Skip to main content

प्रकटन

शशक- निवडणूक

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी रविवार, 22/01/2023 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
तो- भाऊ , यवडे काम करा की आमचे. मी- अरे बाबा , मी जाणार लोकल ट्रेनमधून. काय हरवले, दगा फटका झाला तर? तुमच्या फॉर्च्युनर जातात की सारख्या गावाला. त्यातून पाठवा. तो- गाड्या चेक करीतात, सापडली तर मागे लै घोर लावतात. तुमी जाता ना दर शुक्रवारी, फक्त यावेळी तुमच्या लॅपटॉप ऐवजी हे घेऊन जा. मी- अरे पण ट्रेन मध्ये गर्दीत कोणी मागच्यामागे डल्ला मारला तर? तुम्ही म्हणणार मी चोरले. तो- तुम्ही कायले टेन्शन घेताय? आपली मानसे असत्याल, सगळ्यांकडे घोडे असणार.काय लोचा झाला तर ते निस्तारत्याल. मी- काय राव तुम्ही तर सगळं प्लॅन करून ठेवलाय. किती न्यायचेत? तो-- जास्त नाही. ५० लाख.

How to make sense in the age of tiktok?

लेखक हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर यांनी रविवार, 22/01/2023 05:37 या दिवशी प्रकाशित केले.
चोबाजूंनी ‘कन्टेन्ट’ नावाची गोष्ट आदळत आहे. थोडेसे स्मरणरंजन आणि माझी कन्टेन्टसुकाळापूर्वीची जिज्ञासा - मी लहान होतो तेव्हा टीव्हीला इडियट बॉक्स म्हणायची पद्धत होती. अभ्यासू मुलांनी टीव्हीवगैरे पाहू नये असं कायम सांगितले जायचे आणि टीव्हीपासून आवर्जून दूर लोटले जायचे. टीव्ही हे कधी कधी इडियट बॉक्स आहे हे मलाही पूर्णपणे पटले होते कारण सगळे कुटुंब मिहीर कधी परत येणार या चिंतेत कामं धामं सोडून टीव्ही समोर येऊन बसायचे. परंतु मला टीव्ही नेहमीच इडियट बॉक्स वाटत नसे. टीव्ही पाहायचो ते फक्त डिस्कवरी आणि हिस्टरी या दोन चॅनेल्ससाठीच. Nat Geo आमच्या केबलला लागायचे नाही.

पुन्हा एकदा पहाट झाली

लेखक सागरसाथी यांनी मंगळवार, 17/01/2023 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही दिवस रोज एक कावळा पुनईच्या उंंचच उंच झाडावर बसून आपल्या घराण्याचा तीव्र स्वर सोडून कोमल स्वरात साद घालताना दिसत होता. त्याच्या गोड बोलण्याला दाद देणारे आसपास कोणीच दिसत नव्हते. गावात कावळे दिसेनाचे होवूनही कितीतरी काळ लोटला हे त्याला माहीतीच नसावे असे वाटत होते.

टेलिकॉम क्रांतीचे महास्वप्न -माझा प्रवास (सॅम पित्रोदा)-- भाग २

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शुक्रवार, 13/01/2023 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग टेलिकॉम क्रांतीचे महास्वप्न -माझा प्रवास (सॅम पित्रोदा) तर मागच्या भागात आपण पाहिले की ६० च्या दशकात अमेरिकेत काही स्वप्ने घेऊन आलेले सॅम आता चांगलेच स्थिरावले होते, अमेरिकन नागरिकत्व ,दोन मुले आणि पत्नी असे सुखी कुटुंब, शिवाय भाऊ बहिणी आई वडील बहुतेक सर्वजण एक एक करून अमेरिकेत आलेले होते. वेसकॉम विकल्यामुळे तर इतका पैसा मिळाला होता की पुढचे सर्व आयुष्य केवळ त्या पैशांच्या व्याजावर जाऊ शकत होते. पण त्यांना आता भारतातील टेलिकॉम क्षेत्र सुधारण्याचा किडा चावला होता.

पुस्तक परिक्षण-टेलिकॉम क्रांतीचे महास्वप्न -माझा प्रवास (सॅम पित्रोदा)

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी मंगळवार, 10/01/2023 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी आपण जवळपास सगळयांनीच नव्वदच्या दशकात झालेली टेलिकॉम क्षेत्रातील क्रांती अनुभवली आहे. त्या दशकात साधारण घरोघरी टेलिफोन आला, आणि जागोजागी एस टी डी/ पी सी ओ उघडले. तोवर गल्लीत/आसपास एक दोन जणांकडे टेलिफोन असे आणि सगळ्यांचे निरोप त्यावरच दिले/घेतले जात. शेजारधर्म म्हणून ते सरसकट मान्यच होते. त्यात फोनधारकालाही आपण काही विशेष करतोय असे वाटत नसे. फारतर त्याची कॉलर जरा टाईट असे इतकेच. फक्त हे फोन कधी कधी दहा दहा दिवस बंद असत तर कधी कधी रॉंग नंबर लागून पैसे वाया जात असत.

