयाच्या बाराव्या, तेराव्या वर्षी सुरू होऊन पार चाळीशी, पन्नाशीत संपणारी मासिक पाळी. दर महिन्याला न चुकता येऊन ठेपणारी! फक्त गर्भ राहिला तरच नऊ महिने बंद होणारे मंथली पिरीएड! ह्या अवस्थेत तिची कंबर दुखते. अंग दुखतं. सतत रक्तस्राव होत असतो. बाहेर हिंडताना तिला अतिशय अवघडल्यासारखं होतं. तिला सतत स्पाॅटिंगची धास्ती वाटते. ती कशातच मन एकाग्र करु शकत नाही. काम करु शकत नाही. आता सॅनिटरी पॅडस् निघाली आहेत. पूर्वी तर जुन्या साडीच्या कापडाची घडी वापरावी लागायची. ती वरचेवर धुवावी लागे. वाळत घालायची चोरी!

अलक

लेखनविषय:
लेखनप्रकार
अलक अर्थात अति लघुकथा अलक 1 प्लॅन्चेटविषयी ऐकलं तेव्हा पासून करून बघण्याची इच्छा होती. पण भिती पण वाटायची. आज मात्र ठरवलं. अन्या आज घरी एकटाच होता त्यामुळे त्याच्याकडेच जमायचं ठरवलं. मी, विन्या, चारू,दिपू नि अन्या. अन्या त्यातल्या त्यात माहितगार. आम्ही काळोख करून मेणबत्ती पेटवली. त्या खाली अक्षरांचा बोर्ड आणि नाणं ठेवलं. सर्वानुमते एका माहितीच्या माणसाच्या आत्म्याला बोलावलं. पाच मिनिटं शांततेत गेली आणि नाणं थरथरलं. सगळ्यांच्या अंगावर काटा आला. धीर करून अन्याने पहिला प्रश्न विचारला. मग भीड चेपली गेली नि सगळे बोलायला लागले. प्रश्न संपले नि मेणबत्ती पण संपली. सर्वांना एकदम भारी वाटत होतं.

जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-१० } चायना ऑन अलर्ट

लेखनविषय:
लेखनप्रकार
मला हा धागा प्रकाशित करताना फार अडचण येत आहे, कितीही प्रयत्न केला तरी धागा प्रसिद्ध करता येत नाही. तेव्हा निदान या धाग्याच्या प्रतिसादात तरी काही लिहात येते का ते पाहतो.

रविवार आणि खून का बदला खून

लेखनविषय:
लेखनप्रकार
आज रविवार.. आज कामाचा कंटाळा........... आलाय, आज तु स्वयंपाक बनव ना ! अगं कंटाळा आलाय तर नको करु स्वयंपाक. आज आपण बाहेर जेवायला जाऊया. नक्को. रविवारी मंदिराबाहेर भिकार्‍यांची गर्दी असते त्यापेक्षा जास्त हॉटेलबाहेर टेबल रिकामं होण्याची वाट बघणार्‍यांची गर्दी असते. मग आपण पार्सल मागवूया का ? नक्को. पार्सल पण फार उशीरा येतं आणि ते पदार्थ पण थंड झालेले असतात. मग काय करायचं ? तुला जेवायचं असतं तेव्हा मी तुला हॉटेलचा पर्याय देते काय ? घरी जेवण बनवते ना ? मुझे खून का बदला खून से चाहिए | हट पगली, ऑख के बदले ऑख मांगोगी तो पुरी दुनिया अंधी हो जायेगी !

प्रथम नागरिकाचा दिमाखदार शपथविधी

लेखनप्रकार
Presidential Buggy नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रपतिपदासाठीच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे.

राष्ट्रपतींचे डबे

Presidential Saloon भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू झाल्यावर डॉ. राजेंद्र प्रसाद सार्वभौम भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्यावेळी राष्ट्रपतींसाठी रेल्वेचा खास डबा असावा असा विचार पुढे आला नव्हता.

वह्या पुस्तके

जून महिना चालू झाला की साधारणपणे मध्यमवर्गीयांच्या घरात शालेय वस्तू खरेदी करण्याची लगबग चालू होते. बहूतेक कुटूंबवत्सल पालक पगार झाला की शाळेसाठी लागणार्‍या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात निघतात. मान्सूनचा पाऊस जरी चालू असला तरी एखाद्या सुटीच्या दिवशी आपापली मुले, त्यांच्या आया यांची स्कुटरवर निघालेली गर्दी रस्त्यावर पहायला मिळते. आजकाल सरकारी शाळातच सरकारी पुस्तके मिळत असतात. त्यामुळे शालेय सामाना मिळणार्‍या दुकानांत पुस्तकांची विक्री सोडून वह्या व इतर गोष्टी विकायला ठेवतात. नाही म्हटले तरी इंग्रजी शाळांतील मुलांना मात्र पुस्तके दुकानातूनच खरेदी करावी लागतात.

अलक

लेखनविषय:
लेखनप्रकार
अलक 1 "करावं तसं भरावं", या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिलेलं वाक्य. सहजच बसस्टॉपवर पुस्तकं विकणार्या मुलाकडून चार पुस्तकं घेतली. माझ्या घरी मी एकटाच. कामवाल्या मावशीच्या मुलांना देऊन टाकली. दोन दिवसांनी त्याच्याकडून फुगे घेतले,ऑफिसमधल्या मैत्रिणीला दिले. अशीच ओळख वाढत राहिली. काही विशेष करत नव्हतो मी. दोन दिवस ताप आला. कामवाल्या मावशी कपडे भांडीच काय दोन वेळचं जेवण पण करून गेल्या. ऑफिसलातली मैत्रिण येऊन डाॅक्टरकडे घेऊन गेली. आणि तोच बसस्टॉपवरचा मुलगा, घर शोधत आला. आज तो फुलं विकत होता. चौकशी करून जाताना चार फुलं टेबलावर ठेऊन गेला.

आपण सगळेच अश्वत्थामे

लेखनविषय:
लिहीण्याचा उद्देश जे उत्कटतेने वाटते ते लिहावे.चुक,बरोबर,चांगले वाईट हे वाचणाऱ्यांनी ठरवावे. युगांत(इरावती कर्वे),मृत्युंजय, युगंधर आणी आता अश्वत्थामा ही पुस्तके वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने वाटली,ती म्हणजे महाभारतातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या कर्माची फळे भोगून मुक्त झाली. प्रत्येकजण आपापल्या जागी बरोबर व दुसर्‍यांच्या लेखी चुक होता,अश्वत्थामा सुद्धा. अश्वत्थाम्याचे चिरंजीवीत्वाचे वरदान ऐवढे शापित निघेल हा विचार कदाचित नियतीने सुद्धा केला नसावा. म्हणूनच अश्वत्थाम्या नंतर तीने (नियतीने) कुणालाच हे वरदान दिले नसावे. अश्वत्थामा शेवटचा चिरंजीव. अश्वत्थामा आपल्या कर्माची फळे भोगतोय.
Subscribe to प्रकटन