सकाळ प्रकाशन - ललित लेखन - एका खेळियाने
मिपाकर मित्रहो,
तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रेमामुळे बहुतांशी मिपावर लिहिल्या गेलेल्या "एका खेळियाने" ह्या लेखमालिकेला सकाळ प्रकाशनातर्फे आयोजित लेखनस्पर्धेत सर्वोत्कृष्ट ललित लेखनाचा पुरस्कार मिळाला. एका खेळियाने, क्रीडायुद्धस्य कथा आणि खासियत खेळियाची ह्या सदरांतर्गत लिहिलेले काही निवडक लेख सकाळ प्रकाशनातर्फे पुस्तकरूपात लवकरच प्रकाशित करण्यात येतील.
या लिखाणामागे मिपाकरांच्या प्रतिसादाचा आणि प्रेमाचा मोठा वाटा आहे. हे आभारप्रदर्शन नाहीच. आपल्याच लोकांना "धन्यवाद" काय म्हणायचं? पण इतकं जरूर म्हणेन की तुम्ही लोकं आहात म्हणून लिहिण्यात मजा आहे.
मिसळपाव
दररोज मुंबई-पुणे-मुंबई अशा फेऱ्या मारून सुमारे 3,000 प्रवाशांची ने-आण करत असली तरी तिच्या कारकिर्दीची दखल क्वचितच कोणी घेतली असेल. इतकंच काय तिचा वाढदिवसही कधी असतो, हेसुद्धा कुणाला माहीत नाही. त्यासंबंधीचा अधिकृत पुरावाही सापडत नाही. दख्खनच्या राणीच्या अगदी उलट परिस्थिती आहे ही सगळी.