कॉर्पोरेट सोशल रिस्पॉनिसिबिलिटी

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 10/01/2023 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही कोर्पोरेट शोशल रिस्पॉन्सिबिलीटी ही टर्म ऐकली आहे का ? म्हणजे कसं की कॉर्पोरेट कंपन्या कर भरतातच मात्र सामाजिक जाणीव म्हणुन त्यांनी त्यांच्या प्रोऑफिटचे २% सामाजिक कामावर खर्च केले च पाहिजेत असा कायदा आहे. ह्याही पुढे जाऊन त्यात काम करणार्‍या लोकांनी सामाजिक भान राखुन , आपण ह्या समाजाचे काही देणे लागतो , आपण समाजा साठी काही तरी करायला हवे ह्या वृतीने रहायला हवे अशी काही लोकांची अपेक्षा असते !! असो. आज आर.टी.ओ ने गाडी उचलली , काहीही कारण नाही, नो पार्किन्गच्या बोर्ड पासुन किती तरी लांब असुनही उचलली.

खचलेले शेजारी

लेखक सुधीर मुतालीक यांनी सोमवार, 09/01/2023 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
सुप्रीम कोर्टात नोटबंदीवर घटनापीठाने काल परवा शिक्कामोर्तब केले असले तरी नोटबंदी किती परिणामकारक होती याचा एक स्पष्ट पुरावा पाकिस्तानच्या आख्ख्या अर्थव्यवस्थेने दिला होता. लोकसभेच्या वेबसाईटवरच दिलेली आकडेवारी थरकाप उडवणारी होती. सन २०११ ते २०१५ मध्ये सव्वीस लाख पाचशे आणि हजारच्या खोट्या नोटांचे तुकडे भारतीय चलनात घुसवले गेले होते. NIA ने प्रयोगशाळेमध्ये या खोट्या नोटांचे तुकडे तपासून हे सिद्ध केले होते की चक्क पाकिस्तानच्या सरकारी पाठिंब्यावरच या खोट्या नोटा तिकडे छापल्या जायच्या. आता एखादे सरकार असले धंदे का करेल ? याचे उत्तर केवळ अतिरेक्यांना मदत देणे इतकेच नव्हते.

तुमच्या आवडत्या तुनळी वाहिन्या कोणत्या?

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी गुरुवार, 29/12/2022 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा-- ह्या दोन बातम्यांमध्ये एवढा विरोधाभास का आहे? नमस्कार मिपाकर ईतिहास काळात घरोघरी मंडळी लवकर रात्रीची जेवणे वगैरे आटोपुन पत्ते,कॅरम्,पट वगैरे खेळत बसायची म्हणे. गेला बाजार जेवताना किवा चहा पिताना एकमेकांशी गप्पा वगैरे मारायची. शेजार्‍या पाजार्‍यांकडे वर्तमानपत्र वाचायला किवा शिळोप्याच्या गप्पा मारायला, रमी किवा बुद्धीबळ खेळायला जायची. काहीच नसेल तर घरीच गॉसिपिंग करत बसायची. पुढे रेडिओ आणि मग टि.व्ही. आले, आणि रिकामा वेळ घालवायला माणसाला एकमेकांची गरज उरली नाही.

व्यसन

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 21/12/2022 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
व्यसन माझ्याकडे एक ४८ वर्षाच्या बाई आल्या होत्या. त्यांचा डावा हात दुखत होता. त्यासाठी त्यांच्या डॉक्टरांनी त्यांच्या डाव्या खांद्याची सोनोग्राफी करायला सांगितली होती. सोनोग्राफी करण्याच्या अगोदर त्यांच्या आजाराची माहिती असावी म्हणून आणि मध्यम वयीन, डावा हात दुखतो आहे म्हणून मी त्यांना विचारले कि त्यांच्या हृदयाची तपासणी झाली आहे का? त्यावर त्यांनी आपली फाईल दाखवली.

मंदिराबाहेर भेटलेली देवी

लेखक पॉइंट ब्लँक यांनी मंगळवार, 13/12/2022 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
आज तो ऑफिसमधून घाई गडबडीत परतला. आल्याआल्या कॅमेराची बॅग भरली. घडयाळ बघितलं सहा वाजले होते. मंदिराचा वार्षिक उत्सव चालू व्हायला अर्धा तास होता अजून. प्रसादाचं जेवण असलं तरी सगळे फोटो काढून जेवायला उशीर होणारच . थोडा चहा पोटात गेला तर उत्साह टिकून राहील शेवटपर्यन्त असा विचार करून शेजारच्या हॉटेलात जाऊन चहा घेतला. चहा पिता पिता फोटो कसे काढता येतील ह्याचा विचार केला . चहा पिऊन थेट ममंदिराकडे चालू लागला. जाता जाता नेहमीचे नियम स्वतःला पुन्हा एकदा बजावले - " मन आणि कॅमेरा कुठेही भरकटू द्यायचा नाही.